Friday, October 23, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

उद्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी ६५ हजार शिक्षक बजावणार मतदानाचा हक्क..!

Solapur Mirror by Solapur Mirror
October 22, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
उद्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी ६५ हजार शिक्षक बजावणार मतदानाचा हक्क..!
0
SHARES
17
VIEWS

सोलापूर ; पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी २३ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत मतदान पार पडणार आहे. या निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. सोलापूर शहरातील रामवाडी येथील शासकीय गोदामातून बुधवारी निवडणूक साहित्याचे वाटप करण्यात आले. जिल्हाधिकारी कुमार कार्तिकेयन यांनी निवडणूक प्रक्रिया चोख आणि यशस्वीपणे पार पाडण्याचे आदेश दिले असून, मतदान केंद्रांवर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

जिल्ह्यात एकूण १९३ मतदान केंद्रे असून या केंद्रांवर ६५ हजार २५ मतदार मतदानाचा हक्क बजावतील. प्रत्येक मतदान केंद्रावर केंद्राध्यक्ष, तीन मतदान अधिकारी, एक शिपाई आणि सूक्ष्म निरीक्षक असणार आहेत. मतदारांच्या सुविधेसाठी प्रशासनाने विशेष काळजी घेतली असून रांगांचे व्यवस्थापन, पिण्याचे पाणी, वीज, फर्निचर, स्त्री-पुरुषांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे, सावली, मदत कक्ष, स्वयंसेवक आणि प्रथमोपचार किट या सुविधा मतदान केंद्रांवर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तसेच प्रत्येक केंद्रावर वैद्यकीय कर्मचारीही उपस्थित राहतील.

मतदानादिवशी आठवडी बाजार बंद
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान केंद्रांच्या परिसरातील आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप, अक्कलकोट तालुक्यातील मैंदर्गी, करमाळा तालुक्यातील करमाळा, पंढरपूर तालुक्यातील चळे, तारापूर, तुगत, बाभूळगाव, शेळवे व पिराची कुरोली तसेच सांगोला तालुक्यातील जवळा, कोळा व नाझरा येथील शुक्रवारचा आठवडी बाजार बंद राहतील.

नाव शोधण्यासाठी केंद्राबाहेर मदत केंद्र
मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी स्वीप अंतर्गत विशेष जनजागृती करण्यात आली असून, मतदान कसे करावे याबाबतचे व्हिडिओ प्रसारित करण्यात आले आहेत. तसेच, मतदारांना त्यांचे नाव शोधण्यासाठी प्रत्येक मतदान केंद्राबाहेर मदत केंद्र उभारण्यात आले आहे. पुणे विभागातील सर्व पदवीधर आणि शिक्षक मतदारांनी २३ ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रावर जाऊन निर्भयपणे पसंतीक्रम नोंदवून आपला मतदानाचा हक्क बजवावा. एस. कार्तिकेयन, जिल्हाधिकारी

पुणे विभागात पदवीधरसाठी ४७, शिक्षकसाठी 30 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात
पुणे विभाग पदवीधर मतदारसंघासाठी ४७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत, तर शिक्षक मतदारसंघातून ३० उमेदवार नशीब आजमावत आहेत. सोलापूर जिल्ह्यात पदवीधर मतदारसंघासाठी जिल्ह्यात एकूण ११७ मतदान केंद्रे असून, ४९,७२२ मतदार आपला हक्क बजावणार आहेत. शिक्षक मतदारसंघासाठी जिल्ह्यात ७६ मतदान केंद्रे असून, १५,३०३ शिक्षक मतदार मतदानासाठी पात्र आहेत

Tags: जिल्हाधिकारीजिल्हाधिकारी कुमार कार्तिकेयनपदवीधर आणि शिक्षकपुणे विभागपोलीस बंदोबस्त
Previous Post

शालार्थच्या पडताळणीत १७ हजार कर्मचाऱ्यांचा ‘एरर’!

Next Post

अखेर पदवीधर शिक्षक-कर्मचाऱ्यांना मतदानासाठी उद्या विशेष रजा मंजूर!

Related Posts

१६०० बोगस शिक्षकांच्या नोंदणीचा आरोप; अमोल शिंदे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
सोलापूर जिल्हा

१६०० बोगस शिक्षकांच्या नोंदणीचा आरोप; अमोल शिंदे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

October 22, 2026
भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी ; २६ ऑक्टोबरपासून दक्षता सप्ताहाला सुरुवात ..
सोलापूर जिल्हा

भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी ; २६ ऑक्टोबरपासून दक्षता सप्ताहाला सुरुवात ..

October 22, 2026
राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात झोळ कुटुंबीयांवर संशयाची सुई? ज्ञानदेव शिंदेच्या अटकेने तपासाला वेग!
सोलापूर जिल्हा

राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात झोळ कुटुंबीयांवर संशयाची सुई? ज्ञानदेव शिंदेच्या अटकेने तपासाला वेग!

October 22, 2026
ब्रेकिंग : शिक्षण विभागात मोठे फेरबदल; दोन उपसंचालकांच्या बदल्या!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

१६०० बोगस शिक्षकांच्या नोंदणीचा आरोप; अमोल शिंदे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

१६०० बोगस शिक्षकांच्या नोंदणीचा आरोप; अमोल शिंदे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

October 22, 2026
भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी ; २६ ऑक्टोबरपासून दक्षता सप्ताहाला सुरुवात ..

भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी ; २६ ऑक्टोबरपासून दक्षता सप्ताहाला सुरुवात ..

October 22, 2026
राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात झोळ कुटुंबीयांवर संशयाची सुई? ज्ञानदेव शिंदेच्या अटकेने तपासाला वेग!

राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात झोळ कुटुंबीयांवर संशयाची सुई? ज्ञानदेव शिंदेच्या अटकेने तपासाला वेग!

October 22, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In