Monday, July 27, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी सात उमेदवार रिंगणात; राजकीय रंगत वाढली

Solapur Mirror by Solapur Mirror
June 2, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी सात उमेदवार रिंगणात; राजकीय रंगत वाढली
0
SHARES
61
VIEWS

भाजपचे राजेंद्र राऊत यांच्यासह पाच अपक्षांचे आव्हान; अंतिम उमेदवार यादी जाहीर

सोलापूर ; सोलापूर स्थानिक प्राधिकरण मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज छाननीची प्रक्रिया पूर्ण झाली असून अंतिम उमेदवार यादी जाहीर करण्यात आली आहे. या निवडणुकीत प्रमुख राजकीय पक्षांसह अपक्ष उमेदवारांनीही मैदानात उडी घेतल्याने निवडणुकीची रंगत वाढली आहे. अंतिम यादीत एकूण सात उमेदवारांचा समावेश असून आता प्रचाराच्या रणधुमाळीला वेग येणार आहे महाविकास आघाडीकडून केशव दौलतराव बनगर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. ते राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) व काँग्रेसच्या पाठिंब्यावर निवडणूक लढवत आहेत. तर भारतीय जनता पक्षाने राजेंद्र राऊत यांच्यावर विश्वास व्यक्त करत उमेदवारी दिली आहे. त्यामुळे या दोन्ही प्रमुख उमेदवारांमध्ये थेट सामना होण्याची शक्यता राजकीय जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे.

याशिवाय अक्कलकोट नागेश हरिभाऊ बाबराव, जीवन उत्तमराव जानकर, धनंजय महादेव डिकळे, महेश देविदास साठे आणि रमेश नागनाथ बारस्कर यांनी अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात प्रवेश केला आहे. अपक्ष उमेदवारांच्या उपस्थितीमुळे काही प्रमाणात मतांचे विभाजन होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सदस्यांमधून ही निवडणूक होत असल्याने जिल्ह्यातील राजकीय समीकरणांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. सर्व प्रमुख पक्षांनी आपल्या मतदारांना एकत्र ठेवण्यासाठी आणि पाठिंबा मिळवण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. आगामी काही दिवसांत प्रचारसभा, बैठका आणि संपर्क मोहिमा यांना वेग येणार आहे.

दरम्यान, उमेदवारी अर्ज माघारीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. आता स्थानिक स्वराज्य संस्थांतील मतदारांचा कौल कुणाच्या पारड्यात पडतो, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. विधान परिषदेच्या या निवडणुकीत प्रमुख पक्षांबरोबरच अपक्ष उमेदवारांची भूमिका देखील महत्त्वाची ठरणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

  • हे उमेदवार रिंगणात
  • केशव दौलतराव बनगर (काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टी )
  • राजेंद्र विठ्ठल राऊत (भारतीय जनता पार्टी )
  • अक्कलकोट नागेश हरिभाऊ बाबराव (अपक्ष)
  • जीवन उत्तमराव जानकर (अपक्ष)
  • धनंजय महादेव डिकळे (अपक्ष)
  • महेश देविदास साठे (अपक्ष)
  • रमेश नागनाथ बारस्कर (अपक्ष)

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदारांवर सर्वांचे लक्ष
विधान परिषद निवडणुकीत जिल्हा परिषद, पंचायत समित्या, महापालिका, नगरपालिका आणि नगरपंचायतींतील निवडून आलेले सदस्य मतदान करणार आहेत. त्यामुळे पक्षीय ताकद, गटबाजी आणि स्थानिक राजकीय समीकरणांचा निकालावर मोठा प्रभाव पडण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच उमेदवारांनी मतदारांशी संपर्क वाढवण्यास सुरुवात केली आहे.

Tags: आमदार देवेंद्र कोठेएकनाथ शिंदेदेवेंद्र फडणवीसराजकारणसचिन जगतापसोलापूरसोलापूर महापालिका
Previous Post

१२ गावांच्या प्रॉपर्टी कार्ड मोहिमेला वेग

Next Post

सोलापूरकरांची ‘तिरुपती वारी’ अजूनही प्रतीक्षेत!

Related Posts

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क
सोलापूर जिल्हा

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा
सोलापूर जिल्हा

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

July 27, 2026
रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन
सोलापूर जिल्हा

रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

July 27, 2026
गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..
सोलापूर जिल्हा

गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..

July 27, 2026
केगावच्या बिग सी कॉलेजमध्ये ; बायोमेडिकल इंजिनिअरिंगच्या ६३ जागांसाठी प्रवेश सुरु.
सोलापूर जिल्हा

केगावच्या बिग सी कॉलेजमध्ये ; बायोमेडिकल इंजिनिअरिंगच्या ६३ जागांसाठी प्रवेश सुरु.

July 27, 2026
उत्कृष्ट नियोजनाला ; मुख्यमंत्र्यांकडून जिल्हा परिषदेचे कौतुक..
सोलापूर जिल्हा

उत्कृष्ट नियोजनाला ; मुख्यमंत्र्यांकडून जिल्हा परिषदेचे कौतुक..

July 26, 2026
Next Post
सोलापूरकरांची ‘तिरुपती वारी’ अजूनही प्रतीक्षेत!

सोलापूरकरांची ‘तिरुपती वारी’ अजूनही प्रतीक्षेत!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

July 27, 2026
रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

July 27, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025