Monday, July 27, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

मध्यवर्ती एसटी स्थानकातील तब्बल २२ सीसीटीव्ही कॅमेरे पुन्हा सुरू; प्रवाशांत समाधान

Solapur Mirror by Solapur Mirror
May 20, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
मध्यवर्ती एसटी स्थानकातील तब्बल २२ सीसीटीव्ही कॅमेरे पुन्हा सुरू; प्रवाशांत समाधान
0
SHARES
7
VIEWS

सोलापूर, : सोलापूर मध्यवर्ती एसटी बस स्थानकातील प्रवाशांच्या सुरक्षेचा बोजवारा उडाला असून लाखो रुपयांचे सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याने एसटी प्रशासनाला अखेर जाग आली आहे. मंगळवार दि. १९ रोजी पहाटे तुटलेली केबल जोडून स्थानकातील तब्बल २२ सीसीटीव्ही कॅमेरे पुन्हा कार्यान्वित करण्यात आल्याची माहिती आगार व्यवस्थापनाकडून देण्यात आली.

उर्वरित आठ ते दहा कॅमेरेही पुढील तीन ते चार दिवसांत सुरू करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. पंढरपूर, अक्कलकोट आणि तुळजापूरसारख्या प्रमुख तीर्थक्षेत्रांना जोडणाऱ्या सोलापूरच्या मध्यवर्ती बस स्थानकावर दररोज हजारो प्रवाशांची वर्दळ असते. स्थानकात तब्बल २३ प्लॅटफॉर्म असून प्रवाशांच्या सुरक्षेसाठी एप्रिल महिन्यात नवीन २८ ते ३२ सीसीटीव्ही कॅमेरे आणि डीव्हीआर यंत्रणा बसवण्यात आली होती. मात्र अवघ्या काही दिवसांतच तांत्रिक बिघाडामुळे ही यंत्रणा बंद पडली होती.

यामुळे स्थानकातील सुरक्षा धोक्यात आली होती. विशेषतः महिला प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. चोरी, पाकीटमारी आणि छेडछाडीच्या घटनांमुळे प्रवाशांनी संताप व्यक्त केला होता. या गंभीर प्रकाराकडे ‘नवराष्ट्र’ने लक्ष वेधल्यानंतर वरिष्ठ आगार व्यवस्थापनाने तातडीने हालचाली सुरू केल्या. मंगळवारी पहाटे २२ कॅमेऱ्यांचे चित्रण पुन्हा सुरू करण्यात आले. त्यामुळे प्रवासी व नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

अंडरग्राउंडची पाहणी; वायर मात्र उंचावरूनच!
एसटी बस स्थानक परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या केबल्स १४ एप्रिल रोजी मराठवाडा विभागातील मिरवणुकीदरम्यान तुटल्याचे सांगितले जात होते. डीव्हीआरपासून जाणारी वायर अंडरग्राउंड टाकण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तीन-चार दिवसांपूर्वी पाहणीही केली होती. मात्र सध्या सुरू करण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या वायर पुन्हा उंचावरूनच टाकण्यात आल्याची माहिती आगार व्यवस्थापकांनी दिली.

Previous Post

जनआरोग्य योजनेंतर्गत रुग्णांची तक्रार खपवून घेतली जाणार नाही ; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

Next Post

जिल्ह्यातील साडेचार हजार मेडिकल दुकाने बंद

Related Posts

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग
सोलापूर जिल्हा

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

July 27, 2026
कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या
सोलापूर जिल्हा

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

July 27, 2026
भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क
सोलापूर जिल्हा

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा
सोलापूर जिल्हा

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

July 27, 2026
रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन
सोलापूर जिल्हा

रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

July 27, 2026
गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..
सोलापूर जिल्हा

गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..

July 27, 2026
Next Post
जिल्ह्यातील साडेचार हजार मेडिकल दुकाने बंद

जिल्ह्यातील साडेचार हजार मेडिकल दुकाने बंद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

July 27, 2026
कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

July 27, 2026
भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025