Wednesday, May 20, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

सोलापूर महापालिकेतील परिवहन समिती निवडीचा तिढा सुटणार?

SOLAPUR MIRROR by SOLAPUR MIRROR
May 12, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
सोलापूर महापालिकेतील परिवहन समिती निवडीचा तिढा सुटणार?
0
SHARES
23
VIEWS

२० मेच्या सर्वसाधारण सभेत सदस्य निवडीची शक्यता; इच्छुकांकडून जोरदार लॉबिंग सुरू

सोलापूर : सोलापूर महापालिकेतील गेल्या दोन महिन्यांपासून रखडलेल्या परिवहन समिती सदस्यांच्या निवडीचा तिढा अखेर सुटण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. येत्या २० मे रोजी होणाऱ्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत परिवहन समितीच्या सदस्यांची निवड करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. पक्षाच्या बैठकीत मोठे फेरबदल करण्याबाबत चर्चा झाली असून अंतिम निर्णय महापौर घेणार असल्याचे सांगितले जात आहे.

परिवहन समितीवर वर्णी लागावी यासाठी विविध पक्षांतील इच्छुकांनी जोरदार लॉबिंग सुरू केले आहे. काही नगरसेवकांनी पक्षश्रेष्ठींकडे फिल्डिंग लावत आपली दावेदारी मजबूत करण्याचे प्रयत्न सुरू केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. समितीत स्थान मिळवण्यासाठी अनेक इच्छुकांकडून पडद्यामागील हालचालींनाही वेग आला आहे. दरम्यान, भाजपकडील स्वीकृत नगरसेवकाचे एक पद अद्याप रिक्त ठेवण्यात आले आहे. या पदावर कोणाची वर्णी लागणार याबाबतही उत्सुकता वाढली असून पक्षासाठी सातत्याने काम केलेल्या एखाद्या निष्ठावान कार्यकर्त्याला संधी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याबाबतचा अंतिम निर्णयही २० मेच्या सभेत होण्याची शक्यता आहे.

महापालिकेतील आगामी राजकीय समीकरणांच्या दृष्टीने परिवहन समितीची निवड आणि स्वीकृत नगरसेवक पदाची नियुक्ती महत्त्वाची मानली जात आहे. त्यामुळे २० मे रोजीची सर्वसाधारण सभा राजकीयदृष्ट्या विशेष चर्चेची ठरणार असल्याचे बोलले जात आहे.

Tags: आमदार देवेंद्र कोठेनगरसेवकसोलापूर महापालिका
Previous Post

आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्यावर दुःखाचा डोंगर; सांगोला तालुक्यात हळहळ

Next Post

सहारा गन हाऊससमोर गंधक भरलेल्या काडतुसांचा भीषण स्फोट

Related Posts

मान्सूनपूर्व तयारीला वेग; सर्व यंत्रणांनी सज्ज राहा ; अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांचे निर्देश
सोलापूर जिल्हा

मान्सूनपूर्व तयारीला वेग; सर्व यंत्रणांनी सज्ज राहा ; अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांचे निर्देश

May 19, 2026
जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग ; १८ जूनला मतदान, २५ जूनपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण
सोलापूर जिल्हा

जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग ; १८ जूनला मतदान, २५ जूनपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण

May 19, 2026
पर्यावरणपूरक संदेश देत महापौरसह उपमहापौर  ई-बाईकवरून महापालिकेत दाखल
सोलापूर जिल्हा

पर्यावरणपूरक संदेश देत महापौरसह उपमहापौर ई-बाईकवरून महापालिकेत दाखल

May 18, 2026
मंद्रूप येथील शेततळ्यात बुडून दोन शाळकरी मुलांचा दुर्दैवी मृत्यू
सोलापूर जिल्हा

मंद्रूप येथील शेततळ्यात बुडून दोन शाळकरी मुलांचा दुर्दैवी मृत्यू

May 18, 2026
राजू शेट्टी यांच्या शक्तीपीठ महामार्गाला माढ्यात तीव्र विरोध ; “एक इंचही जमीन देणार नाही”चा निर्धार
सोलापूर जिल्हा

राजू शेट्टी यांच्या शक्तीपीठ महामार्गाला माढ्यात तीव्र विरोध ; “एक इंचही जमीन देणार नाही”चा निर्धार

May 17, 2026
विजापूर रोड हद्दीत घरफोडी करणाऱ्या ‘मंत्री’ला ४८ तासांत केले गजाआड
क्राईम

विजापूर रोड हद्दीत घरफोडी करणाऱ्या ‘मंत्री’ला ४८ तासांत केले गजाआड

May 17, 2026
Next Post
सहारा गन हाऊससमोर गंधक भरलेल्या काडतुसांचा भीषण स्फोट

सहारा गन हाऊससमोर गंधक भरलेल्या काडतुसांचा भीषण स्फोट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मान्सूनपूर्व तयारीला वेग; सर्व यंत्रणांनी सज्ज राहा ; अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांचे निर्देश

मान्सूनपूर्व तयारीला वेग; सर्व यंत्रणांनी सज्ज राहा ; अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांचे निर्देश

May 19, 2026
जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग ; १८ जूनला मतदान, २५ जूनपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण

जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग ; १८ जूनला मतदान, २५ जूनपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण

May 19, 2026
पर्यावरणपूरक संदेश देत महापौरसह उपमहापौर  ई-बाईकवरून महापालिकेत दाखल

पर्यावरणपूरक संदेश देत महापौरसह उपमहापौर ई-बाईकवरून महापालिकेत दाखल

May 18, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025