Wednesday, September 9, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

सोलापूर महापालिकेत रुग्णवाहिकांचा मोठा ‘स्कॅम’? ८ रुग्णवाहिका बंद अवस्थेत; अमोल शिंदे कडाडले!

Solapur Mirror by Solapur Mirror
March 11, 2026
in सोलापूर शहर, सोलापूर जिल्हा
0
सोलापूर महापालिकेत रुग्णवाहिकांचा मोठा ‘स्कॅम’? ८ रुग्णवाहिका बंद अवस्थेत; अमोल शिंदे कडाडले!
0
SHARES
9
VIEWS

सोलापूर : महानगरपालिकेच्या रुग्णवाहिका सेवेमध्ये मोठ्या प्रमाणात गडबड झाली आहे. पंधरापैकी आठ रुग्णवाहिका बंद अवस्थेत आहेत. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. महापालिकेकडे असलेल्या रुग्णवाहिकांपैकी अनेक गाड्या बंद अवस्थेत असल्याने नागरिकांना वेळेवर आरोग्य सेवा मिळण्यात अडचणी निर्माण होत असल्याचा आरोप शिवसेना शिंदे गटाचे गटनेते अमोल शिंदे यांनी केला आहे.

शिवसेना शिंदे गटाचे महापालिकेचे गटनेते अमोल शिंदे यांनी बुधवारी सोलापूर शासकीय रुग्णालयासमोर असलेल्या रुग्णवाहिका स्थळाला भेट दिली असता धक्कादायक स्थिती समोर आली. महापालिकेकडे एकूण सुमारे १७ रुग्णवाहिका असताना त्यापैकी ८ रुग्णवाहिका पूर्णपणे बंद असल्याचे आढळून आले. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी सोलापूर महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. राखी माने यांच्याकडूनही माहिती घेतली. त्यांनी या सेवेत येणाऱ्या अडचणी सांगितल्या.

२०२२ ते २०२४ या कालावधीत रुग्णवाहिका खरेदी प्रक्रियेदरम्यान तब्बल २३ फेरफार झाल्याचा आरोपही त्यांनी केला. एवढ्या फेरफारानंतरही आज अनेक रुग्णवाहिका बंद पडलेल्या असणे ही गंभीर बाब असल्याचे त्यांनी नमूद केले. “रुग्णांना वेळेवर सेवा मिळत नसेल तर आम्हाला आंदोलन केल्याशिवाय पर्याय राहणार नाही. नागरिकांच्या आरोग्याशी खेळ होऊ देणार नाही,” असा इशारा शिंदे यांनी दिला.

ड्रायव्हरना वेतन देण्यासाठी निधी नसल्याचे कारण दिले जात असल्यास तेही चुकीचे असल्याचे त्यांनी सांगितले. “जर रुग्णवाहिकांसाठी पैसे नाहीत, तर अधिकाऱ्यांच्या व पदाधिकाऱ्यांच्या गाड्या बंद कराव्यात. काही पदाधिकाऱ्यांच्या गाड्यांवर दोन-दोन चालक आहेत, पण रुग्णवाहिकांना चालक नाहीत, ही सोलापूरकरांसाठी अत्यंत दुर्दैवी बाब आहे,” असा सवाल शिंदे यांनी उपस्थित केला. महापालिका आयुक्तांनी या प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन बंद पडलेल्या रुग्णवाहिका दुरुस्त करून सेवा सुरळीत करावी, अशी मागणीही अमोल शिंदे यांनी केली.

Previous Post

मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागात महिला दिन उत्साहात

Next Post

सत्ताधारी परिवार पॅनलची माहिती : सोलापूर जनता बँक संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणूक

Related Posts

‘ब्रेकिंग न्यूज’च्या धावपळीत आरोग्याला ब्रेक नको ; सहाय्यक पोलीस आयुक्त दिलीप पवार
सोलापूर जिल्हा

‘ब्रेकिंग न्यूज’च्या धावपळीत आरोग्याला ब्रेक नको ; सहाय्यक पोलीस आयुक्त दिलीप पवार

September 9, 2026
मटक्याच्या अड्ड्यावर पोलिसांची धडक; फॉर्च्युनरसह ३० लाखांचा मुद्देमाल जप्त
क्राईम

मटक्याच्या अड्ड्यावर पोलिसांची धडक; फॉर्च्युनरसह ३० लाखांचा मुद्देमाल जप्त

September 9, 2026
शिक्षकांच्या आरोग्याला ‘कॅशलेस’ आधार ; मंगेश चिवटेच्या मागणीला शासनाचा सकारात्मक प्रतिसाद
सोलापूर जिल्हा

शिक्षकांच्या आरोग्याला ‘कॅशलेस’ आधार ; मंगेश चिवटेच्या मागणीला शासनाचा सकारात्मक प्रतिसाद

September 9, 2026
पावसाने मारली दडी ; चक्क शेतकऱ्याने फिरवला उडदावर रोटर!
शेती

पावसाने मारली दडी ; चक्क शेतकऱ्याने फिरवला उडदावर रोटर!

September 9, 2026
विद्यार्थी बनले शिक्षक; अनुभवला अध्यापनाचा ‘एक तास’
सोलापूर जिल्हा

विद्यार्थी बनले शिक्षक; अनुभवला अध्यापनाचा ‘एक तास’

September 9, 2026
मुख्यमंत्र्यांपासून आमदारांपर्यंत ; ‘देवेंद्रां’ना ‘देवेंद्रां’च्या खास शुभेच्छा!
सोलापूर जिल्हा

मुख्यमंत्र्यांपासून आमदारांपर्यंत ; ‘देवेंद्रां’ना ‘देवेंद्रां’च्या खास शुभेच्छा!

September 8, 2026
Next Post
सत्ताधारी परिवार पॅनलची माहिती : सोलापूर जनता बँक संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणूक

सत्ताधारी परिवार पॅनलची माहिती : सोलापूर जनता बँक संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणूक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘ब्रेकिंग न्यूज’च्या धावपळीत आरोग्याला ब्रेक नको ; सहाय्यक पोलीस आयुक्त दिलीप पवार

‘ब्रेकिंग न्यूज’च्या धावपळीत आरोग्याला ब्रेक नको ; सहाय्यक पोलीस आयुक्त दिलीप पवार

September 9, 2026
मटक्याच्या अड्ड्यावर पोलिसांची धडक; फॉर्च्युनरसह ३० लाखांचा मुद्देमाल जप्त

मटक्याच्या अड्ड्यावर पोलिसांची धडक; फॉर्च्युनरसह ३० लाखांचा मुद्देमाल जप्त

September 9, 2026
शिक्षकांच्या आरोग्याला ‘कॅशलेस’ आधार ; मंगेश चिवटेच्या मागणीला शासनाचा सकारात्मक प्रतिसाद

शिक्षकांच्या आरोग्याला ‘कॅशलेस’ आधार ; मंगेश चिवटेच्या मागणीला शासनाचा सकारात्मक प्रतिसाद

September 9, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In