Monday, September 7, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

१८ दिवसांत ११५ तपासण्या; १३ गुन्हे दाखल, ४ वाहने जप्त ; भेसळखोरांवर FDA ची विशेष कारवाई

Solapur Mirror by Solapur Mirror
August 25, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
१८ दिवसांत ११५ तपासण्या; १३ गुन्हे दाखल, ४ वाहने जप्त ; भेसळखोरांवर FDA ची विशेष कारवाई

सोलापूर : नागरिकांना सुरक्षित व दर्जेदार अन्नपदार्थ मिळावेत, यासाठी अन्न व औषध प्रशासनाने सोलापूर जिल्ह्यात भेसळखोरांविरोधातील मोहीम अधिक तीव्र केली आहे. १ ऑगस्ट ते १८ ऑगस्ट २०२६ या कालावधीत प्रशासनाने तब्बल ११५ तपासण्या केल्या असून, प्रतिबंधित अन्नपदार्थांशी संबंधित १३ प्रकरणांत एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. या कारवाईत चार वाहने जप्त करण्यात आली असून आठ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.अन्न व औषध प्रशासनाकडून अन्नपदार्थांची गुणवत्ता तपासण्यासाठी सातत्याने नमुने घेण्यात येत आहेत.

१ ऑगस्ट ते १८ ऑगस्टदरम्यान अन्नपदार्थांशी संबंधित ११ तपासण्या करण्यात आल्या, तर दूध व दुग्धजन्य पदार्थांचे १४ नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. प्रतिबंधित पदार्थांची विक्री, वाहतूक अथवा साठवणूक करणाऱ्यांवर थेट कारवाई करण्यात येत असल्याने संबंधित व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.यापूर्वी १ एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत अन्नपदार्थांचे तब्बल ५०९ नमुने घेण्यात आले होते. त्यापैकी ४५१ नमुने प्रमाणित आढळले, तर २३ नमुने कमी दर्जाचे, पाच नमुने चुकीच्या लेबलिंगचे आणि २५ नमुने असुरक्षित आढळले. आणखी २४७ नमुन्यांचे अहवाल प्रलंबित असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.दूध व दुग्धजन्य पदार्थांमधील भेसळीवरही प्रशासनाने विशेष लक्ष केंद्रित केले आहे. १ एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत १९४ दूध नमुने घेण्यात आले होते. त्यानंतरही तपासणीची मोहीम सुरू ठेवण्यात आली असून, एप्रिल ते जुलैदरम्यान तसेच ऑगस्ट महिन्यातही मोठ्या प्रमाणावर नमुने घेण्यात आले आहेत.

नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या भेसळखोरांविरोधात कारवाईचा बडगा उगारण्यात आला असून, प्रतिबंधित अन्नपदार्थांच्या प्रकरणांत गुन्हे दाखल करण्यासह वाहने जप्त करून संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यात भेसळयुक्त आणि प्रतिबंधित अन्नपदार्थांची विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त साहेबराव देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई सुरू असून, नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने तपासणी मोहीम आणखी तीव्र करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे

Previous Post

मोची समाजाच्या ३४ वर्षांपासूनच्या मागणीला आमदार देवेंद्र कोठे यांच्या पाठपुराव्यामुळे यश

Next Post

सोलापुरात भाजपची संघटनात्मक रणधुमाळी; प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे जंगी स्वागत

Related Posts

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले
सोलापूर जिल्हा

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..
सोलापूर जिल्हा

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट
सोलापूर जिल्हा

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार
सोलापूर जिल्हा

बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार

September 2, 2026
शालार्थ घोटाळ्याचा ‘हिशेब’ आता डिसेंबरअखेर! ; उपसचिवांनी काढला आदेश
सोलापूर जिल्हा

शालार्थ घोटाळ्याचा ‘हिशेब’ आता डिसेंबरअखेर! ; उपसचिवांनी काढला आदेश

September 2, 2026
विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात ‘क्रीडा’ विषयाचा समावेश व्हावा
सोलापूर जिल्हा

विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात ‘क्रीडा’ विषयाचा समावेश व्हावा

September 2, 2026
Next Post
सोलापुरात भाजपची संघटनात्मक रणधुमाळी; प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे जंगी स्वागत

सोलापुरात भाजपची संघटनात्मक रणधुमाळी; प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे जंगी स्वागत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In