Monday, July 27, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

राजू शेट्टी यांच्या शक्तीपीठ महामार्गाला माढ्यात तीव्र विरोध ; “एक इंचही जमीन देणार नाही”चा निर्धार

Solapur Mirror by Solapur Mirror
May 17, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
राजू शेट्टी यांच्या शक्तीपीठ महामार्गाला माढ्यात तीव्र विरोध ; “एक इंचही जमीन देणार नाही”चा निर्धार
0
SHARES
14
VIEWS

सोलापूर : राज्यातील १३ जिल्ह्यांतून शक्तीपीठ महामार्गाला तीव्र विरोध होत असताना सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातही आंदोलनाची धग वाढली आहे. पालखी महामार्ग आणि पुणे–सोलापूर राष्ट्रीय महामार्गास समांतर प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गासाठी जमीन संपादनास शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शवत “एक इंचही जमीन देणार नाही” असा निर्धार व्यक्त केला.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली माढा तालुक्यातील अरण गावात पुणे–सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. माढा तालुक्यातील द्राक्ष, ऊस आणि डाळिंबाच्या बागायती क्षेत्रावर या महामार्गाचा मोठा परिणाम होणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. उजनीच्या डाव्या कालव्यातून १० ते १२ किलोमीटर पाइपलाइन टाकून शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी बागायती केल्या आहेत. या सुपीक जमिनी संपादित केल्या जाणार असल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत.

संत सावता माळी महाराजांची संजीवन समाधी असलेल्या अरण गावातून हा महामार्ग प्रस्तावित आहे. “कांदा, मुळा, भाजी; अवघी विठाई माझी” हा जगप्रसिद्ध अभंग याच अरण गावच्या शेतमळ्यात रचला गेला होता. दरवर्षी आषाढी वारीनंतर विठ्ठलाची पालखी पंढरपूरहून सावता महाराजांना भेटण्यासाठी अरण येथे येते. या धार्मिक व ऐतिहासिक वारशाच्या गावातून महामार्ग जात असून सुमारे ६०० एकर जमीन संपादित होणार असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. दरम्यान, शेतकऱ्यांनी महामार्ग रोखल्यानंतर अवघ्या पंधरा मिनिटांत पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना हटविण्याचा प्रयत्न केला. यावेळी राजू शेट्टी यांनी संतप्त होत पोलिसांना धारेवर धरले. “दडपशाही केल्यास राष्ट्रीय महामार्गावर बेमुदत आंदोलन करू,” असा इशारा त्यांनी दिला. त्यानंतर पोलिसांनी संयमाची भूमिका घेतल्याने सुमारे एक तास रास्ता रोको आंदोलन सुरू राहिले.

या आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय रणदिवे, सचिन पाटील, तानाजी बागल, शिवाजी पाटील, अजित बोरकर, सिद्धेश्वर घुगे, शाहाजन शेख, विजय शिंदे, सोमनाथ शिंदे, प्रशांत पाटील, प्रताप पिसाळ, बापूसाहेब गायकवाड, चंद्रकांत कुटे, प्रताप देशमुख, मगण काळे यांच्यासह परिसरातील शक्तीपीठ बाधित शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

विजापूर रोड हद्दीत घरफोडी करणाऱ्या ‘मंत्री’ला ४८ तासांत केले गजाआड

Next Post

मंद्रूप येथील शेततळ्यात बुडून दोन शाळकरी मुलांचा दुर्दैवी मृत्यू

Related Posts

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क
सोलापूर जिल्हा

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा
सोलापूर जिल्हा

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

July 27, 2026
रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन
सोलापूर जिल्हा

रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

July 27, 2026
गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..
सोलापूर जिल्हा

गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..

July 27, 2026
केगावच्या बिग सी कॉलेजमध्ये ; बायोमेडिकल इंजिनिअरिंगच्या ६३ जागांसाठी प्रवेश सुरु.
सोलापूर जिल्हा

केगावच्या बिग सी कॉलेजमध्ये ; बायोमेडिकल इंजिनिअरिंगच्या ६३ जागांसाठी प्रवेश सुरु.

July 27, 2026
उत्कृष्ट नियोजनाला ; मुख्यमंत्र्यांकडून जिल्हा परिषदेचे कौतुक..
सोलापूर जिल्हा

उत्कृष्ट नियोजनाला ; मुख्यमंत्र्यांकडून जिल्हा परिषदेचे कौतुक..

July 26, 2026
Next Post
मंद्रूप येथील शेततळ्यात बुडून दोन शाळकरी मुलांचा दुर्दैवी मृत्यू

मंद्रूप येथील शेततळ्यात बुडून दोन शाळकरी मुलांचा दुर्दैवी मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

July 27, 2026
रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

July 27, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025