Monday, September 7, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

खा. डॉ. ज्योती वाघमारे यांच्या हस्ते अत्याधुनिक ओपन जिमचे उद्घाटन.

Solapur Mirror by Solapur Mirror
July 5, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
खा. डॉ. ज्योती वाघमारे यांच्या हस्ते अत्याधुनिक ओपन जिमचे उद्घाटन.

सोलापूर – ओपन जिम ही केवळ सुविधा नसून नागरिकांच्या आरोग्यातील गुंतवणूक आहे, असे प्रतिपादन खासदार डॉ. ज्योती वाघमारे यांनी केले.राज्यसभा खासदार प्रा. डॉ. ज्योती वाघमारे यांच्या विशेष प्रयत्नातून तसेच तत्कालीन मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विशेष निधीतून विजयपूर रस्त्यावरील धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज तलाव येथे उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक ओपन जिमचे लोकार्पण खा. डॉ. ज्योती वाघमारे यांच्या हस्ते रविवारी झाले.

प्रारंभी विधिवत पूजन, नारळ फोडून व फीत कापून खासदार डॉ. ज्योती वाघमारे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख अमर पाटील, सोलापूर महानगरपालिका प्रभाग क्रमांक १६ चे नगरसेवक प्रियदर्शन साठे, अक्कलकोट तालुक्यातील तोणूर पंचायत समिती सदस्या शीतल म्हेत्रे, माजी क्रीडा अधिकारी मारेप्पा कंपली, बाबू म्हेत्रे, भीमा वाघमारे, अल्पसंख्याक प्रमुख गफूर शेख, श्याम कदम, दीपक पाटील, मिलिंद ठोंबरे, दीपक गायगवळी, शुभदा पाटील, पार्वती ढेरे, किरण पाटील, अविनाश जाधव, रियाज शेख, शेख, शिवाजी साठे, नागेश, धनंजय पाटील, मेहबूब शेख, ऋषी घोलप, जेटी थोर, दीपक गायगवळी, राजू माने, प्रमोद मसल, अष्टविनायक बिराजदार, सिद्धार्थ रणदिवे, शहीद तांबोळी, सोमनाथ सिद्ध, गणेश, अश्विनी शिंदे, यशपाल आखाडे, रवी गायगवळी, विजय वाघमारे, रवी निकम, इब्राहिम पटेल, विनीत जाधव, महादेव तडकले, प्रज्वल बोंदार्डे यांच्यासह महिला, ज्येष्ठ नागरिक व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी खासदार प्रा. डॉ. ज्योती वाघमारे म्हणाल्या की, “निरोगी समाज घडविण्यासाठी नियमित व्यायाम ही काळाची गरज आहे. ओपन जिममुळे युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांना अत्याधुनिक व्यायाम साहित्याचा मोफत लाभ मिळणार असून शारीरिक तंदुरुस्ती वाढण्यास, लठ्ठपणा, मधुमेह, रक्तदाब व हृदयविकारासारख्या जीवनशैलीजन्य आजारांवर नियंत्रण ठेवण्यास मदत होईल.

नागरिकांच्या आरोग्यासाठी ही अत्यंत उपयुक्त सुविधा ठरणार आहे. त्या पुढे म्हणाल्या की, नागरिकांच्या मागणीची दखल घेत तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून हा निधी उपलब्ध करून घेतला. आगामी काळात श्री छत्रपती संभाजी महाराज तलाव परिसराचे सर्वांगीण सुशोभीकरण, आकर्षक वॉकिंग ट्रॅक, महिलांसाठी सुसज्ज प्रसाधनगृहे, बैठकीची व्यवस्था, हिरवळ, प्रकाश व्यवस्था, सुरक्षा उपाययोजना तसेच कुटुंबासह विरंगुळा मिळेल असे आधुनिक उद्यान विकसित करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील. या संपूर्ण परिसराचा चेहरामोहरा बदलून तो शहरातील पर्यटन केंद्र म्हणून विकसित करण्याचा आमचा संकल्प आहे.

अनेक वर्षांपासून नागरिकांकडून ओपन जिमची मागणी होत होती. ती पूर्ण झाल्याने विजयपूर रस्ता, मोदी, शिवाजीनगर व परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त करत खासदार प्रा. डॉ. ज्योती वाघमारे तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले. उपस्थित ज्येष्ठ नागरिक व महिलांनीही या सुविधेमुळे नियमित व्यायामाची सवय लागून परिसरातील नागरिकांचे आरोग्य अधिक सक्षम होण्यास मोठी मदत होईल, अशी भावना व्यक्त केली.

Previous Post

वारकऱ्यांच्या सेवेसाठी यंदा वारीत ३५३ रुग्णवाहिका, ४३ आयसीयू आणि प्रथमच एअर ॲम्बुलन्स..

Next Post

रविवार पेटीत टॉवेल कारखान्याला भीषण आग ; अग्निशमन दलाच्या तीन गाड्यांनी आगीवर नियंत्रण

Related Posts

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले
सोलापूर जिल्हा

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..
सोलापूर जिल्हा

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट
सोलापूर जिल्हा

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार
सोलापूर जिल्हा

बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार

September 2, 2026
शालार्थ घोटाळ्याचा ‘हिशेब’ आता डिसेंबरअखेर! ; उपसचिवांनी काढला आदेश
सोलापूर जिल्हा

शालार्थ घोटाळ्याचा ‘हिशेब’ आता डिसेंबरअखेर! ; उपसचिवांनी काढला आदेश

September 2, 2026
विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात ‘क्रीडा’ विषयाचा समावेश व्हावा
सोलापूर जिल्हा

विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात ‘क्रीडा’ विषयाचा समावेश व्हावा

September 2, 2026
Next Post
रविवार पेटीत  टॉवेल कारखान्याला भीषण आग ; अग्निशमन दलाच्या तीन गाड्यांनी  आगीवर नियंत्रण

रविवार पेटीत टॉवेल कारखान्याला भीषण आग ; अग्निशमन दलाच्या तीन गाड्यांनी आगीवर नियंत्रण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In