Tuesday, September 8, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

संवेद २०२६’ स्मार्ट गव्हर्नन्स हॅकाथॉन अंतिम प्रकल्प प्रदर्शन व पारितोषिक वितरण सोहळा

Solapur Mirror by Solapur Mirror
April 17, 2026
in सोलापूर शहर, सोलापूर जिल्हा
0
संवेद २०२६’ स्मार्ट गव्हर्नन्स हॅकाथॉन अंतिम प्रकल्प प्रदर्शन व पारितोषिक वितरण सोहळा
0
SHARES
9
VIEWS

टीम अॅक्वाबाइट प्रथम तर द्वितीय टीम सुपरनोवा

सोलापूर : “संवेद २०२६ हॅकाथॉनमधून शहरातील नागरी समस्यांवर अनेक अभिनव आणि व्यवहार्य उपाय समोर आले आहेत. विद्यार्थ्यांच्या संकल्पनांतून सोलापूरच्या विकासाला नवी दिशा मिळेल. या कल्पनांची अंमलबजावणी करून शहरातील सेवा अधिक सक्षम करण्यासाठी आम्ही पुढाकार घेऊ,” असे प्रतिपादन सोलापूरचे महापौर विनायक कोंडयाल यांनी केले.
एमआयटी विश्वप्रयाग विद्यापीठात सोलापूर महानगरपालिकेच्या सहकार्याने आयोजित ‘संवेद २०२६’ स्मार्ट गव्हर्नन्स हॅकाथॉनच्या अंतिम प्रकल्प प्रदर्शन व पारितोषिक वितरण सोहळ्यात ते बोलत होते. या राष्ट्रीय स्तरावरील उपक्रमात देशभरातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत नागरी समस्यांवर नाविन्यपूर्ण उपाय सादर केले.

पारितोषिक वितरण समारंभ सोलापूरचे माननीय महापौर विनायक कोंडयाल, महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे, अच्युत गोडबोले, प्रा. कृष्णा वेदुला, प्रा. विल्यम ओक्स, एमआयटी विश्वप्रयाग विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. गोपाळकृष्ण जोशी, उपायुक्त आशिष लोकरे , संचालक राघवेंद्र एम. चाटे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. या कार्यक्रमास महापालिका उपायुक्त आशिष लोकरे, विद्यापीठाचे कुलसचिव प्राणेश मुरनाळ, डॉ. प्रभा कासलीवाल, डॉ. दर्शन रुईकर, डॉ. आनंद शिंपी उपस्थित होते. महानगरपालिका आयुक्त डॉ. सचिन ओंबासे म्हणाले की, विद्यार्थ्यांनी सुचवलेल्या उपाययोजनांना प्रत्यक्ष प्रकल्पांमध्ये रूपांतर करण्यासाठी महापालिका कटिबद्ध आहे.यासाठी आम्ही आवश्यक ते आर्थिक, पायाभूत आणि मनुष्यबळाचे साहाय्य देण्यात येईल. पुढील सहा महिने ते एक वर्षाच्या कालावधीत या संकल्पनांचा पाठपुरावा करण्यात येणार असून, विद्यार्थ्यांना इंटर्नशिपची संधीही उपलब्ध करून देण्यात येईल.

एमआयटी विश्वप्रयाग विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. गोपळकृष्ण जोशी म्हणाले, विद्यापीठ म्हणून आम्ही विद्यार्थ्यांना समस्या-निवारक म्हणून घडवण्यासाठी कटिबद्ध आहोत. ‘हॅकाथॉन’ हा आजच्या जेन-झी’ला (Gen Z) समस्या सोडवण्याच्या प्रक्रियेत सहभागी करून घेण्याचा एक अत्यंत प्रभावी मार्ग आहे. या हॅकाथॉनमध्ये विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या उपायांची गुणवत्ता आणि नाविन्यता अत्यंत उल्लेखनीय आहे.

हॅकाथॉनची ठळक वैशिष्ट्ये :

  • देशातील १० राज्यांतील २७००+ विद्यार्थ्यांचा सहभाग
  • एकूण ५४६ संघांची नोंदणी; ७५ संघांची निवड
  • अंतिम फेरीत २५ उत्कृष्ट संघांचा प्रवेश
  • नागरी समस्या : वाहतूक, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य, पार्किंग .
  • तज्ज्ञ मार्गदर्शन व MATLAB कार्यशाळेमुळे कौशल्यवृद्धी
  • आंतरशाखीय सहभागामुळे नाविन्यपूर्ण उपायांची निर्मिती

विजेते संघ असे :

  • प्रथम क्रमांक : ‘टीम अॅक्वाबाइट’ (आर.व्ही. कॉलेज, बंगळुरू) – २ लाख रुपये.
  • द्वितीय : ‘टीम सुपरनोवा’ (एसआयईएस, नवी मुंबई) – १ लाख रुपये.
  • उत्तेजनार्थ (प्रत्येकी ५० हजार रुपये) :
  • टीम आयओटीयन्स (फ्रां.सी. रोड्रिग्स आयटी)
  • टीम किलोबाईट (एनआयआयटी, राजस्थान)
  • टीम हायड्रो-ऑप्स (केएलई युनिव्हर्सिटी, हुबळी)
  • स्पेशल ज्यूरी अवॉर्ड : टीम गॉड-डॅम (केएलई युनिव्हर्सिटी, हुबळी) – २५ हजार रुपये
Previous Post

जिल्हा परिषद लिपीक संघटनेच्या जिल्हाध्यक्ष पदी अविनाश गोडसे यांची निवड

Next Post

साहेब कित्येक वर्ष झाले पण आमच्या घरासमोरचा रस्ता झाला नाही ; पण आज तुम्ही ते काम पूर्ण केलं..

Related Posts

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे
सोलापूर जिल्हा

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

September 8, 2026
‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा
सोलापूर जिल्हा

‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

September 8, 2026
सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव
सोलापूर जिल्हा

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

September 8, 2026
पॉक्सो प्रकरणातील दोन आरोपींना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन
सोलापूर जिल्हा

पॉक्सो प्रकरणातील दोन आरोपींना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन

September 8, 2026
किसन जाधव यांच्या पुढाकाराने श्रीकृष्ण मठात भक्तीचा जल्लोष; गुलाल सोहळा थाटात
सोलापूर जिल्हा

किसन जाधव यांच्या पुढाकाराने श्रीकृष्ण मठात भक्तीचा जल्लोष; गुलाल सोहळा थाटात

September 7, 2026
‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!
क्राईम

‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!

September 7, 2026
Next Post
साहेब कित्येक वर्ष झाले पण आमच्या घरासमोरचा रस्ता झाला नाही ; पण आज तुम्ही ते काम पूर्ण केलं..

साहेब कित्येक वर्ष झाले पण आमच्या घरासमोरचा रस्ता झाला नाही ; पण आज तुम्ही ते काम पूर्ण केलं..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

September 8, 2026
‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

September 8, 2026
सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

September 8, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In