Monday, July 27, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

ब्रह्मपुरी येथील रील्सस्टार रोहिणीचा ‘हॉटेल ग्रामपंचायत’मध्ये गळफास

Solapur Mirror by Solapur Mirror
May 28, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
ब्रह्मपुरी येथील रील्सस्टार रोहिणीचा ‘हॉटेल ग्रामपंचायत’मध्ये गळफास
0
SHARES
48
VIEWS

हॉटेल ग्रामपंचायत’च्या किचनमध्ये विवाहित रील्सस्टारची गळफास घेऊन आत्महत्या; कारण अद्याप अस्पष्ट

सोलापूर : सोशल मीडियावर आपल्या रील्समधून लाखो चाहत्यांचे मनोरंजन करणाऱ्या लोकप्रिय रील्सस्टार महिलेने प्रत्यक्ष आयुष्यात आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याने मंगळवेढा तालुक्यात खळबळ उडाली आहे. ब्रह्मपुरी येथील “हॉटेल ग्रामपंचायत”च्या स्वयंपाकघरात गळफास घेत रोहिणी निलेश पाराध्ये (वय २५) यांनी आत्महत्या केली मंगळवारी दुपारी अडीचच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. रोहिणी पाराध्ये या पती निलेश पाराध्ये यांच्यासह रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गालगत “हॉटेल ग्रामपंचायत” हे हॉटेल चालवत होत्या. याच हॉटेलच्या किचनमध्ये त्यांनी दोरीच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे समोर आले. घटनेनंतर उपस्थितांनी त्यांना तातडीने मंगळवेढा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी मंगळवेढा पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलिस पुढील तपास करीत आहेत.

आत्महत्येचे कारण अद्याप गुलदस्त्यात
रोहिणी यांनी सोशल मीडियावर रील्सच्या माध्यमातून अल्पावधीत मोठी लोकप्रियता मिळवली होती. त्यांच्या विनोदी, सामाजिक आणि खाद्यसंस्कृतीवरील व्हिडीओंना हजारो-लाखोंचा प्रतिसाद मिळत होता. कौटुंबिक आयुष्य आणि व्यवसायही सुरळीत सुरू असल्याचे सांगितले जात असताना त्यांनी हे टोकाचे पाऊल का उचलले, याबाबत विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत. मात्र, आत्महत्येमागचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही.

चाहत्यांना मोठा धक्का
रोहिणी आणि निलेश पाराध्ये या जोडप्याने सोशल मीडियावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती. “हॉटेल ग्रामपंचायत” आणि त्यांच्या रील्समुळे ते विशेष चर्चेत होते. अचानक घडलेल्या या घटनेमुळे चाहत्यांसह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Previous Post

‘कुर्बानी’तून मानवतेचा संदेश; सोलापुरात बकरी ईद साजरा.

Next Post

आमदार-खासदार नसतानाही तालुक्यावर पकड; दक्षिण सोलापूरच्या राजकारणातील ‘पॉवरफुल’ नाव: सुरेश हसापुरे!

Related Posts

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग
सोलापूर जिल्हा

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

July 27, 2026
कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या
सोलापूर जिल्हा

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

July 27, 2026
भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क
सोलापूर जिल्हा

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा
सोलापूर जिल्हा

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

July 27, 2026
रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन
सोलापूर जिल्हा

रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

July 27, 2026
गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..
सोलापूर जिल्हा

गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..

July 27, 2026
Next Post
आमदार-खासदार नसतानाही तालुक्यावर पकड; दक्षिण सोलापूरच्या राजकारणातील ‘पॉवरफुल’ नाव: सुरेश हसापुरे!

आमदार-खासदार नसतानाही तालुक्यावर पकड; दक्षिण सोलापूरच्या राजकारणातील 'पॉवरफुल' नाव: सुरेश हसापुरे!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

July 27, 2026
कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

July 27, 2026
भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025