सोलापूर : पश्चिम बंगाल आणि आसामसह विविध राज्यांतील विधानसभा निवडणुकांमध्ये मिळालेल्या यशाचा आनंद भाजपच्या सोलापूर शहर कार्यकर्त्यांनी सोमवारी पक्ष कार्यालयासमोर व्यक्त केला. मात्र पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे निष्पाप बालिकेची हत्या तसेच सोलापूर शहर जिल्ह्यात अलीकडे घडलेल्या खुनांच्या पार्श्वभूमीवर हा विजयोत्सव साधेपणाने साजरा करण्यात आला.
यावेळी भाजपच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर म्हणाल्या, पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीतील भाजपचा विजय हा डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांना खरी श्रद्धांजली आहे. संपूर्ण देशात भाजपची सत्ता यावी, या दृष्टीने पक्षाची वाटचाल सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रसंगी महापौर विनायक कोंड्याल, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, सभागृहनेते नरेंद्र काळे, रामचंद्र जन्नू, श्रीकांचना यन्नम, विजय कुलथे, शिवराज सरतापे, नागेश सरगम, महेश देवकर, नगरसेविका कल्पना कदम, राजकुमार पाटील, गौतम कसबे आदी उपस्थित होते.











