Monday, July 27, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

एस. कार्तिकेयन यांनी स्वीकारला जिल्हाधिकारी पदाचा पदभार; सोलापूरचे आशीर्वाद आता नागपूरचे जिल्हाधिकारी

Solapur Mirror by Solapur Mirror
April 3, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
एस. कार्तिकेयन यांनी स्वीकारला जिल्हाधिकारी पदाचा पदभार; सोलापूरचे आशीर्वाद आता नागपूरचे जिल्हाधिकारी
0
SHARES
14
VIEWS

सोलापूर : जिल्ह्याच्या प्रशासकीय नेतृत्वात मोठा बदल झाला असून, सोलापूरचे नूतन जिल्हाधिकारी म्हणून एस. कार्तिकेयन यांनी आज, शुक्रवारी आपला पदभार स्वीकारला आहे. दुसरीकडे, आपल्या धडाकेबाज कामगिरीने सोलापूरकरांची मने जिंकणारे कुमार आशीर्वाद यांची बदली आता थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ‘होम ग्राऊंड’ असलेल्या नागपूरच्या जिल्हाधिकारी पदी करण्यात आली आहे.

कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून यशस्वी कार्यभार सांभाळलेले एस. कार्तिकेयन आता सोलापूर जिल्ह्याची धुरा वाहणार आहेत. प्रशासकीय शिस्त आणि कामाचा दांडगा अनुभव असलेल्या कार्तिकेयन यांनी आज विधिवत पदभार स्वीकारला. सोलापूरच्या विकासाला ते कोणती नवी दिशा देतात, याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

नागपूरचे जिल्हाधिकारी म्हणून पदोन्नती मिळालेले कुमार आशीर्वाद यांची सोलापूरमधील कारकीर्द अत्यंत प्रभावशाली ठरली आहे. ‘युवा कलेक्टर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आशीर्वाद यांनी आपल्या कार्यकाळात अनेक महत्त्वाचे टप्पे गाठले. सोलापूर विमानतळ आणि आयटी पार्कच्या विषयांना त्यांनी गती दिली, सीना नदीला आलेल्या महापुराच्या काळात त्यांनी प्रत्यक्ष जमिनीवर उतरून केलेले काम नागरिकांसाठी संस्मरणीय ठरले तसेच आषाढी पंढरपूर वारीचे चोख नियोजन आणि भाविकांच्या सोयीसुविधांसाठी त्यांनी धाडसी निर्णय घेतले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाहीअत्यंत शांततेत आणि पारदर्शकपणे पार पाडण्यात त्यांनी जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली.

प्रशासकीय कौशल्य आणि कडक शिस्त यामुळे कुमार आशीर्वाद यांनी सोलापूरकरांवर आपली छाप सोडली आहे. आता नागपूरसारख्या महत्त्वाच्या जिल्ह्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली असून, त्यांच्या अनुभवाचा फायदा उपराजधानीच्या विकासासाठी होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Previous Post

सोलापूरचे नवे जिल्हाधिकारीपदी एस. कार्तिकेयन यांची नियुक्ती ; यांची संपूर्ण माहिती..

Next Post

बार्शीच्या सोमनाथ राऊत यांची येरमाळा येथील आई येडेश्वरीला नयनरम्य पुष्पसेवा

Related Posts

उत्कृष्ट नियोजनाला ; मुख्यमंत्र्यांकडून जिल्हा परिषदेचे कौतुक..
सोलापूर जिल्हा

उत्कृष्ट नियोजनाला ; मुख्यमंत्र्यांकडून जिल्हा परिषदेचे कौतुक..

July 26, 2026
“करिअरची खात्री, गुणवत्तेची हमी; ए. जी. पाटील इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची वाढती पसंती”
सोलापूर जिल्हा

“करिअरची खात्री, गुणवत्तेची हमी; ए. जी. पाटील इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची वाढती पसंती”

July 26, 2026
आईने १४ वर्षीय मुलीसह रेल्वेखाली झोकून दिले जीवन
क्राईम

आईने १४ वर्षीय मुलीसह रेल्वेखाली झोकून दिले जीवन

July 26, 2026
नरेंद्र मोदी भारताचा भूतकाळ… ते भविष्याशी लढू शकत नाही : राहुल गांधी
सोलापूर जिल्हा

नरेंद्र मोदी भारताचा भूतकाळ… ते भविष्याशी लढू शकत नाही : राहुल गांधी

July 26, 2026
वारकऱ्यांच्या सेवेत शासन; ‘ग्रामविकासाची वारी’ ठरली आदर्श!
सोलापूर जिल्हा

वारकऱ्यांच्या सेवेत शासन; ‘ग्रामविकासाची वारी’ ठरली आदर्श!

July 24, 2026
‘संवादवारी’तून शासन थेट वारकऱ्यांच्या भेटीला! ‘संवादवारी’चे दालन खुले
सोलापूर जिल्हा

‘संवादवारी’तून शासन थेट वारकऱ्यांच्या भेटीला! ‘संवादवारी’चे दालन खुले

July 24, 2026
Next Post
बार्शीच्या सोमनाथ राऊत यांची येरमाळा येथील आई येडेश्वरीला नयनरम्य पुष्पसेवा

बार्शीच्या सोमनाथ राऊत यांची येरमाळा येथील आई येडेश्वरीला नयनरम्य पुष्पसेवा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उत्कृष्ट नियोजनाला ; मुख्यमंत्र्यांकडून जिल्हा परिषदेचे कौतुक..

उत्कृष्ट नियोजनाला ; मुख्यमंत्र्यांकडून जिल्हा परिषदेचे कौतुक..

July 26, 2026
“करिअरची खात्री, गुणवत्तेची हमी; ए. जी. पाटील इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची वाढती पसंती”

“करिअरची खात्री, गुणवत्तेची हमी; ए. जी. पाटील इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची वाढती पसंती”

July 26, 2026
आईने १४ वर्षीय मुलीसह रेल्वेखाली झोकून दिले जीवन

आईने १४ वर्षीय मुलीसह रेल्वेखाली झोकून दिले जीवन

July 26, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025