Tuesday, September 8, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

उद्योगपती अनंत अंबानी यांच्या वाढदिवसानिमित्त ५ हजार घरांत पोहचणार आनंदाचा शिधा

Solapur Mirror by Solapur Mirror
April 9, 2026
in सोलापूर शहर, सोलापूर जिल्हा
0
उद्योगपती अनंत अंबानी यांच्या वाढदिवसानिमित्त ५ हजार घरांत पोहचणार आनंदाचा शिधा
0
SHARES
23
VIEWS

सोलापूर : प्रसिद्ध उद्योगपती अनंत मुकेश अंबानी यांच्या वाढदिवसानिमित्त शिखर पहारिया फाउंडेशनच्या वतीने गुरुवार दि. ९ एप्रिल २०२६ रोजी शहर व जिल्ह्यात तब्बल १४ ठिकाणी विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमांतर्गत सोलापूर शहरातील जुनी मिल कंपाऊंड मैदान येथे ५ हजार गरजू कुटुंबांना अन्नधान्य किट वाटप करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात येणार आहे. याच वेळी इतर उपक्रमांचाही प्रारंभ होणार आहे. सोलापुरात समाजसेवेचा महाउपक्रम आणि माणुसकीचा महोत्सव होणार आहे, अशी माहिती फाउंडेशनचे तन्वीर शेख आणि राज सलगर यांनी दिली.

या कार्यक्रमास मान्यवर उपस्थित राहणार आहेत. फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. दिवसभरात सोलापूर शहर व जिल्ह्यात विविध १४ ठिकाणी हे उपक्रम राबविले जाणार आहेत. जिल्ह्यातील २०० विद्यार्थिनींना सायकली, १ हजार विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वाटप करण्यात येणार आहे. अनाथ आश्रमासाठी ५० बेड देण्यात येणार असून, २०० महिलांना शिलाई मशीनचे वितरण करून त्यांना स्वावलंबनाकडे वाटचाल करण्यास मदत केली जाणार आहे.

शिक्षणाच्या गुणवत्तेसाठी विविध १० शाळांमध्ये आरओ फिल्टर प्लांट बसविण्यात येणार आहेत. तसेच शहर व जिल्ह्यातील शाळांना डिजिटल स्मार्ट बोर्ड देण्यात येणार असून, १० शाळांमध्ये संगणक संच देऊन विद्यार्थ्यांना संगणक साक्षर करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. आर्थिक अडचणीमुळे शिक्षणापासून वंचित राहू नयेत या उद्देशाने ३०० विद्यार्थ्यांना शैक्षणिकदृष्ट्या दत्तक घेण्यात येणार आहे. याशिवाय सोलापुरात १०० ठिकाणी जनावरांसाठी पाण्याची सोय करण्यासाठी पाण्याची पात्रे बसविण्यात येणार असून, त्याठिकाणी नियमित पाणी पुरवठाही केला जाणार आहे.

वादळी वाऱ्यामुळे नुकसान झालेल्या घरांसाठी तसेच मंदिरांसाठी १ हजार पत्र्यांचे वाटप करण्यात येणार आहे. कुंभारी येथील लोकशाहीर आण्णाभाऊ साठे नगर येथे बोअर मारून सबमर्सिबल पंप बसविण्यात येणार असून ग्रामस्थांच्या पाण्याची सोय केली जाणार आहे. तसेच कुंभारी येथील गेनसिद्ध देवालय येथे ५८.५ केव्हीए क्षमतेचा जनरेटर बसविण्यात येणार आहे.आरोग्य उपक्रम राबवून मोठा दिलासा देण्यात येणार असून आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या गरजू रुग्णांसाठी विविध प्रकारच्या १०० शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणार आहेत. एकाच दिवशी इतक्या व्यापक प्रमाणावर राबविण्यात येणाऱ्या या महाउपक्रमामुळे सोलापूर जिल्ह्यात माणुसकीचा महोत्सव होणार आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन फाउंडेशनचे धर्मराज गुंडे, कौशल शिंदे, सूर्या शेट्टीयार, तुषार जोगदनकर, धीरज कारंडे यांनी केले आहे

  • वाढदिवसानिमित्त उपक्रमाची ठळक वैशिष्ट्ये – सोलापूर शहर-जिल्ह्यात १४ ठिकाणी एकाच दिवशी उपक्रम –
  • ५ हजार कुटुंबांना अन्नधान्य किट करत गरजूंना थेट आधार – शिक्षण, आरोग्य, पाणी व स्वावलंबनावर विशेष भर –
  • वरिष्ठ प्रशासनिक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शुभारंभ- ३०० विद्यार्थी दत्तक ,
  • १ हजार बॅग, २०० मुलींना सायकली वाटप
  • १०० मोफत शस्त्रक्रियाने गरीब रुग्णांना
  • दिलासा- २०० महिलांना शिलाई मशीन

Previous Post

सिद्धेश्वर एक्सप्रेस: सोलापूरची जीवनवाहिनी ५० वर्षांची!

Next Post

सामाजिक समता सप्ताह उद्घाटन — सोलापूर येथे सात दिवस चालणाऱ्या कार्यक्रमास प्रारंभ

Related Posts

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे
सोलापूर जिल्हा

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

September 8, 2026
‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा
सोलापूर जिल्हा

‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

September 8, 2026
सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव
सोलापूर जिल्हा

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

September 8, 2026
पॉक्सो प्रकरणातील दोन आरोपींना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन
सोलापूर जिल्हा

पॉक्सो प्रकरणातील दोन आरोपींना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन

September 8, 2026
किसन जाधव यांच्या पुढाकाराने श्रीकृष्ण मठात भक्तीचा जल्लोष; गुलाल सोहळा थाटात
सोलापूर जिल्हा

किसन जाधव यांच्या पुढाकाराने श्रीकृष्ण मठात भक्तीचा जल्लोष; गुलाल सोहळा थाटात

September 7, 2026
‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!
क्राईम

‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!

September 7, 2026
Next Post
सामाजिक समता सप्ताह उद्घाटन — सोलापूर येथे सात दिवस चालणाऱ्या कार्यक्रमास प्रारंभ

सामाजिक समता सप्ताह उद्घाटन — सोलापूर येथे सात दिवस चालणाऱ्या कार्यक्रमास प्रारंभ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

September 8, 2026
‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

September 8, 2026
सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

September 8, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In