नूतन कार्यकारिणीची बिनविरोध निवड; शिस्तबद्ध मिरवणूक, सामाजिक सलोख्यावर भर
सोलापूर : शहरातील बाळीवेस परिसरात ऐतिहासिक आणि धार्मिक परंपरा लाभलेल्या श्रीमंत मानाचा कसबा गणपती मंडळाच्या सन २०२६-२७ च्या उत्सव समिती अध्यक्षपदी जगदीश हिरेहब्बू यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. मंडळाच्या श्री मंदिरात झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत नूतन कार्यकारिणीची निवड जाहीर करण्यात आली.
उपाध्यक्षपदी सुभाष गुंदगी, शिवानंद सोन्ना व अजय येळमेली, तर सचिवपदी पुष्कराज मेत्री यांची बिनविरोध निवड झाली. खजिनदारपदी केदार मेंगाणे यांची निवड करण्यात आली. मिरवणूक प्रमुख म्हणून सोमनाथ मेंगाणे, अनिल मसरे, अमित गुंगे, योगीराज भोगडे व प्रशांत धुम्मा यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली. लेझिम प्रमुख म्हणून कैलास मेंगाणे, महेश बुगडे, केतन भोगडे, कृष्णा सुरेराव व योगेश हदरे यांची निवड करण्यात आली. सभेच्या प्रारंभी विश्वस्त व खजिनदार केदार मेंगाणे यांनी मंडळाच्या वर्षभरातील कामकाजाचा अहवाल सादर केला. ट्रस्टी सचिव मल्लिनाथ खुने यांनी स्वागत व सूत्रसंचालन केले. यावेळी त्यांनी मंडळाच्या ऐतिहासिक परंपरेसह शिस्त आणि सामाजिक उपक्रमांचा आढावा घेतला.
निवडीनंतर नूतन अध्यक्ष जगदीश हिरेहब्बू यांनी पदभार स्वीकारत श्रींची महाआरती केली. माजी उत्सव अध्यक्ष बाळासाहेब मुस्तारे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. मंडळाची ऐतिहासिक परंपरा व सामाजिक बांधिलकी कायम राखत नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यासह शिस्तबद्ध मिरवणूक आणि सामाजिक सलोख्याने गणेशोत्सव साजरा केला जाईल, असा विश्वास हिरेहब्बू यांनी व्यक्त केला. सभेस ट्रस्टी अध्यक्ष सोमनाथ भोगडे, उपाध्यक्ष प्रकाश वाले, विश्वस्त मल्लिनाथ मसरे, गुरुलिंग समाणे, शिवशंकर कोळकूर, सुधीर थोबडे, नागनाथ मेंगाणे यांच्यासह पदाधिकारी, विश्वस्त व कार्यकर्ते उपस्थित होते.