Wednesday, September 9, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

तब्बल तीन हजार कोटी रूपयांच्या मिश्र व्यवसायाचा टप्पा पार : निव्वळ एनपीए आला शून्य टक्क्यावर

Solapur Mirror by Solapur Mirror
April 8, 2026
in सोलापूर शहर, सोलापूर जिल्हा
0
तब्बल तीन हजार कोटी रूपयांच्या मिश्र व्यवसायाचा टप्पा पार : निव्वळ एनपीए आला शून्य टक्क्यावर
0
SHARES
38
VIEWS

सोलापूर : सोलापूर जनता सहकारी बँकेला २०२५ – २६ या आर्थिक वर्षात २४ कोटी ९४ लाख रुपयांचा म्हणजेच सुमारे २५ कोटी रुपयांचा नफा झाला आहे. हीरक महोत्सवी वर्षात बँकेने तब्बल तीन हजार कोटी रूपयांच्या मिश्र व्यवसायाचा टप्पा पार केला असून निव्वळ एनपीए शून्य टक्क्यावर आला आहे, अशी माहिती बँकेचे नूतन अध्यक्ष सुनील पेंडसे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.

संपलेल्या आर्थिक वर्षात म्हणजेच २०२५ – २६ मध्ये सोलापूर जनता सहकारी बँकेने उत्तम कामगिरी केली आहे. बँकेकडे १ हजार ८९६ कोटी २१ लाख रुपयांच्या ठेवी आहेत. तसेच बँकेकडून १ हजार ११० कोटी ४० लाख रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. सोलापूर जनता सहकारी बँकेचा ग्रॉस एनपीए ८.३१ टक्क्यांवरून वरून ३.३५ टक्क्यांवर आला आहे. तसेच निव्वळ एनपीए २.५७ टक्क्यांवरून शून्यावर आला आहे.

सोलापूर जनता सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या मार्गदर्शनाखाली बँकेच्या वसुली विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी भरघोस वसुली करून बँकेच्या प्रगतीस हातभार लावला आहे. त्यामुळे एनपीए शून्यावर येण्यास मोलाची मदत झाली आहे, असे बँकेचे अध्यक्ष सुनील पेंडसे यांनी सांगितले.

सोलापूर जनता सहकारी बँकेने मार्च महिन्यापासून मोबाईल बँकेची सुविधा ग्राहकांना उपलब्ध करून दिली आहे. या सुविधेमुळे पहिल्या टप्प्यात ग्राहकांना आरटीजीएस आणि एनईएफटी सारखी सुविधा देण्यात येत आहे. तसेच ग्राहकांना त्यांच्या खात्याची सद्यस्थिती पाहता येत आहे. त्याचबरोबर सोलापूर जनता सहकारी बँकेच्या कोणत्याही खात्यावर तसेच अन्य बँकांतील खात्यावरही पैसे पाठवण्याची सुविधा यातून उपलब्ध झाली आहे. विशेषतः व्यापारी मंडळींसाठी अत्यावश्यक असलेली अकाउंट स्टेटमेंट मिळण्याची सोयही या मोबाईल बँकिंग सुविधा समाविष्ट करण्यात आली आहे. त्यामुळे सभासद ग्राहक बँकेच्या या कामगिरीवर समाधान व्यक्त करीत आहेत, असे बँकेचे उपाध्यक्ष ऍड. मिलिंद कुलकर्णी म्हणाले.

व्यवसायवाढीचे उद्दिष्ट पूर्ण करताना कालसुसंगत नियमाची फेररचना, सीबिल आधारित कर्ज व्याज आकारणी, जिथे शक्य आहे अशा ठिकाणी कमी मार्जिन, विना जामीनदार गृह व वाहन कर्जे असे बदल करण्यास संचालक मंडळाने यावर्षी मान्यता दिली. त्यामुळे चांगल्या पद्धतीने कर्ज वाढ व नफा वाढही करता आली, असे सोलापूर जनता सहकारी बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी विनय दुनाखे यांनी सांगितले.

