Wednesday, October 28, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

२४ वर्षांचा संघर्ष… २३८ घरांची स्वप्नपूर्ती ; म्हाडाच्या २३८ सदनिकांची सोडत

Solapur Mirror by Solapur Mirror
September 12, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
२४ वर्षांचा संघर्ष… २३८ घरांची स्वप्नपूर्ती ; म्हाडाच्या २३८ सदनिकांची सोडत
0
SHARES
48
VIEWS

सोलापूर : दोन तपांहून अधिक काळापासून प्रतीक्षेत असलेल्या पत्रकारांच्या हक्काच्या घरांच्या स्वप्नपूर्तीच्या दिशेने शनिवारी महत्त्वाचे पाऊल पडले. पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या (म्हाडा) उपविभाग सोलापूरअंतर्गत सी.एस. क्र. २३२ येथे प्रधानमंत्री आवास योजनेत बांधण्यात आलेल्या २३८ सदनिकांची सोडत मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडली. यामध्ये १२६ अत्यल्प उत्पन्न गट (EWS) आणि ११२ अल्प उत्पन्न गटातील (LIG) सदनिकांचा समावेश आहे.

या कार्यक्रमास राज्यसभा खासदार डॉ. ज्योती वाघमारे, लोकसभेच्या खासदार प्रणिती शिंदे, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार देवेंद्र कोठे, जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष तथा नगरसेवक मनीष केत, उपमुख्य अधिकारी पुणे मंडळ राहुल शिळीमकर, प्र कार्यकारी अभियंता पुणे मंडळ मिलिंद अटकळे, मिळकत व्यवस्थापक रूपेश जयभाये, सोलापूर उपविभा सूरज अजनाळकर , सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे, संपादक प्रशांत माने, खजिनदार किरण बनसोडे, उपाध्यक्ष आफताब शेख, महाराष्ट्र राज्य पत्रकार अधिस्वीकृती समितीचे सदस्य प्रमोद बोडके यांच्यासह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

आमदार देवेंद्र कोठे यांनी पत्रकार संघटनांनी तब्बल २४ वर्षे केलेल्या पाठपुराव्याचा उल्लेख केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात जागा निश्चित होऊन भूमिपूजन झाल्याचे सांगत, पत्रकारांना घर मिळेपर्यंत पाठपुरावा सुरूच राहील, असे त्यांनी स्पष्ट केले. सोडत प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक असावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. तसेच गुढीपाडव्यापूर्वी पत्रकारांच्या हातात घराची चावी देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले. आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी पत्रकारांच्या आर्थिक परिस्थितीचा उल्लेख करत सदनिकांची किंमत आणखी कमी करण्यासाठी शासन, सीएसआर आणि इतर माध्यमांतून निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. पत्रकारांसाठीचा हा प्रकल्प देशातील पहिला असल्याचेही त्यांनी नमूद केले.

खासदार डॉ. ज्योती वाघमारे यांनी पत्रकार म्हणून आपल्या कारकिर्दीतील आठवणी सांगत, बाह्य सुविधांसाठी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून ७ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणल्याचे सांगितले. या निधीमुळे प्रत्येक सदनिकेची किंमत सुमारे २ ते २.५ लाख रुपयांनी कमी होण्यास मदत होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. प्रास्ताविक उपमुख्य अधिकारी पुणे मंडळ राहुल शिळीमकर यांनी केले. सूत्रसंचालन श्वेता हुल्ले यांनी केले. यावेळी म्हाडाचे सोमनाथ रावळे, गोरक्षनाथ कुलट, बालकृष्ण दावनपल्ली , प्रमोद शिंदे , सतीश लष्करे , हरिदास देशमुख , सुमित उभाळे, वर्षा घोरपडे, सुनीता गोडसे यांच्यासह म्हाडाचे अधिकारी तसेच सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे पदाधिकारी व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Previous Post

‘सोलापूर जनता’बँकेच्या यंदा सुवर्णपर्वात ज्ञान-संस्कृतीचा उत्सव

Next Post

राजूबाई मॅटर्निटी होमच्या बीओटी प्रस्तावावर नगरसेवक किसान जाधव आक्रमक

Related Posts

निकालाचा सस्पेन्स कायम; हर्षदांच्या आघाडीने कार्यकर्त्यांना हर्ष!
सोलापूर जिल्हा

निकालाचा सस्पेन्स कायम; हर्षदांच्या आघाडीने कार्यकर्त्यांना हर्ष!

October 28, 2026
गणपती घाटावरील अस्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर; नगरसेवक सात्विक बडवे सरसावले!
सोलापूर जिल्हा

गणपती घाटावरील अस्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर; नगरसेवक सात्विक बडवे सरसावले!

October 27, 2026
सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन..!
सोलापूर जिल्हा

सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन..!

October 27, 2026
सोलापूर जिल्ह्यातील पावणेदहा लाख बालकांना जंतमुक्तीचे कवच!
सोलापूर जिल्हा

सोलापूर जिल्ह्यातील पावणेदहा लाख बालकांना जंतमुक्तीचे कवच!

October 27, 2026
स्पर्धा परीक्षांच्या स्वप्नांना ‘बालाजी अमाईन्स’चे बळ!
सोलापूर जिल्हा

स्पर्धा परीक्षांच्या स्वप्नांना ‘बालाजी अमाईन्स’चे बळ!

October 27, 2026
जिल्हा बँकेच्या सत्तेसाठी राजकीय रणसंग्राम; गोरे विरुद्ध मोहिते-पाटील संघर्षाची चाहूल!
सोलापूर जिल्हा

जिल्हा बँकेच्या सत्तेसाठी राजकीय रणसंग्राम; गोरे विरुद्ध मोहिते-पाटील संघर्षाची चाहूल!

October 27, 2026
Next Post
राजूबाई मॅटर्निटी होमच्या बीओटी प्रस्तावावर नगरसेवक किसान जाधव आक्रमक

राजूबाई मॅटर्निटी होमच्या बीओटी प्रस्तावावर नगरसेवक किसान जाधव आक्रमक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

निकालाचा सस्पेन्स कायम; हर्षदांच्या आघाडीने कार्यकर्त्यांना हर्ष!

निकालाचा सस्पेन्स कायम; हर्षदांच्या आघाडीने कार्यकर्त्यांना हर्ष!

October 28, 2026
गणपती घाटावरील अस्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर; नगरसेवक सात्विक बडवे सरसावले!

गणपती घाटावरील अस्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर; नगरसेवक सात्विक बडवे सरसावले!

October 27, 2026
सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन..!

सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन..!

October 27, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In