Monday, July 27, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

वेध आषाढीचे : लाखो वारकऱ्यांच्या सेवेसाठी जिल्हा परिषद सज्ज

Solapur Mirror by Solapur Mirror
June 23, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
वेध आषाढीचे : लाखो वारकऱ्यांच्या सेवेसाठी जिल्हा परिषद सज्ज
0
SHARES
10
VIEWS

२३ जर्मन हँगर, ५ हजार शौचालये, २२० पाण्याचे टँकर, १३ आरोग्य रथ, २३ जर्मन हँगरसह लाखो वारकऱ्यांसाठी व्यापक नियोजन

सोलापूर, : राज्यातील सर्वात मोठ्या धार्मिक सोहळ्यांपैकी एक असलेल्या आषाढी वारी २०२६ च्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्हा परिषद प्रशासनाने वारकऱ्यांच्या सेवेसाठी सर्वंकष तयारी पूर्ण केली आहे. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी स्वच्छता, पिण्याचे पाणी, आरोग्य सेवा, निवारा, महिला सुविधा आणि आपत्कालीन व्यवस्थापन अशा विविध घटकांचा समावेश असलेला व्यापक आराखडा तयार करण्यात आला असून सर्व विभागांमध्ये समन्वय साधून कामे अंतिम टप्प्यात पोहोचली आहेत.

यासंदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक वैद्य, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन तसेच उपाध्यक्ष तथा अर्थ व बांधकाम समितीचे सभापती इंद्रजीत पवार यांनी माहिती दिली. यावेळी संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. यंदा पालखी सोहळा सोलापूर जिल्ह्यातील ८१ गावांमधून मार्गक्रमण करणार आहे. या प्रवासादरम्यान ३८ मुक्काम, ४३ विसावे आणि ७ रिंगण सोहळे पार पडणार आहेत. लाखो वारकऱ्यांचा सहभाग लक्षात घेऊन प्रत्येक मुक्काम व विसाव्याच्या ठिकाणी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे.स्वच्छता व्यवस्थेला प्राधान्य देत जिल्हा परिषदेमार्फत ५ हजार तात्पुरती आणि फिरती शौचालये उभारण्यात येणार आहेत. संत ज्ञानेश्वर महाराज पालखीसाठी दररोज १,८०० तर संत तुकाराम महाराज पालखीसाठी १,२०० शौचालयांची व्यवस्था करण्यात आली आहे. महिलांच्या सन्मान आणि सुरक्षिततेचा विचार करून ५०० स्वतंत्र स्नानगृहांची उभारणी करण्यात येणार आहे. यासोबतच नियमित स्वच्छता, जंतुनाशक फवारणी आणि कचरा व्यवस्थापनासाठी स्वतंत्र पथके कार्यरत राहणार आहेत.

वारकऱ्यांना स्वच्छ व सुरक्षित पिण्याचे पाणी मिळावे यासाठी पालखी मार्गावर २२० पाण्याचे टँकर तैनात करण्यात आले आहेत. सर्व जलस्रोतांची प्रयोगशाळेमार्फत तपासणी करूनच पाणीपुरवठा केला जाणार आहे. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर आणि गर्दीच्या ठिकाणी पाणीटंचाई निर्माण होऊ नये म्हणून अतिरिक्त यंत्रणाही सज्ज ठेवण्यात आली आहे. मुख्यमंत्री वारकरी सुविधा केंद्रांतर्गत मुक्कामाच्या ठिकाणी २३ जर्मन हँगर आणि ३७ वॉटरप्रूफ मंडप उभारण्यात येणार आहेत. या सुविधा केंद्रांमध्ये वारकऱ्यांसाठी ओपीडी सेवा, विश्रांती व्यवस्था, मोबाईल चार्जिंग सुविधा, पंखे, पिण्याचे पाणी आणि महिलांसाठी स्वतंत्र हिरकणी कक्ष उपलब्ध राहणार आहेत. पावसाळी वातावरणात वारकऱ्यांना सुरक्षित निवारा मिळावा, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे सांगण्यात आले.

