Wednesday, May 20, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

वरूण राजाच्या साक्षीने उत्साही अन आनंदमयी वातावरणात जुळल्या १० जोडप्यांच्या रेशीमगाठी

SOLAPUR MIRROR by SOLAPUR MIRROR
May 8, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
वरूण राजाच्या साक्षीने उत्साही अन आनंदमयी वातावरणात जुळल्या १० जोडप्यांच्या रेशीमगाठी
0
SHARES
12
VIEWS

सोलापूर : सायंकाळची अल्हाददायक वेळ…. वऱ्हाडी मंडळींची लगबग…. समाजातील सर्व स्तरातील मान्यवरांची उपस्थिती आणि सुस्वर मंगलाष्टके अन वरुणराजाची उपस्थिती अशा वातावरणात १० जोडप्यांच्या रेशीमगाठी जुळल्या. निमित्त होते नरेंद्र काळे मित्र परिवारातर्फे आयोजित सामुदायिक विवाह सोहळ्याचे.पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त सोलापूर महानगरपालिकेचे सभागृह नेते नरेंद्र काळे आणि मित्र परिवारातर्फे गुरुवारी सायंकाळी गोरज मुहूर्तावर टाकळीकर मंगल कार्यालयात दिमाखदार सामुदायिक विवाह सोहळा झाला. विवाहाप्रसंगी पावसाच्या हलक्या सरींची बरसात करून जणू वरुण राजानेही नवदाम्पत्यांना आशीर्वाद दिले.

याप्रसंगी व्यासपीठावर पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार विजयकुमार देशमुख, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार देवेंद्र कोठे, माजी आमदार दिलीप माने, सोमलिंग घुली महाराज, सिद्धलिंग महाराज, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, मनोरमा परिवाराचे प्रमुख श्रीकांत मोरे, महापालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओंबासे, उपायुक्त वीणा पवार, स्थायी समितीच्या सभापती रंजिता चाकोते, भाजपच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर, माजी महापौर श्रीकांचना यन्नम, उद्योगवर्धिनीच्या संस्थापिका चंद्रिका चौहान, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमर पाटील, काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे, गोविंद काळे, सुमन काळे, संयोजक आणि सोलापूर महानगरपालिकेचे सभागृह नेते नरेंद्र काळे, रजनी काळे यांची प्रमुख उपस्थित होती.गुरुवारी सकाळी टाकळीकर मंगल कार्यालयात वधू-वरांच्या देव अक्षता झाल्या. यावेळी वधू-वरांना सफारी, शालू, मणी मंगळसूत्र, जोडवे, चप्पल, बूट, संसारोपयोगी भांडी, पुस्तके देण्यात आली.

यावेळी भाजपच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर, राम तडवळकर, पोलीस उपायुक्त विजय कबाडे, जिल्हा सरकारी वकील ऍड. प्रदीपसिंग राजपूत, उद्योगवर्धिनीच्या संस्थापिका अध्यक्षा चंद्रिका चौहान, सिद्धेश्वर पाटील, राजेंद्र हजारे, बाळासाहेब शेळके, अर्जुन सलगर, डॉ. योगेश राठोड, गोविंद काळे, सुमन काळे, संयोजक नरेंद्र काळे, रजनी काळे यांची प्रमुख उपस्थिती होती. किट वाटपानंतर सर्व विवाह विधी करण्यात आले. विवाह विधीनंतर सर्व वऱ्हाडिंनी सुग्रास भोजनाचा आस्वाद घेतला.सायंकाळी हजारो सोलापूरकरांच्या उपस्थितीत गोरज मुहूर्तावर अक्षता सोहळा झाला. यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले, सोलापूर महानगरपालिकेचे सभागृह नेते नरेंद्र काळे हे हाडाचे सामाजिक कार्यकर्ते आहेत.

