Monday, September 7, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

शेगावीच्या राणाचे उळेगावात आगमन ; पालखीवर फुलांचा वर्षाव, रांगोळीच्या पायघड्या.

Solapur Mirror by Solapur Mirror
July 17, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
शेगावीच्या राणाचे उळेगावात आगमन ; पालखीवर फुलांचा वर्षाव, रांगोळीच्या पायघड्या.

७०० वारकऱ्यांचे स्वागत

सोलापूर ; टाळ मृदूगांचा गजर. जय जय विठोबा रखुमाई… सुंदर ते ध्यान उभे विटेवर… जय जय गुरू महाराज गुरू असा भजनाचा जयघोष सुरू होता. महाराजांच्या पाखलीचे दर्शन घेण्यासाठी अबालवृध्द तुळजापूर-सोलापूर रस्त्यांच्या दुर्तफा लोटले होते. महाराजांचे रूप आपल्या डोळ्यात साठवण्यासाठी सगळेच आतुर होते. माऊली… माऊली म्हणत प्रत्येकजण पाखलीचे दर्शन घेत होता. हा भक्ती आणि चैतन्य गजानन महाराज पालखी सोहळ्याचा होता. शुक्रवारी सायंकाळी चारच्या सुमाराला पालखी सोहळा सोलापूर जिल्हयातील गंगेवाडी फाटयाजवळे भाविकांनी दर्शनासाठी अलोट गर्दी होती. फुलांचा वर्षाव, टाळ घोषाचा निनाद मनाला आनंद व मांगल्य देऊन गेला. लहान थोरांचे हात ओपाआप जोडले जात होते. सायकांळी सहाच्या सुमाराला तळेगावात शेगावीचा राणा गजानन महाराज यांचा सोहळा विसावला, गावकऱ्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.

पालखी मार्गापासून रांगोळीच्या पायघड्या घातल्या होत्या. वारकऱ्यांसाठी उभारण्यात आलेल्या वॉटरप्रूफ तंबूत वारकरी विसावले. गावकरी यांची लगबग सुरूच होती. स्वयंपाकासाठी अनेकजण झटत होते. भाविकांसाठी तयार होत असलेल्या प्रसादाचा सुंगध, फुलांचा गंध आणि भक्तीचा मेळा जणू विठ्ठल नामात एकरूप झाला होता. प्रशासनाच्या वतीने सोलापूर जिल्हा सीमेवर कासेगावजवळ हद्दीवर झालेल्या या स्वागत सोहळ्याला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, उपविभागीय अधिकारी सदाशिव पडदुणे, उपविभागीय अधिकारी सुमित शिंदे, अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, दक्षिण सोलापूरचे तहसीलदार किरण जमदाडे, पोलीस निरीक्षक कुंदन गावडे, गटविकास अधिकारी मनोज राऊत, सहाय्यक गटविकास अधिकारी सनी चव्हाण, दक्षिण सोलापूर तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नीलम घोगरे, पंचायत समिती दक्षिण सोलापूरचे सभापती संदीप ढवळे, उपसभापती वर्षा पटणे तसेच जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ उपस्थित होते. पालखीचे स्वागत करण्यात आले .

उद्या कुचनमध्ये मुक्काम
पहाटे साडेपाचला पालखी उळेगावातून प्रस्थान ठेवेल.
सकाळी साडेसात ते नऊया दरम्यान तळे हिप्परगा येथील मश्रूम गणपती मंदिरासमोर पालखी आल्यानंतर गजानन महाराजांची आरती होती. पन्नास वर्षापासून हा उपक्रम असल्याचे पुजारी संजय पतंगे यांनी सांगितले. दुपारी साडेअकराला पालखी सम्राट चौकातील सद्गुरू प्रभाकर महाराज मंदिरात आल्यानंतर संत भेटीचा सोहळा, आरती आहे. सायंकाळी सहाला पालखी सोहळा कुचन प्रशाला येथे मुक्कामी आहे.

  • २२ दिवसांचा प्रवास
  • दोन जून रोजी पालखी शेगाव हुन प्रस्थान ठेवले
  • २८ जून रोजी सोलापूर जिल्ह्यात आली
  • ७०० वारकरी, त्यापैकी ४०० टाळकरी,
  • दोन अश्व, नऊ वाहने आहेत
  • पालखी सोहळा पायी वारीचे यंदा ५६ वे वर्ष आहे
  • पालखी सोहळ्याचा प्रवास नऊ जिल्हयातून, २२ दिवसाचा व ७५० किलोमीटरचा आहे.

प्रसादाची तयारी जय्यत
शंभरहून अधिकजण सकाळपासून भाजी चिरणे, धान्य निवडणे तयारी करीत होते. चपाती, आमटी, भाजी, शिरा, भात, कडक भाकरी असा प्रसाद होता. पाचशेहून अधिक स्वयंसवेक व संपूर्ण गावच तयारीसाठी सज्ज होता. स्वच्छतागृह, सीसीटीव्ही कॅमेरे, गरम पाण्याची सोय, पायाचे मसाज करण्यासाठी मशीनची सोय होती. सायंकाळी पालखी गावात आल्यानंतर आरती झाली. प्रसाद वाटप झाले. दर्शनासाठी गर्दी होती

Tags: जिल्हा परिषदनगरसेवकराजकारणसोलापूरसोलापूर महापालिका
Previous Post

गावठी पिस्तूल, काडतुसे अन् साडेपाच लाखांची रोकड जप्त ; एमआयडीसी पोलिसांची कारवाई

Next Post

नालेसफाईत ५० लाखांच्या गैरव्यवहाराचा आरोप; भाजप नगरसेवक अनंत जाधव आक्रमक

Related Posts

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले
सोलापूर जिल्हा

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..
सोलापूर जिल्हा

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट
सोलापूर जिल्हा

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार
सोलापूर जिल्हा

बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार

September 2, 2026
शालार्थ घोटाळ्याचा ‘हिशेब’ आता डिसेंबरअखेर! ; उपसचिवांनी काढला आदेश
सोलापूर जिल्हा

शालार्थ घोटाळ्याचा ‘हिशेब’ आता डिसेंबरअखेर! ; उपसचिवांनी काढला आदेश

September 2, 2026
विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात ‘क्रीडा’ विषयाचा समावेश व्हावा
सोलापूर जिल्हा

विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात ‘क्रीडा’ विषयाचा समावेश व्हावा

September 2, 2026
Next Post
नालेसफाईत ५० लाखांच्या गैरव्यवहाराचा आरोप; भाजप नगरसेवक अनंत जाधव आक्रमक

नालेसफाईत ५० लाखांच्या गैरव्यवहाराचा आरोप; भाजप नगरसेवक अनंत जाधव आक्रमक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In