या पत्रकार परिषदेस बँकेचे नूतन अध्यक्ष सुनील पेंडसे, नूतन उपाध्यक्ष ऍड. मिलिंद कुलकर्णी तसेच नूतन संचालक पुरुषोत्तम उडता, राजेश पवार, सी. ए. गिरीष बोरगावकर, रवींद्र साळे, संचालिका चंद्रिका चौहान, गौरी आमडेकर, संचालक डॉ. हर्षद डंबळ, सी. ए. आनंद करवंदे, सुरेश चिक्कळी, महादेव न्हावकर, प्रमोद भुतडा, विष्णू मोंढे, ऍड. मल्लिनाथ शहाबादे, अमित आपटे, चरणसिंग चौव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय दुनाखे, सरव्यवस्थापक प्रदीप बुट्टे, उपसरव्यवस्थापक अंजली कुलकर्णी, मकरंद जोशी, देवदत्त पटवर्धन, सहाय्यक सरव्यवस्थापक रामदास सिद्धूल, तुळशीदास गज्जम, रमेश मामड्याल, मुख्य कार्यालयातील अधिकारी मदन मोरे, सुहास कमलापूरकर आदी उपस्थित होते.

Previous Post

स्मशानभूमीची जागा होटगी मठाला दिल्यास माझी काही हरकत नाही ; धर्मराज काडादी..

Next Post

सोलापूर जनता सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी सुनील पेंडसे तर उपाध्यक्षपदी ॲड. मिलिंद कुलकर्णी

Related Posts

‘ब्रेकिंग न्यूज’च्या धावपळीत आरोग्याला ब्रेक नको ; सहाय्यक पोलीस आयुक्त दिलीप पवार
सोलापूर जिल्हा

‘ब्रेकिंग न्यूज’च्या धावपळीत आरोग्याला ब्रेक नको ; सहाय्यक पोलीस आयुक्त दिलीप पवार

September 9, 2026
मटक्याच्या अड्ड्यावर पोलिसांची धडक; फॉर्च्युनरसह ३० लाखांचा मुद्देमाल जप्त
क्राईम

मटक्याच्या अड्ड्यावर पोलिसांची धडक; फॉर्च्युनरसह ३० लाखांचा मुद्देमाल जप्त

September 9, 2026
शिक्षकांच्या आरोग्याला ‘कॅशलेस’ आधार ; मंगेश चिवटेच्या मागणीला शासनाचा सकारात्मक प्रतिसाद
सोलापूर जिल्हा

शिक्षकांच्या आरोग्याला ‘कॅशलेस’ आधार ; मंगेश चिवटेच्या मागणीला शासनाचा सकारात्मक प्रतिसाद

September 9, 2026
पावसाने मारली दडी ; चक्क शेतकऱ्याने फिरवला उडदावर रोटर!
शेती

पावसाने मारली दडी ; चक्क शेतकऱ्याने फिरवला उडदावर रोटर!

September 9, 2026
विद्यार्थी बनले शिक्षक; अनुभवला अध्यापनाचा ‘एक तास’
सोलापूर जिल्हा

विद्यार्थी बनले शिक्षक; अनुभवला अध्यापनाचा ‘एक तास’

September 9, 2026
मुख्यमंत्र्यांपासून आमदारांपर्यंत ; ‘देवेंद्रां’ना ‘देवेंद्रां’च्या खास शुभेच्छा!
सोलापूर जिल्हा

मुख्यमंत्र्यांपासून आमदारांपर्यंत ; ‘देवेंद्रां’ना ‘देवेंद्रां’च्या खास शुभेच्छा!

September 8, 2026
Next Post
सोलापूर जनता सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी सुनील पेंडसे तर उपाध्यक्षपदी ॲड. मिलिंद कुलकर्णी

सोलापूर जनता सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी सुनील पेंडसे तर उपाध्यक्षपदी ॲड. मिलिंद कुलकर्णी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘ब्रेकिंग न्यूज’च्या धावपळीत आरोग्याला ब्रेक नको ; सहाय्यक पोलीस आयुक्त दिलीप पवार

‘ब्रेकिंग न्यूज’च्या धावपळीत आरोग्याला ब्रेक नको ; सहाय्यक पोलीस आयुक्त दिलीप पवार

September 9, 2026
मटक्याच्या अड्ड्यावर पोलिसांची धडक; फॉर्च्युनरसह ३० लाखांचा मुद्देमाल जप्त

मटक्याच्या अड्ड्यावर पोलिसांची धडक; फॉर्च्युनरसह ३० लाखांचा मुद्देमाल जप्त

September 9, 2026
शिक्षकांच्या आरोग्याला ‘कॅशलेस’ आधार ; मंगेश चिवटेच्या मागणीला शासनाचा सकारात्मक प्रतिसाद

शिक्षकांच्या आरोग्याला ‘कॅशलेस’ आधार ; मंगेश चिवटेच्या मागणीला शासनाचा सकारात्मक प्रतिसाद

September 9, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In