शहराच्या विकासासाठी कोट्यवधींच्या निधीचा पाऊस
सोलापूर: भारतीय जनता पार्टी शहर-जिल्हा शाखेच्या वतीने मंगळवार, दि. २८ एप्रिल २०२६ रोजी सोलापुरात भव्य ‘विजयी मेळावा व कृतज्ञता सोहळा’आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न होणार असून, सोलापूरकरांच्या वतीने त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात येणार आहे.

महत्त्वाच्या घोषणा आणि करार या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहर आणि जिल्ह्यासाठी फडणवीस सरकारने अनेक महत्त्वपूर्ण प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. बॅनरमध्ये नमूद केल्यानुसार खालील विकासकामांवर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे: सोलापूर शहराला दररोज पाणीपुरवठा करण्यासाठी १३७८ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यामुळे शहराचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटण्यास मदत होईल. अक्कलकोट रोड एम.आय.डी.सी. आणि होटगी रोड औद्योगिक वसाहतीसाठी ९६ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. सोलापुरात आय.टी. पार्कसाठी जागा हस्तांतरित करण्याचा शासन आदेश (GR) १६ फेब्रुवारी २०२६ रोजी निर्गमित करण्यात आला आहे. पुढील १५ दिवसांत सोलापुरात अभियांत्रिकी महाविद्यालयाला मंजुरी मिळणार आहे. उजनी धरण येथे फ्लोटिंग सोलर पीव्ही, बॅटरी ऊर्जा साठवण प्रणाली आणि शाश्वत आणि १,२८,८८३ कोटी रुपयांचा करार १७ एप्रिल २०२६ रोजी संपन्न झाला आहे.

हा प्रकल्प जेडब्ल्यू ग्लोबल इंडिया व द सीड कन्सोर्टियम पार्टनर्स यांच्या सहकार्याने राबवला जाणार आहे.या कार्यक्रमाचे नियोजन आमदार सचिन कल्याणशेट्टी, देवेंद्र राजेश कोठे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. याप्रसंगी भाजपचे सर्व स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सोलापूरकर मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.










