Friday, September 11, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

मिरवणूक मार्गावरील धोकादायक विद्युत तारा हटवा ; महापौर विनायक कोंड्याल

Solapur Mirror by Solapur Mirror
September 10, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
मिरवणूक मार्गावरील धोकादायक विद्युत तारा हटवा ; महापौर विनायक कोंड्याल
0
SHARES
0
VIEWS

महापौर विनायक कोंड्याल यांच्या सूचना; गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध भागांची पाहणी

सोलापूर, : आगामी गणेशोत्सवात गणेश मंडळांच्या मिरवणुकीदरम्यान विद्युत तारांमुळे कोणतीही दुर्घटना घडू नये, यासाठी मिरवणूक मार्गावरील धोकादायक व खाली आलेल्या विद्युत तारा, केबल्स तसेच अन्य अडथळे तातडीने दूर करा. मिरवणुकीचे सर्व मार्ग सुरक्षित करण्यासाठी महापालिका आणि महावितरणने समन्वयाने काम करावे, अशा स्पष्ट सूचना महापौर विनायक कोंड्याल यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. महापौर कोंड्याल यांनी गुरुवारी शहरातील चिप्पा मार्केट, कर्णिक नगर येथील उद्यान व चिल्ड्रन पार्क, एमआयडीसी परिसर तसेच सुनील नगर येथील विसर्जन कुंडाची पाहणी केली. यावेळी नागरिक, व्यापारी व परिसरातील रहिवाशांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. प्रलंबित नागरी सुविधांची कामे तातडीने मार्गी लावण्याचे निर्देशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.

चिप्पा मार्केट परिसराच्या पाहणीवेळी स्वच्छता आणि नागरी सुविधांचा आढावा घेण्यात आला. व्यापारी व नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांची माहिती घेत महापौरांनी संबंधित विभागांना तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना केल्या. त्यानंतर कर्णिक नगर येथील उद्यान व चिल्ड्रन पार्कची पाहणी करण्यात आली. उद्यानातील स्वच्छता, नियमित देखभाल, आवश्यक दुरुस्ती आणि लहान मुलांसाठी असलेल्या सुविधांची पाहणी करून नागरिकांच्या गरजेनुसार आणखी सुविधा उपलब्ध करण्याबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली.

दरम्यान, एमआयडीसी परिसरातील महावितरण कार्यालयाला भेट देऊन गणेशोत्सवाच्या अनुषंगाने विद्युत व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला. शहरातील गणेश मंडळांच्या मिरवणुका ज्या मार्गांवरून जाणार आहेत, तेथील विद्युत तारा आणि केबल्सची तपासणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या. खाली लोंबकळणाऱ्या किंवा मिरवणुकीतील उंच गणेशमूर्तींसाठी धोकादायक ठरू शकणाऱ्या तारा व अन्य अडथळ्यांवर उत्सवापूर्वीच उपाययोजना कराव्यात, असे महापौर कोंड्याल यांनी सांगितले. सुनील नगर येथील विसर्जन कुंडाचीही पाहणी करून तेथील आवश्यक सुविधांचा आढावा घेण्यात आला. गणेश विसर्जनावेळी भाविकांची गैरसोय होणार नाही, यासाठी स्वच्छता, सुरक्षितता आणि इतर आवश्यक व्यवस्था वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणांना देण्यात आल्या.

या पाहणी दौऱ्यावेळी महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे, सभापती विजय चिप्पा, नगरसेवक सिद्धेश्वर कमटम, शेखर इगे, सुनीता कामाठी, सत्यनारायण गुर्रम, राज महिंद्र कमटम, मेघनाथ येमूल, सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले, युवराज गाडेकर, अनिल चराटे, शंकर चौगुले, झोन अधिकारी विजय लोखंडे यांच्यासह महापालिका व संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

दुर्घटना टाळण्यासाठी आधीच खबरदारी
गणेशोत्सवातील मिरवणुकांमध्ये मोठ्या आकाराच्या गणेशमूर्ती आणि सजावटीच्या वाहनांचा सहभाग असतो. त्यामुळे मिरवणूक मार्गावरील विद्युत तारा, केबल्स व अन्य अडथळ्यांमुळे धोका निर्माण होऊ नये, यासाठी उत्सवापूर्वीच संपूर्ण मार्गाची पाहणी करून आवश्यक दुरुस्ती करण्यावर भर देण्यात आला आहे. महापालिका व महावितरणने परस्पर समन्वय ठेवून ही कामे वेळेत पूर्ण करावीत, अशा सूचना महापौरांनी दिल्या.

Tags: आमदार देवेंद्र कोठेनगरसेवकमहापौरविनायक कोंड्यालसोलापूरसोलापूर महापालिका
Previous Post

रेल्वे स्टेशन परिसरात गवंडी कामगाराच्या गळ्यावर वार

Next Post

गोकूळचा ‘१५ महिन्यांचा पगार-पीएफ हिशेब द्या!’ खासदार प्रणिती शिंदे आक्रमक

Related Posts

अध्यात्माचे महत्त्व’ उलगडणार अभिनेत्री स्मिता जयकर
सोलापूर जिल्हा

क्राईम

रेल्वे स्टेशन परिसरात गवंडी कामगाराच्या गळ्यावर वार

September 10, 2026
शिक्षण संचालकांच्या उपस्थितीत ‘चला, शाळेत जाऊया’ कार्यशाळा संपन्न…
सोलापूर जिल्हा

शिक्षण संचालकांच्या उपस्थितीत ‘चला, शाळेत जाऊया’ कार्यशाळा संपन्न…

September 9, 2026
‘ब्रेकिंग न्यूज’च्या धावपळीत आरोग्याला ब्रेक नको ; सहाय्यक पोलीस आयुक्त दिलीप पवार
सोलापूर जिल्हा

‘ब्रेकिंग न्यूज’च्या धावपळीत आरोग्याला ब्रेक नको ; सहाय्यक पोलीस आयुक्त दिलीप पवार

September 9, 2026
मटक्याच्या अड्ड्यावर पोलिसांची धडक; फॉर्च्युनरसह ३० लाखांचा मुद्देमाल जप्त
क्राईम

मटक्याच्या अड्ड्यावर पोलिसांची धडक; फॉर्च्युनरसह ३० लाखांचा मुद्देमाल जप्त

September 9, 2026
Next Post
गोकूळचा ‘१५ महिन्यांचा पगार-पीएफ हिशेब द्या!’ खासदार प्रणिती शिंदे आक्रमक

गोकूळचा ‘१५ महिन्यांचा पगार-पीएफ हिशेब द्या!’ खासदार प्रणिती शिंदे आक्रमक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अध्यात्माचे महत्त्व’ उलगडणार अभिनेत्री स्मिता जयकर

अध्यात्माचे महत्त्व’ उलगडणार अभिनेत्री स्मिता जयकर

September 10, 2026
गोकूळचा ‘१५ महिन्यांचा पगार-पीएफ हिशेब द्या!’ खासदार प्रणिती शिंदे आक्रमक

गोकूळचा ‘१५ महिन्यांचा पगार-पीएफ हिशेब द्या!’ खासदार प्रणिती शिंदे आक्रमक

September 10, 2026
मिरवणूक मार्गावरील धोकादायक विद्युत तारा हटवा ; महापौर विनायक कोंड्याल

मिरवणूक मार्गावरील धोकादायक विद्युत तारा हटवा ; महापौर विनायक कोंड्याल

September 10, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In