Monday, September 7, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

मार्कंडेय रथोत्सवासाठी महापालिकेचा ‘ॲक्शन प्लॅन’;मिरवणूक मार्ग होणार ‘खड्डेमुक्त’!

Solapur Mirror by Solapur Mirror
August 24, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
मार्कंडेय रथोत्सवासाठी महापालिकेचा ‘ॲक्शन प्लॅन’;मिरवणूक मार्ग होणार ‘खड्डेमुक्त’!

सोलापूर : पद्मशाली समाजाचे कुलदैवत श्री मार्कंडेय महामुनी यांच्या रथोत्सवाची भव्य मिरवणूक यंदा सुरक्षित, शिस्तबद्ध आणि निर्विघ्न पार पडावी, यासाठी सोलापूर महानगरपालिका प्रशासनाने कंबर कसली आहे. मिरवणूक मार्गावरील खड्डे, अडथळे, वाढलेल्या झाडांच्या फांद्या, ड्रेनेज तसेच विद्युत व्यवस्थेच्या प्रश्नांवर तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश महापौर विनायक कोंड्याल यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

रथोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापौर कार्यालयात आयोजित बैठकीत मिरवणुकीच्या संपूर्ण मार्गाचा नागरी सुविधा आणि सुरक्षेच्या दृष्टीने आढावा घेण्यात आला. मोठ्या संख्येने भाविक आणि नागरिक मिरवणुकीत सहभागी होत असल्याने कोणत्याही ठिकाणी गैरसोय किंवा अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या. पद्मशाली संस्थेचे अध्यक्ष सुरेश फलमारी यांनी मिरवणुकीच्या नियोजनाची सविस्तर माहिती प्रशासनास दिली. मार्गावरील रस्त्यांची दुरुस्ती, खड्डे बुजविणे, वाहतुकीला अडथळा ठरणारे साहित्य हटविणे, झाडांच्या फांद्यांची छाटणी, ड्रेनेजची आवश्यक कामे तसेच विद्युत आणि अग्निशमन विभागाशी संबंधित उपाययोजनांकडे त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले. रथोत्सवाच्या दिवशी गर्दीचा मोठा ताण येण्याची शक्यता लक्षात घेता रस्ते, स्वच्छता, ड्रेनेज, विद्युत व्यवस्था, अग्निशमन यंत्रणा आणि वाहतूक नियोजन यांचा एकत्रित आढावा घेण्यात आला. महापौरांनी संबंधित अधिकाऱ्यांना केवळ कागदोपत्री नियोजन न करता मिरवणूक मार्गाची प्रत्यक्ष पाहणी करून प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले.

“श्री मार्कंडेय महामुनी रथोत्सव हा पद्मशाली समाजाच्या श्रद्धेचा आणि सोलापूरच्या सांस्कृतिक परंपरेचा महत्त्वाचा भाग आहे. मिरवणूक सुरळीत आणि सुरक्षित वातावरणात पार पाडण्यासाठी महानगरपालिका प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे. आवश्यक नागरी सुविधा वेळेत उपलब्ध करून दिल्या जातील,” असे महापौर विनायक कोंड्याल यांनी स्पष्ट केले.

रथोत्सवाच्या तयारीत रस्ते विभागाबरोबरच विद्युत, अग्निशमन, स्वच्छता आणि ड्रेनेज विभागाने परस्पर समन्वय ठेवण्यावर बैठकीत विशेष भर देण्यात आला. मिरवणुकीच्या मार्गावर अडथळा ठरणाऱ्या बाबी आधीच दूर करून नागरिकांना सुरक्षित मार्ग उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

बैठकीस उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, सभागृह नेते नरेंद्र काळे, स्थायी समिती सभापती रंजीता चाकोते, शहराध्यक्ष तथा नगरसेविका रोहिणी तडवळकर, माजी महापौर कांचना यन्नम, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, नगर अभियंता नीलकंठ मठपती यांच्यासह महापालिकेचे अधिकारी आणि पद्मशाली समाजाचे पदाधिकारी उपस्थित होते. रथोत्सवाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या बैठकीमुळे मिरवणुकीच्या तयारीला वेग आला असून, रस्त्यांपासून सुरक्षेपर्यंत प्रत्येक व्यवस्था सज्ज ठेवण्याचे आव्हान महापालिका प्रशासनासमोर आहे.

Previous Post

सणासुदी आधी महागाईचा ‘श्रीगणेशा’; किराण्याच्या वाढत्या दरांनी गृहिणी हैराण

Next Post

सोलापुरात २० ई-बसेस दाखल ; मात्र रस्त्यावर धावण्यासाठी प्रशासनाचा लाल कंदील ..

Related Posts

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले
सोलापूर जिल्हा

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..
सोलापूर जिल्हा

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट
सोलापूर जिल्हा

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार
सोलापूर जिल्हा

बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार

September 2, 2026
शालार्थ घोटाळ्याचा ‘हिशेब’ आता डिसेंबरअखेर! ; उपसचिवांनी काढला आदेश
सोलापूर जिल्हा

शालार्थ घोटाळ्याचा ‘हिशेब’ आता डिसेंबरअखेर! ; उपसचिवांनी काढला आदेश

September 2, 2026
विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात ‘क्रीडा’ विषयाचा समावेश व्हावा
सोलापूर जिल्हा

विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात ‘क्रीडा’ विषयाचा समावेश व्हावा

September 2, 2026
Next Post
सोलापुरात २० ई-बसेस दाखल ; मात्र रस्त्यावर धावण्यासाठी प्रशासनाचा लाल कंदील ..

सोलापुरात २० ई-बसेस दाखल ; मात्र रस्त्यावर धावण्यासाठी प्रशासनाचा लाल कंदील ..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In