वारीदरम्यान आरोग्य सेवेवर विशेष भर देण्यात आला आहे. आरोग्य विभागामार्फत १३ ‘मेडिसिन ऑन व्हील’ आरोग्य रथ २४ तास कार्यरत राहणार असून हे रथ पालखी मार्गावरील विविध ठिकाणी तत्काळ वैद्यकीय सेवा पुरवतील. याशिवाय १५८ तात्पुरती आरोग्य सल्ला केंद्रे, १२१ बाईकवरील आरोग्य दूत आणि २१ आपत्कालीन आयसीयू बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. या आरोग्य व्यवस्थापनासाठी ४४० वैद्यकीय अधिकारी, ४३५ आरोग्य कर्मचारी आणि २ हजार ८२२ आशा सेविका नियुक्त करण्यात आल्या आहेत. उष्माघात, संसर्गजन्य आजार, अपघात किंवा इतर आपत्कालीन परिस्थितींना तात्काळ प्रतिसाद देता यावा यासाठी विशेष नियंत्रण कक्षही कार्यरत राहणार आहे.महिला वारकऱ्यांसाठी १६७ हिरकणी कक्ष उभारण्यात येणार असून सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशीन तसेच वापरलेल्या नॅपकिनच्या विल्हेवाटीसाठी डिस्पोजल मशीनची सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे. यामुळे महिला वारकऱ्यांच्या आरोग्य आणि स्वच्छतेची विशेष काळजी घेतली जाणार आहे.

तसेच वारकऱ्यांच्या थकवा निवारणासाठी ७५० चरणसेवा (फूट मसाजर) मशीन उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. मोबाईल संपर्क कायम राहावा यासाठी १५ मोबाईल चार्जिंग व्हॅन कार्यरत असतील. याशिवाय पालखी मार्गावर मोफत जल सलून केंद्रे सुरू करण्यात येणार असून वारकऱ्यांना ताजेतवाने होण्यासाठी या सुविधेचा लाभ घेता येणार आहे.अन्न सुरक्षा विभागामार्फत पालखी मार्गावरील खाद्यपदार्थ विक्रेत्यांची तपासणी करण्यात येणार असून वारकऱ्यांना सुरक्षित व दर्जेदार अन्न मिळावे यासाठी विशेष दक्षता घेतली जाणार आहे. स्वच्छता, आरोग्य आणि सुरक्षा या त्रिसूत्रीवर भर देत वारी निर्विघ्न पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. आषाढी वारी हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक परंपरेचा अविभाज्य भाग असून लाखो वारकऱ्यांच्या सेवेला सर्वोच्च प्राधान्य देत सोलापूर जिल्हा परिषद प्रशासनाने केलेली ही व्यापक तयारी वारीच्या यशस्वी आयोजनासाठी महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

या पत्रकार परिषदेस सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक वैद्य, अर्थ व बांधकाम समितीचे सभापती उपाध्यक्ष इंद्रजीत पवार ही उपस्थिती होते

Tags: अध्यक्ष दीपक वैद्यउपाध्यक्ष इंद्रजीत पवारकुशल जैनजिल्हा परिषदप्रशासन विभागमुख्य कार्यकारी अधिकारीसोलापूर
Previous Post

“शेतकऱ्यांच्या वीजप्रश्नी विधानभवनात सुभाष देशमुखांचा आवाज बुलंद”

Next Post

महापालिकेच्या निवडणुकीतील कोट्यवधींच्या बिलावर स्थायी समितीची ‘कात्री’; प्रशासनाला चौकशीचे आदेश

Related Posts

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क
सोलापूर जिल्हा

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा
सोलापूर जिल्हा

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

July 27, 2026
रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन
सोलापूर जिल्हा

रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

July 27, 2026
गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..
सोलापूर जिल्हा

गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..

July 27, 2026
केगावच्या बिग सी कॉलेजमध्ये ; बायोमेडिकल इंजिनिअरिंगच्या ६३ जागांसाठी प्रवेश सुरु.
सोलापूर जिल्हा

केगावच्या बिग सी कॉलेजमध्ये ; बायोमेडिकल इंजिनिअरिंगच्या ६३ जागांसाठी प्रवेश सुरु.

July 27, 2026
उत्कृष्ट नियोजनाला ; मुख्यमंत्र्यांकडून जिल्हा परिषदेचे कौतुक..
सोलापूर जिल्हा

उत्कृष्ट नियोजनाला ; मुख्यमंत्र्यांकडून जिल्हा परिषदेचे कौतुक..

July 26, 2026
Next Post
महापालिकेच्या निवडणुकीतील कोट्यवधींच्या बिलावर स्थायी समितीची ‘कात्री’; प्रशासनाला चौकशीचे आदेश

महापालिकेच्या निवडणुकीतील कोट्यवधींच्या बिलावर स्थायी समितीची 'कात्री'; प्रशासनाला चौकशीचे आदेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

July 27, 2026
रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

July 27, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025