Monday, October 26, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

हृदय प्रत्यारोपण यशस्वी; आदित्यच्या स्वप्नांना नवी भरारी

Solapur Mirror by Solapur Mirror
September 30, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
हृदय प्रत्यारोपण यशस्वी; आदित्यच्या स्वप्नांना नवी भरारी
0
SHARES
3
VIEWS

तीन वर्षांची हृदयविकाराशी झुंज संपली; मुलुंडच्या फोर्टिस हॉस्पिटलमध्ये यशस्वी हृदय प्रत्यारोपण

सोलापूर : पंढरपूर येथील १५ वर्षीय आदित्य जाधव याच्यावर फोर्टिस हॉस्पिटल, मुलुंड येथे १७ जुलै २०२६ रोजी यशस्वी हृदय प्रत्यारोपण करण्यात आले. जवळपास तीन वर्षांपासून गंभीर हृदयविकाराशी झुंज देणाऱ्या आदित्यची प्रकृती आता सुधारली असून, ३१ ऑगस्ट रोजी त्याला रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. पुन्हा शाळेत जाण्यासह मित्रांसोबत क्रिकेट खेळण्याची त्याला उत्सुकता आहे.

इयत्ता नववीत शिकणाऱ्या आदित्यला वारंवार आजारी पडणे, थोडी हालचाल केली तरी दम लागणे, हृदयाचे ठोके वाढणे आणि पायांना सूज येणे असा त्रास होत होता. त्यामुळे त्याचे शाळेत जाणे कमी झाले होते. मात्र, त्याने शिक्षण सुरूच ठेवले. फोर्टिस हॉस्पिटलमध्ये तपासणी केल्यानंतर त्याच्या हृदयाच्या उजव्या बाजूला गंभीर समस्या असल्याचे निदान झाले. हृदयाच्या झडपेतील मोठी गळती, उजव्या बाजूचे कप्पे वाढणे आणि रक्त पंप करण्याची क्षमता कमी होणे, अशा समस्या आढळल्या. दोन वर्षांपूर्वी त्याच्यावर हृदयाच्या झडपेची दुरुस्ती करण्यात आली होती. मात्र, त्यानंतरही हृदयाची कार्यक्षमता सुधारली नाही. पुढील तपासणीत हृदयाच्या उजव्या कप्प्याच्या स्नायूंशी संबंधित गंभीर आजाराचे निदान झाले. प्रकृतीचा दैनंदिन जीवनावर होणारा परिणाम लक्षात घेऊन डॉक्टरांनी हृदय प्रत्यारोपणाचा पर्याय सुचविला. आवश्यक तपासणीनंतर २० फेब्रुवारी २०२६ रोजी आदित्यचे नाव प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षा यादीत नोंदवण्यात आले.


दाता हृदय उपलब्ध झाल्यास तातडीने मुंबईत पोहोचता यावे, यासाठी आदित्यचे कुटुंब काही महिन्यांसाठी पुण्यात स्थलांतरित झाले होते. त्याचे वडील रिक्षाचालक असून आई गृहिणी आहे.वाशी, नवी मुंबई येथील एमजीएम न्यू बॉम्बे हॉस्पिटलमध्ये २२ वर्षीय तरुणीला मेंदूमृत घोषित करण्यात आल्यानंतर तिचे हृदय आदित्यसाठी योग्य असल्याचे निश्चित झाले. दुःखाच्या प्रसंगीही दात्याच्या कुटुंबाने हृदयासह फुफ्फुसे, मूत्रपिंड, यकृत, स्वादुपिंड, आतडी आणि रक्तवाहिन्यांचे दान करण्यास संमती दिली. या निर्णयामुळे अनेक रुग्णांना जीवनदानाची संधी मिळाली.

