Monday, September 7, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

‘श्री स्वामी समर्थ’ विशेषांकाचे वटवृक्ष मंदिरात प्रकाशन

Solapur Mirror by Solapur Mirror
August 21, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
‘श्री स्वामी समर्थ’ विशेषांकाचे वटवृक्ष मंदिरात प्रकाशन

अक्कलकोट; अक्कलकोटच्या श्री वटवृक्ष निवासी श्री स्वामी समर्थांची कीर्ती आणि त्यांच्या कार्याचा महिमा जगभर पोहोचविण्यासाठी विशेषांकाच्या माध्यमातून होत असलेले कार्य कौतुकास्पद असून, या विशेषांकामुळे स्वामी भक्तांना समृद्ध व अभ्यासपूर्ण साहित्य उपलब्ध होईल, असा विश्वास श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा भाजप नगरसेवक महेश इंगळे यांनी व्यक्त केला. मिरज येथील स्वामीभक्त अनिल दबडे यांनी संपादित केलेल्या ‘श्री स्वामी समर्थ’ विशेषांकाचे प्रकाशन श्री वटवृक्ष मंदिरातील स्वामींच्या गाभाऱ्यासमोर महेश इंगळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी दैनिक संचारचे मुख्य वरिष्ठ उपसंपादक प्रशांत जोशी, कवी मारुती कटकधोड तसेच विशेषांकाचे संपादक अनिल दबडे उपस्थित होते.

विशेषांकाच्या प्रकाशनानंतर बोलताना महेश इंगळे यांनी अंकाच्या दर्जेदार मांडणीचे आणि त्यातील लेखांचे विशेष कौतुक केले. अंकातील प्रत्येक लेख वाचनीय असून, श्री स्वामी समर्थांच्या कार्याचा आणि विचारांचा प्रसार करण्यासाठी हा विशेषांक निश्चितच महत्त्वपूर्ण ठरेल, असे त्यांनी सांगितले. स्वामींच्या भक्तीपरंपरेशी संबंधित विविध विषयांचा समावेश या अंकात करण्यात आल्याने भाविकांसाठी तो संग्राह्य ठरेल, असेही त्यांनी नमूद केले. यावेळी महेश इंगळे यांच्या हस्ते विशेषांकाचे संपादक अनिल दबडे यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद व प्रतिमा देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. प्रकाशन सोहळ्यामुळे मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. स्वामी भक्तांसह मंदिर समितीचे पदाधिकारी आणि विश्वस्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी स्वामीभक्त सखुबाई दबडे, संगीता दबडे, ऋषभ देव, ज्ञानेश्वर आवटी, मंदिर समितीचे प्रथमेश इंगळे, सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, श्रीशैल गवंडी, प्रसाद सोनार, विपूल जाधव, श्रीकांत मलवे, स्वामीनाथ लोणारी, सागर गोंडाळ, व्यंकटेश पुजारी यांच्यासह भाविक भक्त उपस्थित होते.

Previous Post

पाण्यासाठी सोलापूरकरांचे ‘एक पाऊल पुढे’; ५ हजार ११५ जणांचा ‘वॉक फॉर वॉटर’!

Next Post

मार्डीच्या यमाई मंदिर रस्त्याला ‘काँक्रिट’चा आधार; दीड कोटींच्या कामाचे भूमिपूजन

Related Posts

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले
सोलापूर जिल्हा

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..
सोलापूर जिल्हा

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट
सोलापूर जिल्हा

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार
सोलापूर जिल्हा

बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार

September 2, 2026
शालार्थ घोटाळ्याचा ‘हिशेब’ आता डिसेंबरअखेर! ; उपसचिवांनी काढला आदेश
सोलापूर जिल्हा

शालार्थ घोटाळ्याचा ‘हिशेब’ आता डिसेंबरअखेर! ; उपसचिवांनी काढला आदेश

September 2, 2026
विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात ‘क्रीडा’ विषयाचा समावेश व्हावा
सोलापूर जिल्हा

विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात ‘क्रीडा’ विषयाचा समावेश व्हावा

September 2, 2026
Next Post
मार्डीच्या यमाई मंदिर रस्त्याला ‘काँक्रिट’चा आधार; दीड कोटींच्या कामाचे भूमिपूजन

मार्डीच्या यमाई मंदिर रस्त्याला ‘काँक्रिट’चा आधार; दीड कोटींच्या कामाचे भूमिपूजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In