Monday, September 7, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

सोलापूरच्या खेळाडूंसाठी उपमहापौर देवकरांचा ‘स्पोर्ट्स प्लॅन’

Solapur Mirror by Solapur Mirror
September 2, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
सोलापूरच्या खेळाडूंसाठी उपमहापौर देवकरांचा ‘स्पोर्ट्स प्लॅन’

सोलापूर, : सोलापुरात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धांचे आयोजन व्हावे आणि बाहेरून येणाऱ्या खेळाडूंना आवश्यक सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी शहरात सुसज्ज क्रीडा हॉस्टेलची गरज आहे. महापालिकेच्या माध्यमातून हे हॉस्टेल उभारण्यासाठी आवश्यक प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांनी दिली. राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त समृद्धी कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळांतर्गत समृद्धी स्पोर्ट्स क्लबच्या वतीने आयोजित क्रीडा सेवा पुरस्कार वितरण सोहळ्यात त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सुजय शिंदे होते.

यावेळी ५० राष्ट्रीय खेळाडूंना ट्रॅकसूटचे वाटप करण्यात आले. तसेच पुरुष व महिला खेळाडूंना प्रत्येकी ३ हजार १०० रुपये रोख, मानपत्र, सन्मानचिन्ह आणि शाल देऊन गौरविण्यात आले. रामजी कश्यप, श्रावणी सूर्यवंशी, श्रीकांत शेटे आणि राजीव देसाई यांना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ज्येष्ठ पत्रकार अजितकुमार संगवे, अमीर काझी, रेणुका बुधराम आणि पुंडलिक कलखांबकर यांचाही विशेष सत्कार करण्यात आला. समृद्धी स्पोर्ट्स क्लबचे संस्थापक संजय सावंत यांनी खेळाडू, प्रशिक्षक आणि क्रीडा संघटकांना प्रोत्साहन देण्यासाठी पुरस्कार सुरू केल्याचे सांगितले. पुरस्काराच्या रकमेत दरवर्षी एक हजार रुपयांची वाढ करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी राजीव देसाई यांनी क्लबला ५ हजार १ रुपयांची देणगी जाहीर केली.

कार्यक्रमास निखिल शेडगे, बाळासाहेब काळे, संजय चेळेकर, वीरभद्र यादवाड, विनोद भोसले, सात्विक बडवे, अमजद जेलर, चंद्रकांत होळकर, राजू प्याटी, अंबादास पांढरे, सुदेश मालप, ज्योतिबा गुंड, ॲड. बसवराज सलगर, अजितकुमार संगवे, सत्येन जाधव, गणेश पवार यांच्यासह पदाधिकारी, खेळाडू आणि क्रीडाप्रेमी उपस्थित होते.

८.९२ कोटींचा प्रस्ताव शासनदरबारी प्रलंबित
राजीव गांधी इनडोअर स्टेडियम येथे क्रीडा हॉस्टेल उभारण्यासाठी महापालिकेने ८ कोटी ९२ लाख रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे. हा प्रस्ताव सध्या प्रलंबित असल्याची माहिती महापालिकेचे क्रीडा अधिकारी नजीर शेख यांनी दिली. क्रीडा हॉस्टेलचा प्रश्न मार्गी लागल्यास शहरातील क्रीडा सुविधांना बळ मिळण्याबरोबरच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांच्या आयोजनासाठीही त्याचा फायदा होणार आहे.

Previous Post

आईच्याच घरावर मुलीचा ‘हात’; अडीच लाखांचा ऐवज लंपास

Next Post

विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात ‘क्रीडा’ विषयाचा समावेश व्हावा

Related Posts

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले
सोलापूर जिल्हा

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..
सोलापूर जिल्हा

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट
सोलापूर जिल्हा

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार
सोलापूर जिल्हा

बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार

September 2, 2026
शालार्थ घोटाळ्याचा ‘हिशेब’ आता डिसेंबरअखेर! ; उपसचिवांनी काढला आदेश
सोलापूर जिल्हा

शालार्थ घोटाळ्याचा ‘हिशेब’ आता डिसेंबरअखेर! ; उपसचिवांनी काढला आदेश

September 2, 2026
विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात ‘क्रीडा’ विषयाचा समावेश व्हावा
सोलापूर जिल्हा

विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात ‘क्रीडा’ विषयाचा समावेश व्हावा

September 2, 2026
Next Post
विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात ‘क्रीडा’ विषयाचा समावेश व्हावा

विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात ‘क्रीडा’ विषयाचा समावेश व्हावा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In