No Result
View All Result
सोलापूर : श्री तोगटवीर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कै. अ. बि. उदगिरी बालक मंदिर, श्री बालक मंदिर, कै. आय्यप्पा ह. आब्बा प्राथमिक विद्यालय आणि श्री चौडेश्वरी प्रशाला यांच्या संयुक्त विद्यमाने ८०वा स्वातंत्र्य दिन उत्साहपूर्ण व देशभक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुभाष चिलवेरी होते. तोगटवीर क्षत्रिय समाजाचे अध्यक्ष नागनाथ कोंतम प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन व ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना तंबाखूमुक्तीची प्रतिज्ञा तसेच मतदार प्रतिज्ञा देण्यात आली.
स्वातंत्र्य दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर नृत्य, गीते, भाषणे तसेच सामूहिक कवायत सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे कार्यक्रमात विशेष रंगत आली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना कॅनरा ज्योति शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात आले. तसेच इंग्रजी भाषा शहरस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका विद्या शिंपी यांनी मनोगत व्यक्त केले. प्रमुख पाहुणे नागनाथ कोंतम यांनी विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देत शिक्षणासोबत देशप्रेम, सामाजिक बांधिलकी आणि जबाबदार नागरिकत्वाची जाणीव विद्यार्थ्यांनी जपावी, असे आवाहन केले.
या प्रसंगी तोगटवीर क्षत्रिय युवक संघटनेचे अध्यक्ष व्यंकटेश यरझल, कॅनरा बँकेच्या मॅनेजर प्रीती जाधव, शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष संतोष उदगिरी, सहसचिव विनायक मादाम, खजिनदार उमेश मायकुंटे, युवराज चिंता, संतोष पुरुड, रामकृष्ण उदगीरी, राकेश उदगीरी, चौडेश्वरी प्रशालेच्या मुख्याध्यापिका सविता यरझल, प्राथमिकच्या मुख्याध्यापिका विद्या शिंपी यांच्यासह शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. शहाजी ठोंबरे यांनी केले, तर आभार प्रदर्शन दिलीप फडतरे यांनी केले. देशभक्तीपर सादरीकरणे, विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव यामुळे श्री तोगटवीर शिक्षण संस्थेतील स्वातंत्र्य दिन सोहळा अविस्मरणीय ठरला.
No Result
View All Result