Monday, July 27, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

सोलापूरचे नवे जिल्हाधिकारीपदी एस. कार्तिकेयन यांची नियुक्ती ; यांची संपूर्ण माहिती..

Solapur Mirror by Solapur Mirror
April 2, 2026
in महाराष्ट्र, सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
सोलापूरचे नवे जिल्हाधिकारीपदी एस. कार्तिकेयन यांची नियुक्ती ; यांची संपूर्ण माहिती..
0
SHARES
291
VIEWS

यवतमाळ आणि नांदेडमधील अनुभवाचा सोलापूरच्या विकासासाठी उपयोग होणार

सोलापूर: सोलापूरच्या जिल्हाधिकारीपदी भारतीय प्रशासकीय सेवेतील (IAS) एस. कार्तिकेयन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तरुण आणि अभ्यासू प्रशासक म्हणून ओळख असलेले एस. कार्तिकेयन लवकरच आपला पदभार स्वीकारणार असून, त्यांच्या नियुक्तीने सोलापूर जिल्ह्याच्या प्रशासनाला नवा वेग मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मूळचे तामिळनाडू राज्याचे असलेले एस. कार्तिकेयन हे २०२० च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. त्यांनी मद्रास विद्यापीठातून बी.कॉम (अकाउंटन्सी) पदवी प्राप्त केली आहे. विशेष म्हणजे, अमराठी असूनही त्यांचे मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तिन्ही भाषांवर उत्तम प्रभुत्व आहे, ज्यामुळे त्यांना महाराष्ट्रातील ग्रामीण व शहरी भागात काम करताना मोठी मदत होत आहे.एस. कार्तिकेयन यांनी आपल्या अल्पशा कारकिर्दीत विविध महत्त्वाच्या पदांवर काम करून आपली ठसा उमटवला आहे.

यवतमाळ येथे त्यांनी सहाय्यक जिल्हाधिकारी आणि उपविभागीय अधिकारी (SDO) म्हणून काम पाहिले आहे. नांदेड येथे प्रकल्प अधिकारी आणि अतिरिक्त जिल्हाधिकारी (आदिवासी विकास प्रकल्प) म्हणून त्यांनी आदिवासी भागातील विकासाच्या योजना प्रभावीपणे राबवल्या. नवी दिल्ली येथील रेल्वे बोर्डात सहाय्यक सचिव स्तरावर काम करण्याचा अनुभव घेतला आहे. आपल्या प्रशिक्षण काळात त्यांनी महसूल प्रशासन आणि जमीन व्यवस्थापनाबाबत सखोल अनुभव घेतला आहे.

सोलापूर जिल्ह्याचा विस्तार, साखर कारखानदारी, वस्त्रोद्योग आणि धार्मिक पर्यटनाचे महत्त्व पाहता, एस. कार्तिकेयन यांच्याकडे असणारा महसूल आणि विकास प्रकल्पांचा अनुभव जिल्ह्यासाठी फायदेशीर ठरेल. सर्वसामान्यांचे प्रश्न मार्गी लावणे आणि शासकीय योजना तळागाळापर्यंत पोहोचवणे हे त्यांचे मुख्य उद्दिष्ट असणार आहे.

नूतन जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्या निवडीबद्दल प्रशासकीय वर्तुळातून आणि जिल्हावासीयांकडून स्वागत करण्यात येत आहे.

Previous Post

येरमाळा नगरी भक्तीरसात न्हाली! उद्या ‘चुनखडी वेचण्याचा’ मुख्य विधी; लाखो भाविकांची उपस्थिती.

Next Post

एस. कार्तिकेयन यांनी स्वीकारला जिल्हाधिकारी पदाचा पदभार; सोलापूरचे आशीर्वाद आता नागपूरचे जिल्हाधिकारी

Related Posts

उत्कृष्ट नियोजनाला ; मुख्यमंत्र्यांकडून जिल्हा परिषदेचे कौतुक..
सोलापूर जिल्हा

उत्कृष्ट नियोजनाला ; मुख्यमंत्र्यांकडून जिल्हा परिषदेचे कौतुक..

July 26, 2026
“करिअरची खात्री, गुणवत्तेची हमी; ए. जी. पाटील इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची वाढती पसंती”
सोलापूर जिल्हा

“करिअरची खात्री, गुणवत्तेची हमी; ए. जी. पाटील इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची वाढती पसंती”

July 26, 2026
आईने १४ वर्षीय मुलीसह रेल्वेखाली झोकून दिले जीवन
क्राईम

आईने १४ वर्षीय मुलीसह रेल्वेखाली झोकून दिले जीवन

July 26, 2026
नरेंद्र मोदी भारताचा भूतकाळ… ते भविष्याशी लढू शकत नाही : राहुल गांधी
सोलापूर जिल्हा

नरेंद्र मोदी भारताचा भूतकाळ… ते भविष्याशी लढू शकत नाही : राहुल गांधी

July 26, 2026
वारकऱ्यांच्या सेवेत शासन; ‘ग्रामविकासाची वारी’ ठरली आदर्श!
सोलापूर जिल्हा

वारकऱ्यांच्या सेवेत शासन; ‘ग्रामविकासाची वारी’ ठरली आदर्श!

July 24, 2026
‘संवादवारी’तून शासन थेट वारकऱ्यांच्या भेटीला! ‘संवादवारी’चे दालन खुले
सोलापूर जिल्हा

‘संवादवारी’तून शासन थेट वारकऱ्यांच्या भेटीला! ‘संवादवारी’चे दालन खुले

July 24, 2026
Next Post
एस. कार्तिकेयन यांनी स्वीकारला जिल्हाधिकारी पदाचा पदभार; सोलापूरचे आशीर्वाद आता नागपूरचे जिल्हाधिकारी

एस. कार्तिकेयन यांनी स्वीकारला जिल्हाधिकारी पदाचा पदभार; सोलापूरचे आशीर्वाद आता नागपूरचे जिल्हाधिकारी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उत्कृष्ट नियोजनाला ; मुख्यमंत्र्यांकडून जिल्हा परिषदेचे कौतुक..

उत्कृष्ट नियोजनाला ; मुख्यमंत्र्यांकडून जिल्हा परिषदेचे कौतुक..

July 26, 2026
“करिअरची खात्री, गुणवत्तेची हमी; ए. जी. पाटील इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची वाढती पसंती”

“करिअरची खात्री, गुणवत्तेची हमी; ए. जी. पाटील इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची वाढती पसंती”

July 26, 2026
आईने १४ वर्षीय मुलीसह रेल्वेखाली झोकून दिले जीवन

आईने १४ वर्षीय मुलीसह रेल्वेखाली झोकून दिले जीवन

July 26, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025