Monday, July 27, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

प्रिसिजन संगीत महोत्सवात पहिल्या दिवशी सुरांनी मन जिंकले,

Solapur Mirror by Solapur Mirror
February 8, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
प्रिसिजन संगीत महोत्सवात पहिल्या दिवशी सुरांनी मन जिंकले,
0
SHARES
12
VIEWS

आज एस. आकाश यांचे बासरी, यज्ञेश रायकर यांचे व्हायोलिन वादन व देवकी पंडित यांचे गायन

सोलापूर हुतात्मा स्मृती मंदिर सभागृहात शनिवारची (दि.७) संध्याकाळ श्रोत्यांसाठी अविस्मरणीय अशीच ठरली. व्यासपिठावर सूर बोलत होते आणि मन मंत्रमुग्ध होत होतं. प्रिसिजन फाऊंडेशनच्यावतीने आयोजित अकराव्या प्रिसिजन संगीत महोत्सवाच्या पहिल्या दिवशी सोलापूरकर रसिकांनी केवळ संगीत ऐकलं नाही, तर ते मनापासून अनुभवलं. पहिल्या दिवशी सूरांनी मन जिंकले अन् स्वरांनी आत्मा.

पहिल्या सत्रात प्रख्यात सतारवादक निखिल पटवर्धन यांनी राग पुरिया कल्याणने जणू संध्याकाळी एक शांत दीप प्रज्वलित केला. सतारीचा पहिला सूर उमटताच सभागृहातील प्रेक्षक शहारले. आलापातून हळूहळू उलगडणारे सूर मनाचा खोलवर ठाव घेत होते. ते कधी मौन प्रश्न विचारत होते, तर सूर सतारीतून त्यांना उत्तर देत होते. विलंबित बंदिशीतल्या गहिऱ्या छटा आणि द्रुत बंदिशीतील तेजस्वी उंची यांतून एक भावप्रवास उलगडत गेला. मारवा थाटातील या रागात सतार जणू स्वतःशीच संवाद साधत होती आणि रसिक त्या संवादाचे साक्षीदार बनले होते. तबल्यावर पांडुरंग पवार यांनी दिलेली समर्थ साथ या सुरेल संभाषणाला अधिक अर्थपूर्ण बनवत होती. सतार आणि तबल्याच्या या जुगलबंदीतून जे काही घडत होतं, ते ऐकणं नव्हतंच, ते जगणं होतं.
सुरुवातीला निखिल पटवर्धन यांनी सतारीबद्दल सांगितलेले काही शब्दही रसिकांच्या मनाशी थेट नातं जोडणारे ठरले.

दुसऱ्या सत्रात स्वरांनी भावनांचा हात धरला. सुप्रसिद्ध गायिका मंजिरी कर्वे-आलेगावकर यांच्या आवाजातली सोज्ज्वळता सभागृहात पसरताच वातावरण अंतर्मुख झालं. राग जयताश्रीमधील त्यांचे सूर मनाला अलगद स्पर्श करत होते. जणू कुणी आपल्याशी हळूच संवाद साधावा असे. पंडित कुमार गंधर्वांचा तराना सादर करतानाच आलेगावकर यांनी स्वरांमधल्या आघातांचे महत्वही स्पष्ट केले. शुद्ध निषादात सादर राग बिहागडामध्ये तर रसिक पूर्णपणे हरवून गेले आणि संत कबीरांच्या निर्गुणी भजनावेळी… काळ जणू थांबलाच. सभागृह स्तब्ध झाले. फक्त उरले ते भाव. प्रत्येक ओळ मनात खोलवर झिरपत होती, डोळ्यांत नकळत ओल आणत होती. हार्मोनियमवर सौरव दांडेकर, तबल्यावर अजित किंबहुने आणि तानपुऱ्यावर प्राची जोगळेकर आणि स्वराली आलेगावकर यांनी दिलेली साथ या भावनांना आधार देणारी ठरली. भजन संपल्यानंतर क्षणभराची शांतता आणि त्यानंतरचा ‘वाहवा’ हा रसिकांच्या अंतःकरणातून उमटलेला प्रतिसाद होता

Previous Post

दुचाकी अपघातात २५ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू

Next Post

माता रमाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दिमाखदार मिरवणूक !

Related Posts

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क
सोलापूर जिल्हा

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा
सोलापूर जिल्हा

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

July 27, 2026
रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन
सोलापूर जिल्हा

रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

July 27, 2026
गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..
सोलापूर जिल्हा

गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..

July 27, 2026
केगावच्या बिग सी कॉलेजमध्ये ; बायोमेडिकल इंजिनिअरिंगच्या ६३ जागांसाठी प्रवेश सुरु.
सोलापूर जिल्हा

केगावच्या बिग सी कॉलेजमध्ये ; बायोमेडिकल इंजिनिअरिंगच्या ६३ जागांसाठी प्रवेश सुरु.

July 27, 2026
उत्कृष्ट नियोजनाला ; मुख्यमंत्र्यांकडून जिल्हा परिषदेचे कौतुक..
सोलापूर जिल्हा

उत्कृष्ट नियोजनाला ; मुख्यमंत्र्यांकडून जिल्हा परिषदेचे कौतुक..

July 26, 2026
Next Post
माता रमाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दिमाखदार मिरवणूक !

माता रमाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दिमाखदार मिरवणूक !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

July 27, 2026
रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

July 27, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025