Friday, September 11, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

रेल्वे स्टेशन परिसरात गवंडी कामगाराच्या गळ्यावर वार

Solapur Mirror by Solapur Mirror
September 10, 2026
in क्राईम, सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
रेल्वे स्टेशन परिसरात गवंडी कामगाराच्या गळ्यावर वार
0
SHARES
0
VIEWS

दोन दिवसांपासून होता बेपत्ता; सिव्हिलच्या आयसीयूत व्हेंटिलेटरवर उपचार

सोलापूर, : रेल्वे स्टेशन परिसरात गवंडी काम करणाऱ्या ३३ वर्षीय तरुणाच्या गळ्यावर अज्ञात व्यक्तीने धारदार शस्त्राने प्राणघातक वार केल्याची घटना गुरुवारी (दि. १०) उघडकीस आली. सागर अशोक माने (वय ३३, रा. विजापूर रोड, सोलापूर) असे गंभीर जखमी तरुणाचे नाव आहे. त्यांच्यावर शासकीय रुग्णालयातील अतिदक्षता विभागात व्हेंटिलेटरवर उपचार सुरू असून प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती त्यांच्या नातेवाइकांनी दिली.

नातेवाइकांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर माने हे गवंडी काम करून उदरनिर्वाह करतात. ते गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता होते. दरम्यान, रेल्वे स्टेशन परिसरात त्यांच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार झाल्याचे समोर आले. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. गळ्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून सध्या आयसीयूमध्ये व्हेंटिलेटरवर उपचार सुरू आहेत. सागर यांचा कौटुंबिक वाद सुरू असल्याने त्यांची पत्नी वेगळी राहत असल्याचे नातेवाइकांनी सांगितले. तसेच सागर यांची बहीण विद्या माने हिने प्रेमविवाह केला असून तिच्या सासरच्या मंडळींकडून तिला त्रास दिला जात असल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. बहिणीच्या कौटुंबिक वादात भाऊ म्हणून सागर हे मध्यस्थी करत असत. यापूर्वीही याच कारणातून सागर यांना मारहाण झाल्याचा दावा नातेवाइकांनी केला आहे.

या पूर्ववैमनस्यातूनच सागर यांच्यावर हल्ला घडवून आणण्यात आल्याचा संशय त्यांच्या आई आणि बहीण विद्या माने यांनी व्यक्त केला आहे. त्यांनी काही व्यक्तींवर संशय व्यक्त केला असला तरी या आरोपांची पोलिसांकडून अधिकृत पुष्टी झालेली नाही. हल्ल्यामागील नेमके कारण आणि हल्लेखोर कोण, हे पोलिस तपासानंतर स्पष्ट होणार आहे. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती नातेवाइकांनी दिली. सागर यांची प्रकृती गंभीर असल्याने कुटुंबीयांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

दोन दिवसांपासून शोध सुरू
सागर माने हे दोन दिवसांपासून घरी परतले नसल्याने कुटुंबीय त्यांचा शोध घेत होते. त्यानंतर ते गंभीर जखमी अवस्थेत आढळल्याची माहिती कुटुंबीयांना मिळाली. गळ्यावर गंभीर वार झाल्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. हल्ल्यापूर्वी सागर कुठे होते, ते कोणासोबत होते आणि रेल्वे स्टेशन परिसरात नेमके काय घडले, याचा उलगडा पोलिस तपासातून होण्याची शक्यता आहे.

Previous Post

शिक्षण संचालकांच्या उपस्थितीत ‘चला, शाळेत जाऊया’ कार्यशाळा संपन्न…

Next Post

मिरवणूक मार्गावरील धोकादायक विद्युत तारा हटवा ; महापौर विनायक कोंड्याल

Related Posts

अध्यात्माचे महत्त्व’ उलगडणार अभिनेत्री स्मिता जयकर
सोलापूर जिल्हा

अध्यात्माचे महत्त्व’ उलगडणार अभिनेत्री स्मिता जयकर

September 10, 2026
गोकूळचा ‘१५ महिन्यांचा पगार-पीएफ हिशेब द्या!’ खासदार प्रणिती शिंदे आक्रमक

September 9, 2026
‘ब्रेकिंग न्यूज’च्या धावपळीत आरोग्याला ब्रेक नको ; सहाय्यक पोलीस आयुक्त दिलीप पवार
सोलापूर जिल्हा

‘ब्रेकिंग न्यूज’च्या धावपळीत आरोग्याला ब्रेक नको ; सहाय्यक पोलीस आयुक्त दिलीप पवार

September 9, 2026
मटक्याच्या अड्ड्यावर पोलिसांची धडक; फॉर्च्युनरसह ३० लाखांचा मुद्देमाल जप्त
क्राईम

मटक्याच्या अड्ड्यावर पोलिसांची धडक; फॉर्च्युनरसह ३० लाखांचा मुद्देमाल जप्त

September 9, 2026
Next Post
मिरवणूक मार्गावरील धोकादायक विद्युत तारा हटवा ; महापौर विनायक कोंड्याल

मिरवणूक मार्गावरील धोकादायक विद्युत तारा हटवा ; महापौर विनायक कोंड्याल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अध्यात्माचे महत्त्व’ उलगडणार अभिनेत्री स्मिता जयकर

अध्यात्माचे महत्त्व’ उलगडणार अभिनेत्री स्मिता जयकर

September 10, 2026
गोकूळचा ‘१५ महिन्यांचा पगार-पीएफ हिशेब द्या!’ खासदार प्रणिती शिंदे आक्रमक

गोकूळचा ‘१५ महिन्यांचा पगार-पीएफ हिशेब द्या!’ खासदार प्रणिती शिंदे आक्रमक

September 10, 2026
मिरवणूक मार्गावरील धोकादायक विद्युत तारा हटवा ; महापौर विनायक कोंड्याल

मिरवणूक मार्गावरील धोकादायक विद्युत तारा हटवा ; महापौर विनायक कोंड्याल

September 10, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In