सोलापूर : सोलापूर जिल्हा समाजसेवा मंडळ संचलित महात्मा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय यांनी यंदाच्या दहावीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत यशाची परंपरा कायम राखली आहे.
शाळेचा एकूण निकाल ९२.४२ टक्के लागला असून विद्यार्थी, पालक व शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.यामध्ये श्रुतिका म्हेत्रे हिने ९३ टक्के गुण मिळवत विद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. तर आयेशा मोमीन हिने ९०.८० टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक मिळवला. सानिका कोरे व अमरीन रोेख या विद्यार्थिनींनी प्रत्येकी ९०.४० टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक मिळवला.यंदाच्या परीक्षेत विद्यालयातील १३२ विद्यार्थ्यांपैकी १२२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, शालेय व्यवस्थापन समिती तसेच संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. विद्यालयाच्या सातत्यपूर्ण गुणवत्तापूर्ण शिक्षणामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोठी प्रेरणा मिळत असल्याची भावना पालकांनी व्यक्त केली.