सोलापूर : सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी संसदेतील दोन वर्षांचा यशस्वी कार्यकाळ पूर्ण केल्याबद्दल शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले. तसेच सोलापूर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सातलिंग शटगार यांच्या पुनर्निवडीबद्दल आणि वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला.
यावेळी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सातलिंग शटगार यांच्या संघटन कौशल्य, पक्षनिष्ठा आणि जनसामान्यांशी असलेल्या सातत्यपूर्ण संपर्काचे विशेष कौतुक केल्याची भावना व्यक्त करण्यात आली.
शटगार यांनी ग्रामीण भागातील विकासकामे, महिलांचे सक्षमीकरण आणि काँग्रेस पक्षाच्या बळकटीसाठी केलेले योगदान उल्लेखनीय असल्याचे मतही व्यक्त करण्यात आले.खासदार प्रणिती शिंदे यांनी गेल्या दोन वर्षांत संसदेत सोलापूरच्या प्रश्नांना प्रभावीपणे वाचा फोडत विकासकामांसाठी सातत्याने पाठपुरावा केला आहे. त्यांच्या कार्यामुळे मतदारसंघातील नागरिकांमध्ये विश्वास निर्माण झाला असून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.सातलिंग शटगार यांच्या पुनर्निवडीमुळे काँग्रेस पक्षाची संघटनात्मक ताकद आणखी वाढणार असून त्यांचे नेतृत्व कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी ठरत असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. वाढदिवसानिमित्त त्यांना निरोगी, दीर्घायुषी व यशस्वी आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थकांच्या वतीने हा अभिनंदन व शुभेच्छा संदेश प्रसिद्ध करण्यात आला आहे.