सोलापूर : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) प्रकरणांमध्ये बचाव पक्षाची प्रभावी बाजू मांडत शंभरहून अधिक आरोपींना निर्दोष मुक्तता मिळवून देण्याची उल्लेखनीय कामगिरी सोलापूर येथील अॅड. राहुल खंडाळ यांनी केली आहे.मुंबई येथील न्यायालयाने करनिरीक्षक रतनभैरव यांना १०,००० रुपये लाच स्वीकारल्याच्या आरोपातून निर्दोष मुक्त केले.

या प्रकरणात आरोपींच्या बाजूने अॅड. राहुल खंडाळ यांनी युक्तिवाद केला. न्यायालयाने सादर करण्यात आलेल्या पुराव्यांच्या आधारे आरोपींना दिलासा दिला. अॅड. खंडाळ यांनी आतापर्यंत ACB संदर्भातील एकूण १०२ प्रकरणांमध्ये यश मिळवले असून १३८ आरोपींना निर्दोष मुक्तता मिळवून दिली आहे. त्यांच्या या सातत्यपूर्ण यशामुळे विधी क्षेत्रात त्यांचे नाव विशेषत्वाने घेतले जात आहे.लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यांतर्गत प्रकरणांमध्ये बचाव पक्षाची भूमिका अत्यंत महत्त्वाची मानली जाते. अशा गुंतागुंतीच्या प्रकरणांमध्ये प्रभावी युक्तिवाद आणि कायदेशीर बाबींचे अचूक सादरीकरण यामुळे अॅड. खंडाळ यांचे योगदान अधोरेखित होत आहे.
(संपर्क: अॅड.राहुल खंडाळ : 9822047274)











