Monday, July 27, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

जिल्ह्यात ११ हजार शिक्षकांच्या ८० कोटींची बिले रखडली; वेतन पथकावर वाढला ताण

Solapur Mirror by Solapur Mirror
July 7, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
जिल्ह्यात ११ हजार शिक्षकांच्या ८० कोटींची बिले रखडली; वेतन पथकावर वाढला ताण
0
SHARES
17
VIEWS

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील सुमारे ११ हजार माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची तब्बल ८० कोटी रुपयांची विविध देयकांची बिले प्रलंबित असल्याने शिक्षकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. वेतन, भविष्य निर्वाह निधी (जीपीएफ), निवृत्तीवेतन, सेवा पडताळणी, वेतन फरक, वैद्यकीय परतावा तसेच इतर आर्थिक मंजुरीची अनेक प्रकरणे महिनोनमहिने प्रलंबित असल्याची माहिती समोर आली आहे.वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक (माध्यमिक), सोलापूर येथील अधीक्षक पद रिक्त झाल्यानंतर कार्यालयीन कामकाजावर मोठा परिणाम झाला होता.

त्यामुळे जिल्हाभरातील हजारो शिक्षकांच्या आर्थिक प्रस्तावांचा निपटारा रखडला. परिणामी सुमारे ८० कोटी रुपयांची बिले मंजुरीच्या प्रतीक्षेत असल्याचे सांगितले जात आहे.या पार्श्वभूमीवर प्रशासनाने वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक (प्राथमिक)चे अधीक्षक भारत कारसले यांच्याकडे माध्यमिक पथकाचा अतिरिक्त कार्यभार सोपविला आहे. या निर्णयामुळे प्रलंबित प्रस्तावांचा निपटारा वेगाने होईल, अशी अपेक्षा शिक्षक व कर्मचारी व्यक्त करत आहेत.

शिक्षक संघटनांनीही प्रलंबित बिलांचा तातडीने निपटारा करून शिक्षकांना आर्थिक दिलासा देण्याची मागणी केली आहे. विशेषतः निवृत्तीवेतन, जीपीएफ, वेतन फरक आणि इतर आर्थिक लाभांची प्रकरणे त्वरित मार्गी लावण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.दरम्यान, अतिरिक्त कार्यभार स्वीकारल्यानंतर कार्यालयातील प्रलंबित कामांना प्राधान्य देण्यात येणार असून, टप्प्याटप्प्याने सर्व प्रस्तावांचा निपटारा करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

“उद्या दुपारपर्यंत पगाराचे बिल ट्रेझरीत पाठवले जाईल.” ; शिक्षकांचे पगार उद्या दुपारपर्यंत ट्रेझरीमध्ये जातील. आज त्यांची सर्व प्रक्रिया, जसे की एकत्रित करणे (consolidate) इत्यादी, पूर्ण झाली आहे. काही कागदपत्रांवर शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांच्या सह्या होणे बाकी आहे, त्यानंतर उद्या दुपारपर्यंत सर्व पगार ट्रेझरीमध्ये जमा होतील. : भारत कासले वेतन अधीक्षक

Previous Post

महापालिकेतील २४९ रोजंदारी सेवक व १५ वाहनचालकांच्या प्रश्नांवर हालचाल..!

Next Post

आषाढी वारीत सोलापूर ग्रामीण पोलिसांची ‘अँटी ड्रोनगन’ सुरक्षा व्यवस्था..

Related Posts

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क
सोलापूर जिल्हा

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा
सोलापूर जिल्हा

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

July 27, 2026
रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन
सोलापूर जिल्हा

रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

July 27, 2026
गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..
सोलापूर जिल्हा

गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..

July 27, 2026
केगावच्या बिग सी कॉलेजमध्ये ; बायोमेडिकल इंजिनिअरिंगच्या ६३ जागांसाठी प्रवेश सुरु.
सोलापूर जिल्हा

केगावच्या बिग सी कॉलेजमध्ये ; बायोमेडिकल इंजिनिअरिंगच्या ६३ जागांसाठी प्रवेश सुरु.

July 27, 2026
उत्कृष्ट नियोजनाला ; मुख्यमंत्र्यांकडून जिल्हा परिषदेचे कौतुक..
सोलापूर जिल्हा

उत्कृष्ट नियोजनाला ; मुख्यमंत्र्यांकडून जिल्हा परिषदेचे कौतुक..

July 26, 2026
Next Post
आषाढी वारीत सोलापूर ग्रामीण पोलिसांची ‘अँटी ड्रोनगन’ सुरक्षा व्यवस्था..

आषाढी वारीत सोलापूर ग्रामीण पोलिसांची 'अँटी ड्रोनगन' सुरक्षा व्यवस्था..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

July 27, 2026
रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

July 27, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025