Monday, July 27, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

भरधाव ट्रकची दुचाकीला समोरून भीषण धडक; अरणच्या तरुणाचा जागीच मृत्यू

Solapur Mirror by Solapur Mirror
June 1, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
भरधाव ट्रकची दुचाकीला समोरून भीषण धडक; अरणच्या तरुणाचा जागीच मृत्यू
0
SHARES
3
VIEWS

माढा/अरण : पुणे–सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर अरण गावाच्या हद्दीत रविवारी (दि. ३१ मे) सकाळी झालेल्या भीषण अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. अरण गावाजवळील एचपी पेट्रोल पंपासमोर भरधाव ट्रकने दुचाकीला समोरून दिलेल्या जोरदार धडकेत हा दुर्दैवी अपघात घडला. अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती की, तरुणाच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी सुमारे सात वाजण्याच्या सुमारास पुण्याकडून सोलापूरच्या दिशेने भरधाव वेगाने निघालेला ट्रक (क्र. MH 14 KQ 1006) अरण गावाच्या हद्दीत असलेल्या एचपी पेट्रोल पंपाजवळ पोहोचला असता समोरून येणाऱ्या दुचाकी (क्र. MH 45 J 1387) ला जोरदार धडक दिली. धडक एवढी भीषण होती की दुचाकी अक्षरशः चेंदामेंदा झाली आणि चालक काही अंतरावर फेकला गेला.या भीषण अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव तुषार गणेश सावंत (रा. अरण, ता. माढा, जि. सोलापूर) असे असून, त्यांच्या आकस्मिक निधनामुळे अरण गावात शोककळा पसरली आहे. तुषार हे कुटुंबातील कर्ते व सर्वांच्या परिचयातील असल्याने त्यांच्या निधनाची बातमी समजताच नातेवाईक व ग्रामस्थांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. परिसरात काही काळ भावनिक वातावरण निर्माण झाले होते.

अपघाताची माहिती मिळताच वरवडे टोल नाका येथील गस्तीपथक आणि मोडनिंब महामार्ग पोलिस मदत केंद्राचे अधिकारी PSI उमेश पवार व त्यांचे सहकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी वाहतूक सुरळीत करत पंचनामा प्रक्रिया सुरू केली. अपघातानंतर महामार्गावर काही काळ वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती.दरम्यान, मृत तुषार सावंत यांना वरवडे टोल नाका रुग्णवाहिकेमधून डॉ. प्रशांत कारंजकर आणि रुग्णवाहिका चालक बंडू गायकवाड यांनी तत्काळ मोडनिंब येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल केले.

संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून पुढील प्रक्रिया पार पाडण्यात आली. या अपघाताची माहिती टेंभूर्णी पोलीस ठाण्यातील अपघात विभागाचे अधिकारी जगताप व सरडे यांना गस्तीपथक प्रमुख विजय साळुंके यांनी दिली असून, अपघाताचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे. प्राथमिक माहितीनुसार ट्रकचा वेग अधिक असल्याने नियंत्रण सुटून अपघात घडल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास केला जात आहे.महामार्गावर वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर भरधाव वाहनचालकांवर कठोर कारवाई करण्याची मागणीही ग्रामस्थांतून होत आहे. विशेषतः अरण परिसरातील महामार्गावर वेगमर्यादेचे काटेकोर पालन आणि अधिक देखरेखीची आवश्यकता असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

Previous Post

भगव्या झेंड्याचा थोर उपासक ते सुजाण लोकनेता: शिवशरण ‘आण्णा’ बिराजदार पाटील यांचा जीवनप्रवास!

Next Post

“जिथे विरोधकांचा आवाज थांबतो, तिथे राऊत पॅटर्न सुरू होतो!”

Related Posts

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग
सोलापूर जिल्हा

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

July 27, 2026
कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या
सोलापूर जिल्हा

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

July 27, 2026
भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क
सोलापूर जिल्हा

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा
सोलापूर जिल्हा

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

July 27, 2026
रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन
सोलापूर जिल्हा

रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

July 27, 2026
गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..
सोलापूर जिल्हा

गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..

July 27, 2026
Next Post
“जिथे विरोधकांचा आवाज थांबतो, तिथे राऊत पॅटर्न सुरू होतो!”

“जिथे विरोधकांचा आवाज थांबतो, तिथे राऊत पॅटर्न सुरू होतो!”

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

July 27, 2026
कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

July 27, 2026
भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025