Tuesday, September 8, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

आषाढी वारीपूर्वी आरोग्य यंत्रणा सज्ज करण्याचे निर्देश; प्राथमिक आरोग्य सेवा बळकट करण्यावर भर

Solapur Mirror by Solapur Mirror
July 4, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
आषाढी वारीपूर्वी आरोग्य यंत्रणा सज्ज करण्याचे निर्देश; प्राथमिक आरोग्य सेवा बळकट करण्यावर भर

सोलापूर : जिल्हा परिषदेच्या आरोग्य व शिक्षण समितीची सभा सभापती चेतनसिंह केदार यांच्या अध्यक्षतेखाली पंढरपूर तालुक्यातील कासेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात पार पडली. यावेळी जिल्ह्यातील रिक्त आरोग्य पदे तातडीने भरणे, बोगस डॉक्टरांविरोधात कठोर कारवाई करणे आणि ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी प्राथमिक आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्याचे स्पष्ट निर्देश केदार यांनी दिले. सभेच्या प्रारंभी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश कोपूरवाड यांनी उपस्थितांचे स्वागत करून सभेचे इतिवृत्त मांडले. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एकनाथ बोधले यांनी आषाढी वारीसाठी करण्यात आलेल्या आरोग्य नियोजनाची सविस्तर माहिती सादरीकरणाद्वारे दिली. बैठकीत कासेगाव ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी आरोग्य उपकेंद्र अनवली येथील रिक्त पदे भरण्याची मागणी करणारे निवेदन सभापतींना दिले. तसेच कासेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीच्या दुरुस्तीबाबतही चर्चा करण्यात आली.

चेतनसिंह केदार यांनी माता-बाल संगोपन, गरोदर मातांची वेळेत सोनोग्राफी, नियमित लसीकरण, कुष्ठरोग व क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश दिले. पालखी मार्गावरील सर्व आरोग्य केंद्रांमध्ये औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध ठेवावा तसेच कोणतेही कर्मचारी पद रिक्त राहणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर लाखो भाविकांना दर्जेदार आरोग्य सेवा आणि आपत्कालीन वैद्यकीय सुविधा वेळेत उपलब्ध करून देण्यासाठी आरोग्य यंत्रणेने पूर्ण क्षमतेने काम करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

या बैठकीस जिल्हा परिषद सदस्य सोनाली कडते, संगीता दुधाळ, संदीप टेळे, मीनाक्षी रोंगे, शोभा खटकाळे, नागनाथ भोसले, सविता कोकाटे, चंद्रकांत भालके यांच्यासह जिल्ह्यातील सर्व तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत भालके यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Previous Post

ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक निर्णय; जिल्हा परिषदेच्या वसतिगृह प्रवेशास प्रारंभ

Next Post

अभियांत्रिकी प्रवेशाचा ‘अलर्ट’! कागदपत्रे अपूर्ण तर आरक्षित प्रवेश हुकणार

Related Posts

‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा
सोलापूर जिल्हा

‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

September 8, 2026
सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव
सोलापूर जिल्हा

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

September 8, 2026
पॉक्सो प्रकरणातील दोन आरोपींना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन
सोलापूर जिल्हा

पॉक्सो प्रकरणातील दोन आरोपींना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन

September 8, 2026
किसन जाधव यांच्या पुढाकाराने श्रीकृष्ण मठात भक्तीचा जल्लोष; गुलाल सोहळा थाटात
सोलापूर जिल्हा

किसन जाधव यांच्या पुढाकाराने श्रीकृष्ण मठात भक्तीचा जल्लोष; गुलाल सोहळा थाटात

September 7, 2026
‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!
क्राईम

‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!

September 7, 2026
विजापूर रोड मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी विश्वनाथ कोळी
सोलापूर जिल्हा

विजापूर रोड मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी विश्वनाथ कोळी

September 7, 2026
Next Post
अभियांत्रिकी प्रवेशाचा ‘अलर्ट’! कागदपत्रे अपूर्ण तर आरक्षित प्रवेश हुकणार

अभियांत्रिकी प्रवेशाचा 'अलर्ट'! कागदपत्रे अपूर्ण तर आरक्षित प्रवेश हुकणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

September 8, 2026
सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

September 8, 2026
पॉक्सो प्रकरणातील दोन आरोपींना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन

पॉक्सो प्रकरणातील दोन आरोपींना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन

September 8, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In