सोलापूर: सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील गुन्हेगारी वृत्तांकन करणाऱ्या पत्रकारांची शिखर संस्था असलेल्या ‘सोलापूर दैनिक क्राईम रिपोर्टर असोसिएशन’ च्या नूतन कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली आहे. अध्यक्षपदी दैनिक सकाळचे तात्या लांडगे यांची, तर सरचिटणीसपदी जनदर्पण न्यूज चॅनेलचे रजनीकांत उपलंची यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी, ५ एप्रिल रोजी दै. सुराज्यचे अखलाक शेख यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडली. या बैठकीत मागील वर्षाच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला आणि आगामी एक वर्षासाठी नवीन पदाधिकाऱ्यांची निवड जाहीर करण्यात आली.
याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार अनिल कदम (दैनिक संचार), अरुण रोटे (दै. जनसत्य), अमोल व्यवहारे (दै. तरुण भारत संवाद) आणि भरतकुमार मोरे (दैनिक पुण्यनगरी) यांची प्रमुख उपस्थिती होती. नूतन कार्यकारिणीच्या निवडीबद्दल सोलापूरमधील पत्रकारिता क्षेत्रातून आणि विविध सामाजिक स्तरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. गुन्हेगारी क्षेत्रातील वास्तव आणि जनहितार्थ बातम्या समाजासमोर मांडण्यासाठी ही संघटना कटिबद्ध असल्याचे नूतन पदाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.

नूतन कार्यकारिणी खालीलप्रमाणे:
- अध्यक्ष: तात्या लांडगे (दैनिक सकाळ)
- उपाध्यक्ष: मुन्ना शेख
- सरचिटणीस: रजनीकांत उपलंची (जनदर्पण न्यूज चॅनेल)
- खजिनदार: रूपेश हेळवे (दैनिक लोकमत)
- सहचिटणीस: इरफान शेख (महाराष्ट्र टाइम्स)
- कार्यकारिणी सदस्य: मुज्जमिल शहानुरकर, मुकुंद उकरंडे, रोहन नंदाने, रत्नदीप सोनवणे, परशुराम कोकणे.
- सल्लागार समिती: अखलाक शेख, अनिल कदम, संजय जाधव, अरुण रोटे, सरदार आत्तार, विलास जळकोटकर, अमोल व्यवहारे, धनंजय मोरे, विनायक होटकर, विजयकुमार राजापुरे, भरतकुमार मोरे.










