सोलापूर ; राज्यातील विविध सामाजिक घटकांतील विद्यार्थ्यांना एमपीएससी, यूपीएससी आदी स्पर्धा परीक्षांना सक्षमपणे बसता यावे, यासाठी पूर्व प्रशिक्षण दिले जाते. या पूर्व प्रशिक्षणासाठी सरसकट ३० वर्षांची कमाल वयोमर्यादा निश्चित करण्याचा फेरविचार करण्याची मागणी स्पर्धा परीक्षा विद्यार्थी असोसिएशनने शासनाकडे केली होती आणि त्यानुसार अखेर निर्णय झाल्याने हजारो विद्यार्थांना फायदा होईल.
आर्टी, बार्टी, टीआरटीआय, सारथी, महाज्योती, अमृत, वनार्टी आदी संस्थांच्या माध्यमातून वंचित, मागास, आदिवासी, ग्रामीण आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी प्रशिक्षण दिले जाते. या योजनांचा लाभ अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणे अपेक्षित असताना, प्रशिक्षणासाठी ३० वर्षांची मर्यादा अनेकांना अडथळा ठरत असल्याचा दावा करण्यात येतो.
विसंगत असल्याचा विद्यार्थ्यांचे मत आहे. एमपीएससी, यूपीएससीच्या विविध परीक्षांसाठी अनेकांना ३० वर्षांनंतरही परीक्षा देण्याची संधी असते. अशा परिस्थितीत उमेदवार कायदेशीरदृष्ट्या पात्र असताना त्याला पूर्व प्रशिक्षणासाठी केवळ वयाच्या निकषावर अपात्र ठरविणे कितपत योग्य, असा मूलभूत प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. आता शासन त्यावर निर्णय घेतला आहे.त्यामुळे वारंवार संघटनेच्या पाठपुरावामुळे निर्णय झाला.
_अखेर शासन निर्णय निर्गमित सदरच्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे टीआरटीआय, बार्टी, सारथी, अमृत आणि आर्टी या संस्थांच्या लक्षित गटातील पात्र व इच्छुक उमेदवारांना सूचित करण्यात येते की, संबधित संस्थांच्या विविध योजनांच्या लाभार्थी निवडी करीता घेण्यात येणाऱ्या सामायिक चाळणी परीक्षा २०२६ साठी निर्धारित करण्यात आलेली कमाल ३० वर्षे वयोमर्यादा शिथिल करण्यात आलेली आहे. त्यामुळे उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज सादर करण्यापूर्वी स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजना व संस्थेनुसार लागू असलेली सुधारित किमान वयोमर्यादा निकष संबंधित संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या सूचनेनुसार काळजीपूर्वक तपासून ऑनलाईन अर्ज सादर करावा.
तरी सदर ऑनलाईन अर्ज प्रक्रियेस दि.०४ सप्टेंबर, २०२६, रात्री ११.५९ वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. तद्नंतर त्यास कोणत्याही प्रकारची मुदतवाढ देण्यात येणार नाही, याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी. असे शासनाच्या पत्रानुसार स्पष्ट करण्यात आले आहे.__ प्रशांत शिरगुर; राज्य उपाध्यक्ष स्पर्धा परीक्षा विद्यार्थी असो. महाराष्ट्र