Monday, July 27, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

सोलापुरात विधान परिषदेच्या उमेदवारीसाठी जोरदार लॉबिंग

Solapur Mirror by Solapur Mirror
May 23, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
सोलापुरात विधान परिषदेच्या उमेदवारीसाठी जोरदार लॉबिंग
0
SHARES
37
VIEWS

राऊत, माने, परिचारक, पवार, सातपुते यांची नावे चर्चेत; मुंबईत भेटीगाठींना वेग

सोलापूर : आगामी विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून उमेदवारीसाठी इच्छुक नेत्यांकडून जोरदार लॉबिंग सुरू झाले आहे. पक्षश्रेष्ठी कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब करणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. सध्या राजकीय वर्तुळात माजी आमदार राजेंद्र राऊत, दिलीप माने, प्रशांत परिचारक, राजन पाटील, भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार तसेच माजी आमदार राम सातपुते यांच्या नावांची जोरदार चर्चा सुरू आहे. इच्छुकांकडून मुंबईत वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्या असून समर्थकांनीही राजधानीत ठाण मांडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

माजी आमदार दिलीप माने यांचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याशी असलेले जुने मैत्रीपूर्ण संबंध सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत. २००९ ते २०१४ या काळात दोघेही विधानसभेत एकत्र कार्यरत होते. त्यामुळे माने यांच्या नावाला अधिक बळ मिळत असल्याचे बोलले जात आहे.

  • दुसरीकडे, भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष तथा प्रदेश कार्यकारिणी सदस्य शहाजी पवार यांचे नावही चर्चेत आघाडीवर आहे. “एकनिष्ठ कार्यकर्त्याला संधी मिळणार का?” अशा आशयाच्या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत असून कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी असलेले संबंध, तसेच आमदार सचिन कल्याणशेट्टी आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यासोबत दिसणारी जवळीक यामुळे पवार यांच्या दाव्यालाही वजन प्राप्त होत असल्याचे मानले जात आहे. गुरुवारी त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतल्याचीही राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

दरम्यान, उत्तर सोलापूरमधील दिलीप माने गट आणि शहाजी पवार गटाचे कार्यकर्ते सध्या मुंबईतील घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. इच्छुकांची संख्या वाढत असताना पक्षश्रेष्ठी नेमकी कोणाला संधी देणार, की ऐनवेळी एखादा नवा चेहरा समोर येणार, याबाबत जिल्ह्यात राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

Tags: एकनाथ शिंदेदेवेंद्र फडणवीसनगरसेवकपालकमंत्री जयकुमार गोरेप्रशांत परिचारकमाजी आमदार दिलीप मानेमाजी आमदार राजेंद्र राऊतमाजी आमदार राम सातपुतेमाजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवारराजकारणराजकीय वातावरणराजन पाटीलविधान परिषदे
Previous Post

शहर काँग्रेसमध्ये अध्यक्षपदावरून असंतोषाची ठिणगी

Next Post

यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातुन ३० हजार विद्यार्थी देणार परीक्षा

Related Posts

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा
सोलापूर जिल्हा

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

July 27, 2026
रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन
सोलापूर जिल्हा

रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

July 27, 2026
गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..
सोलापूर जिल्हा

गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..

July 27, 2026
केगावच्या बिग सी कॉलेजमध्ये ; बायोमेडिकल इंजिनिअरिंगच्या ६३ जागांसाठी प्रवेश सुरु.
सोलापूर जिल्हा

केगावच्या बिग सी कॉलेजमध्ये ; बायोमेडिकल इंजिनिअरिंगच्या ६३ जागांसाठी प्रवेश सुरु.

July 27, 2026
उत्कृष्ट नियोजनाला ; मुख्यमंत्र्यांकडून जिल्हा परिषदेचे कौतुक..
सोलापूर जिल्हा

उत्कृष्ट नियोजनाला ; मुख्यमंत्र्यांकडून जिल्हा परिषदेचे कौतुक..

July 26, 2026
“करिअरची खात्री, गुणवत्तेची हमी; ए. जी. पाटील इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची वाढती पसंती”
सोलापूर जिल्हा

“करिअरची खात्री, गुणवत्तेची हमी; ए. जी. पाटील इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची वाढती पसंती”

July 26, 2026
Next Post
यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातुन ३० हजार विद्यार्थी देणार परीक्षा

यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातुन ३० हजार विद्यार्थी देणार परीक्षा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

July 27, 2026
रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

July 27, 2026
गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..

गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..

July 27, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025