Friday, September 11, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

गोकूळचा ‘१५ महिन्यांचा पगार-पीएफ हिशेब द्या!’ खासदार प्रणिती शिंदे आक्रमक

Solapur Mirror by Solapur Mirror
September 10, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
गोकूळचा ‘१५ महिन्यांचा पगार-पीएफ हिशेब द्या!’ खासदार प्रणिती शिंदे आक्रमक
0
SHARES
0
VIEWS

प्रशासनाने तोडगा न काढल्यास तीव्र आंदोलन; खासदार प्रणिती शिंदे यांचा इशारा

सोलापूर, : धोत्री (ता. दक्षिण सोलापूर) येथील गोकूळ शुगर कारखान्यातील कामगारांना गेल्या पंधरा महिन्यांपासून पगार मिळालेला नसल्याचा दावा कामगारांनी केला आहे. यासोबतच त्यांच्या भविष्य निर्वाह निधीची (पीएफ) रक्कमही थकीत असल्याने कामगार आर्थिक संकटात सापडले आहेत. प्रशासनाने या प्रश्नावर तातडीने तोडगा न काढल्यास स्वतः पुढाकार घेऊन कामगारांसाठी तीव्र आंदोलन उभे करू, असा इशारा खासदार प्रणिती शिंदे यांनी दिला. थकीत पगार आणि भविष्य निर्वाह निधीच्या मागणीसाठी गोकूळ शुगरच्या कामगारांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे. गेल्या महिनाभरा पासून कामगारांनी विविध प्रशासकीय यंत्रणांच्या प्रमुखांना निवेदने देऊन थकीत वेतनाचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली. मात्र, अद्याप ठोस कार्यवाही झाली नसल्याचा आरोप कामगारांनी केला आहे. त्यामुळे गेल्या आठवडाभरापासून कारखान्याच्या प्रवेशद्वारावर कामगारांचे मूक आंदोलन सुरू आहे.

मंगळवारी खासदार प्रणिती शिंदे यांनी आंदोलनस्थळी भेट देत कामगारांशी संवाद साधला. यावेळी कामगारांनी आपल्या व्यथा त्यांच्यासमोर मांडल्या. पंधरा महिन्यांपासून वेतन मिळाले नसल्याने घरखर्च, मुलांचे शिक्षण, आरोग्यावरील खर्च तसेच दैनंदिन गरजा भागविताना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे कामगारांनी सांगितले. कामगारांच्या थकीत वेतनाबरोबरच भविष्य निर्वाह निधीचा प्रश्नही गंभीर असल्याचे खासदार शिंदे यांनी सांगितले. या प्रकरणात जिल्हाधिकारी तसेच कामगार आयुक्तांकडे जाब विचारणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कामगारांचे पंधरा महिन्यांचे वेतन आणि पीएफ थकीत असताना संबंधित यंत्रणांनी आतापर्यंत काय कार्यवाही केली, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

कामगारांच्या हक्काचा पैसा त्यांना मिळालाच पाहिजे. प्रशासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहून कारखाना व्यवस्थापनाशी चर्चा करावी आणि कामगारांच्या थकीत वेतनासह पीएफबाबत तातडीने निर्णय घ्यावा. अन्यथा कामगारांच्या न्याय्य हक्कांसाठी तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा खासदार शिंदे यांनी दिला.

महिनाभर निवेदने; आठवडाभरापासून मूक आंदोलन
थकीत पगारासाठी गोकूळ शुगरच्या कामगारांचा महिनाभरापासून प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा सुरू आहे. विविध अधिकाऱ्यांना निवेदने देऊनही प्रश्न निकाली न निघाल्याने कामगारांनी कारखान्याच्या प्रवेशद्वारावर मूक आंदोलन सुरू केले आहे. पंधरा महिन्यांचे थकीत वेतन आणि पीएफची रक्कम तातडीने मिळावी, ही कामगारांची प्रमुख मागणी आहे.

Previous Post

मिरवणूक मार्गावरील धोकादायक विद्युत तारा हटवा ; महापौर विनायक कोंड्याल

Next Post

अध्यात्माचे महत्त्व’ उलगडणार अभिनेत्री स्मिता जयकर

Related Posts

अध्यात्माचे महत्त्व’ उलगडणार अभिनेत्री स्मिता जयकर
सोलापूर जिल्हा

रेल्वे स्टेशन परिसरात गवंडी कामगाराच्या गळ्यावर वार
क्राईम

रेल्वे स्टेशन परिसरात गवंडी कामगाराच्या गळ्यावर वार

September 10, 2026
शिक्षण संचालकांच्या उपस्थितीत ‘चला, शाळेत जाऊया’ कार्यशाळा संपन्न…
सोलापूर जिल्हा

शिक्षण संचालकांच्या उपस्थितीत ‘चला, शाळेत जाऊया’ कार्यशाळा संपन्न…

September 9, 2026
‘ब्रेकिंग न्यूज’च्या धावपळीत आरोग्याला ब्रेक नको ; सहाय्यक पोलीस आयुक्त दिलीप पवार
सोलापूर जिल्हा

‘ब्रेकिंग न्यूज’च्या धावपळीत आरोग्याला ब्रेक नको ; सहाय्यक पोलीस आयुक्त दिलीप पवार

September 9, 2026
मटक्याच्या अड्ड्यावर पोलिसांची धडक; फॉर्च्युनरसह ३० लाखांचा मुद्देमाल जप्त
क्राईम

मटक्याच्या अड्ड्यावर पोलिसांची धडक; फॉर्च्युनरसह ३० लाखांचा मुद्देमाल जप्त

September 9, 2026
Next Post
अध्यात्माचे महत्त्व’ उलगडणार अभिनेत्री स्मिता जयकर

अध्यात्माचे महत्त्व’ उलगडणार अभिनेत्री स्मिता जयकर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अध्यात्माचे महत्त्व’ उलगडणार अभिनेत्री स्मिता जयकर

अध्यात्माचे महत्त्व’ उलगडणार अभिनेत्री स्मिता जयकर

September 10, 2026
गोकूळचा ‘१५ महिन्यांचा पगार-पीएफ हिशेब द्या!’ खासदार प्रणिती शिंदे आक्रमक

गोकूळचा ‘१५ महिन्यांचा पगार-पीएफ हिशेब द्या!’ खासदार प्रणिती शिंदे आक्रमक

September 10, 2026
मिरवणूक मार्गावरील धोकादायक विद्युत तारा हटवा ; महापौर विनायक कोंड्याल

मिरवणूक मार्गावरील धोकादायक विद्युत तारा हटवा ; महापौर विनायक कोंड्याल

September 10, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In