सर्वांना सोबत घेऊन जाण्याच्या त्यांच्या स्वभावामुळे त्यांनी मोठा मित्र परिवार जोडला आहे. त्यांचे राजकीय भविष्य उज्वल आहे. वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च करण्यापेक्षा त्यांनी आयोजिलेला सामुदायिक विवाहाचा सोहळा कौतुकास्पद आहे. यावेळी सभागृह नेते नरेंद्र काळे यांच्या वाढदिवसानिमित्त पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

आमदार सचिन कल्याणशेट्टी म्हणाले, नरेंद्र काळे यांनी हा उपक्रम आयोजित करून सामाजिक बांधिलकी जपली आहे. हे काम पुण्याचे आहे, असेही आमदार श्री. कल्याणशेट्टी म्हणाले. आमदार देवेंद्र कोठे म्हणाले, सभागृह नेते नरेंद्र काळे यांनी वाढदिवसाचे औचित्य साधून कौतुकास्पद उपक्रम राबविला आहे.सोलापूर महानगरपालिकेचे सभागृह नेते नरेंद्र काळे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक तर मंगेश लामकाने यांनी सूत्रसंचालन केले.

Tags: गटनेतानरेंद्र काळेसभागृह नेतासोलापूर महापालिका
Previous Post

दहावीच्या निकालात सोलापूर जिल्ह्याची दमदार कामगिरी ; मुलींनी पुन्हा मारली बाजी

Next Post

घरात वडिलांचे पार्थिव, तरीही धनश्रीने लिहिला पेपर; जिद्दीसमोर दुःखही हरले

Related Posts

मान्सूनपूर्व तयारीला वेग; सर्व यंत्रणांनी सज्ज राहा ; अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांचे निर्देश
सोलापूर जिल्हा

मान्सूनपूर्व तयारीला वेग; सर्व यंत्रणांनी सज्ज राहा ; अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांचे निर्देश

May 19, 2026
जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग ; १८ जूनला मतदान, २५ जूनपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण
सोलापूर जिल्हा

जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग ; १८ जूनला मतदान, २५ जूनपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण

May 19, 2026
पर्यावरणपूरक संदेश देत महापौरसह उपमहापौर  ई-बाईकवरून महापालिकेत दाखल
सोलापूर जिल्हा

पर्यावरणपूरक संदेश देत महापौरसह उपमहापौर ई-बाईकवरून महापालिकेत दाखल

May 18, 2026
मंद्रूप येथील शेततळ्यात बुडून दोन शाळकरी मुलांचा दुर्दैवी मृत्यू
सोलापूर जिल्हा

मंद्रूप येथील शेततळ्यात बुडून दोन शाळकरी मुलांचा दुर्दैवी मृत्यू

May 18, 2026
राजू शेट्टी यांच्या शक्तीपीठ महामार्गाला माढ्यात तीव्र विरोध ; “एक इंचही जमीन देणार नाही”चा निर्धार
सोलापूर जिल्हा

राजू शेट्टी यांच्या शक्तीपीठ महामार्गाला माढ्यात तीव्र विरोध ; “एक इंचही जमीन देणार नाही”चा निर्धार

May 17, 2026
विजापूर रोड हद्दीत घरफोडी करणाऱ्या ‘मंत्री’ला ४८ तासांत केले गजाआड
क्राईम

विजापूर रोड हद्दीत घरफोडी करणाऱ्या ‘मंत्री’ला ४८ तासांत केले गजाआड

May 17, 2026
Next Post
घरात वडिलांचे पार्थिव, तरीही धनश्रीने लिहिला पेपर; जिद्दीसमोर दुःखही हरले

घरात वडिलांचे पार्थिव, तरीही धनश्रीने लिहिला पेपर; जिद्दीसमोर दुःखही हरले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मान्सूनपूर्व तयारीला वेग; सर्व यंत्रणांनी सज्ज राहा ; अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांचे निर्देश

मान्सूनपूर्व तयारीला वेग; सर्व यंत्रणांनी सज्ज राहा ; अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांचे निर्देश

May 19, 2026
जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग ; १८ जूनला मतदान, २५ जूनपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण

जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग ; १८ जूनला मतदान, २५ जूनपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण

May 19, 2026
पर्यावरणपूरक संदेश देत महापौरसह उपमहापौर  ई-बाईकवरून महापालिकेत दाखल

पर्यावरणपूरक संदेश देत महापौरसह उपमहापौर ई-बाईकवरून महापालिकेत दाखल

May 18, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025