Monday, July 27, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

अभियांत्रिकी प्रवेशाचा ‘अलर्ट’! कागदपत्रे अपूर्ण तर आरक्षित प्रवेश हुकणार

Solapur Mirror by Solapur Mirror
July 4, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
अभियांत्रिकी प्रवेशाचा ‘अलर्ट’! कागदपत्रे अपूर्ण तर आरक्षित प्रवेश हुकणार
0
SHARES
2
VIEWS

सोलापूर : राज्यातील अभियांत्रिकी, बीई, बी.टेक., एमबीए आणि एमएमएस अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली असून यंदा आरक्षित प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी आवश्यक कागदपत्रांबाबत विशेष दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. प्रवेश अर्ज भरताना आवश्यक प्रमाणपत्रे वेळेत सादर न केल्यास आरक्षित प्रवर्गातील प्रवेशाचा लाभ गमवावा लागू शकतो. प्रवेश प्रक्रियेनुसार अनुसूचित जाती, विमुक्त जाती-भटक्या जमाती, एनटी, ओबीसी, एसबीसी आणि एसईबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी जात वैधता प्रमाणपत्र अनिवार्य आहे. तसेच, एससी व एसटी प्रवर्ग वगळता इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी ३१ मार्च २०२७ पर्यंत वैध असलेले नॉनक्रीमीलेअर प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (ईडब्ल्यूएस) प्रवर्गातील विद्यार्थ्यांनाही शासनाच्या नियमांनुसार पात्रता प्रमाणपत्र जोडावे लागणार आहे.

अनेक विद्यार्थी अर्ज भरताना मूळ प्रमाणपत्रांऐवजी केवळ अर्जाची किंवा पडताळणीची पोचपावती अपलोड करतात. अशा विद्यार्थ्यांना चौथ्या कॅप फेरीच्या अंतिम रिपोर्टिंगपूर्वी संबंधित महाविद्यालयात मूळ प्रमाणपत्रे सादर करावी लागतील. निर्धारित मुदतीत आवश्यक कागदपत्रे जमा न केल्यास आरक्षित प्रवर्गातील जागेवरील प्रवेश रद्द होऊ शकतो. मात्र, विद्यार्थी खुल्या प्रवर्गातील गुणवत्तेनुसार पात्र असल्यास त्यांना पुढील प्रवेश फेऱ्यांमध्ये ओपन कोट्यातून संधी मिळू शकते.

ई-स्क्रुटिनी प्रक्रियेदरम्यान अर्जात काही त्रुटी आढळल्यास त्या निर्धारित कालावधीत दुरुस्त करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. मुदतीत दुरुस्ती न झाल्यास संबंधित उमेदवाराचे नाव गुणवत्ता यादीतून वगळले जाऊ शकते. त्यामुळे प्रवेश प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांनी अर्ज, कागदपत्रे आणि पडताळणीची प्रत्येक प्रक्रिया वेळेत पूर्ण करून कोणतीही त्रुटी राहणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक असल्याचे प्रवेश प्रक्रियेशी संबंधित तज्ज्ञांनी सांगितले आहे.

“अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेत विद्यार्थ्यांनी अर्ज भरताना कोणतीही घाई न करता सर्व आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी. विशेषतः आरक्षित प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी जात वैधता, नॉनक्रीमीलेअर व इतर आवश्यक प्रमाणपत्रे वेळेत सादर करणे अत्यावश्यक आहे. प्रवेश प्रक्रियेतील प्रत्येक मुदतीचे पालन केल्यास विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण येणार नाही आणि त्यांचा प्रवेश सुरक्षित होईल.”
– सचिन जगताप, शिक्षण अधिकारी माध्यमिक

  • प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक
  • ऑनलाइन नोंदणी व कागदपत्रे अपलोड : २ ते १२ जुलै
  • कागदपत्रांची पडताळणी व अर्ज निश्चिती : ३ ते १३ जुलै
  • अर्जाचे शुल्क : खुल्या प्रवर्गासाठी १,३०० रुपये, तर राखीव प्रवर्गासाठी १,००० रुपये
Previous Post

आषाढी वारीपूर्वी आरोग्य यंत्रणा सज्ज करण्याचे निर्देश; प्राथमिक आरोग्य सेवा बळकट करण्यावर भर

Next Post

सोलापूरकरांसाठी दिलासादायक निर्णय; उड्डाणपूल, पाणी योजनेची कामे मार्गी

Related Posts

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क
सोलापूर जिल्हा

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा
सोलापूर जिल्हा

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

July 27, 2026
रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन
सोलापूर जिल्हा

रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

July 27, 2026
गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..
सोलापूर जिल्हा

गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..

July 27, 2026
केगावच्या बिग सी कॉलेजमध्ये ; बायोमेडिकल इंजिनिअरिंगच्या ६३ जागांसाठी प्रवेश सुरु.
सोलापूर जिल्हा

केगावच्या बिग सी कॉलेजमध्ये ; बायोमेडिकल इंजिनिअरिंगच्या ६३ जागांसाठी प्रवेश सुरु.

July 27, 2026
उत्कृष्ट नियोजनाला ; मुख्यमंत्र्यांकडून जिल्हा परिषदेचे कौतुक..
सोलापूर जिल्हा

उत्कृष्ट नियोजनाला ; मुख्यमंत्र्यांकडून जिल्हा परिषदेचे कौतुक..

July 26, 2026
Next Post
सोलापूरकरांसाठी दिलासादायक निर्णय; उड्डाणपूल, पाणी योजनेची कामे मार्गी

सोलापूरकरांसाठी दिलासादायक निर्णय; उड्डाणपूल, पाणी योजनेची कामे मार्गी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

July 27, 2026
रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

July 27, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025