दाता कुटुंब, रुग्णालये, प्रत्यारोपण यंत्रणा, वैद्यकीय पथक आणि संबंधित विभागांच्या समन्वयातून दाता हृदय फोर्टिस हॉस्पिटलमध्ये तातडीने पोहोचविण्यात आले. त्यानंतर तज्ज्ञांच्या पथकाने आदित्यवर यशस्वी हृदय प्रत्यारोपण केले.फोर्टिस हॉस्पिटलच्या बाल हृदयरोग विभागाच्या संचालक डॉ. स्नेहल कुलकर्णी यांनी मुलांमधील हृदयविकाराचे लवकर निदान आणि योग्य वेळी उपचार होणे महत्त्वाचे असल्याचे सांगितले. प्रत्यारोपण शल्यचिकित्सक डॉ. धनंजय मालनकर यांनी आदित्यच्या सकारात्मक दृष्टिकोनाचे कौतुक केले. अतिदक्षता विभागातून बाहेर आल्यानंतरही तो भगवान विठ्ठल आणि गणपतीची चित्रे काढण्यात रमला होता, असे त्यांनी सांगितले.प्रत्यारोपणानंतर आदित्यची प्रकृती चांगली असून, आजारामुळे दूर गेलेले शाळेतील दिवस आणि क्रिकेटचे मैदान पुन्हा अनुभवण्याची त्याची इच्छा आहे. दात्याच्या कुटुंबाने घेतलेल्या अवयवदानाच्या निर्णयामुळे आदित्यला मिळालेले नवजीवन अवयवदानाचे महत्त्व अधोरेखित करणारे ठरले आहे.

Previous Post

ज्ञानसेवेचा सन्मान; प्रा. सतीश काळेंना ‘आदर्श शिक्षक’ पुरस्कार

Next Post

दुष्काळात शिक्षणाला दिलासा; दहावी-बारावीची ‘फी’ माफ

Related Posts

रामायणातून जीवनमूल्यांची शिकवण; पंचाक्षरी विद्यामंदिरात वाल्मिकी जयंती साजरी..!
सोलापूर जिल्हा

रामायणातून जीवनमूल्यांची शिकवण; पंचाक्षरी विद्यामंदिरात वाल्मिकी जयंती साजरी..!

October 26, 2026
४६ कोटींची ऊसबिले थकली; दोन कारखान्यांच्या गाळपावर टांगती तलवार!
सोलापूर जिल्हा

४६ कोटींची ऊसबिले थकली; दोन कारखान्यांच्या गाळपावर टांगती तलवार!

October 26, 2026
रेल्वे स्थानकावर पर्स लांबवली; पण पोलिसांनी अखेर गाठलेच!
क्राईम

रेल्वे स्थानकावर पर्स लांबवली; पण पोलिसांनी अखेर गाठलेच!

October 26, 2026
नक्षत्रे सरली, पावसाची आस उरली; बळीराजाचे डोळे स्वातीकडे!
सोलापूर जिल्हा

नक्षत्रे सरली, पावसाची आस उरली; बळीराजाचे डोळे स्वातीकडे!

October 26, 2026
दुष्काळाचे भान, शिक्षणाला मान; वाल्मिकी जयंतीतून कोळी समाजाचा नवा आदर्श!
सोलापूर जिल्हा

दुष्काळाचे भान, शिक्षणाला मान; वाल्मिकी जयंतीतून कोळी समाजाचा नवा आदर्श!

October 26, 2026
१६०० बोगस शिक्षकांच्या नोंदणीचा आरोप; अमोल शिंदे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
सोलापूर जिल्हा

१६०० बोगस शिक्षकांच्या नोंदणीचा आरोप; अमोल शिंदे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

October 22, 2026
Next Post
दुष्काळात शिक्षणाला दिलासा; दहावी-बारावीची ‘फी’ माफ

दुष्काळात शिक्षणाला दिलासा; दहावी-बारावीची ‘फी’ माफ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रामायणातून जीवनमूल्यांची शिकवण; पंचाक्षरी विद्यामंदिरात वाल्मिकी जयंती साजरी..!

रामायणातून जीवनमूल्यांची शिकवण; पंचाक्षरी विद्यामंदिरात वाल्मिकी जयंती साजरी..!

October 26, 2026
४६ कोटींची ऊसबिले थकली; दोन कारखान्यांच्या गाळपावर टांगती तलवार!

४६ कोटींची ऊसबिले थकली; दोन कारखान्यांच्या गाळपावर टांगती तलवार!

October 26, 2026
रेल्वे स्थानकावर पर्स लांबवली; पण पोलिसांनी अखेर गाठलेच!

रेल्वे स्थानकावर पर्स लांबवली; पण पोलिसांनी अखेर गाठलेच!

October 26, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In