Monday, October 26, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

डीजेचा आवाज वाढला की थेट ‘डायल ११२’ कॉल करा

Solapur Mirror by Solapur Mirror
September 12, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
डीजेचा आवाज वाढला की थेट ‘डायल ११२’ कॉल करा
0
SHARES
10
VIEWS

गणेशोत्सवात ध्वनिप्रदूषणाविरोधात पोलिसांचा नवा फंडा; तक्रारदाराची ओळख गोपनीय, काही मिनिटांत मदतीची सुविधा

सोलापूर; . गणेशोत्सवाच्या उत्साहात डीजे आणि मोठ्या आवाजाच्या साउंड सिस्टीममुळे नागरिकांना त्रास होत असेल, तर आता थेट पोलिसांच्या ‘११२’ क्रमांकावर तक्रार करता येणार आहे. पोलिस आयुक्तांनी मोठ्या आवाजाच्या साउंडरवर निर्बंध घातले असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मंडळांच्या पदाधिकाऱ्यांसह डीजे चालक-मालकांवर कारवाई केली जाणार आहे. विशेष म्हणजे तक्रार केल्यानंतर अवघ्या काही मिनिटांत पोलिसांची मदत मिळू शकणार असल्याने नागरिकांसाठी ‘११२’ हा प्रभावी पर्याय ठरणार आहे.

शहरात गणेशोत्सवाची धामधूम सुरू झाली असून विविध मंडळांकडून धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. मात्र, काही ठिकाणी मोठ्या आवाजातील डीजे आणि साउंडरमुळे ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, विद्यार्थी तसेच रुग्णांना त्रास सहन करावा लागतो. अशा परिस्थितीत नागरिकांनी कारवाईची वाट न पाहता थेट ११२ वर संपर्क साधून तक्रार नोंदवावी, असे आवाहन करण्यात आले आहे. तक्रार प्राप्त झाल्यानंतर ती संबंधित पोलिस यंत्रणेकडे पाठविली जाते. त्यानंतर जवळील पोलिस कर्मचारी घटनास्थळी पोहोचून परिस्थितीची पाहणी करतात. नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधितांवर कारवाई केली जाऊ शकते. त्यामुळे उत्सव साजरा करताना ध्वनिप्रदूषणाच्या नियमांचे पालन करण्याची जबाबदारी मंडळांवर असणार आहे.

तक्रारदाराची माहिती राहणार गोपनीय
मोठ्या आवाजाबाबत तक्रार केल्यास आपले नाव समोर येईल किंवा संबंधितांकडून त्रास होईल, या भीतीने अनेक नागरिक तक्रार करण्यास पुढे येत नाहीत. मात्र, ११२ वर तक्रार करणाऱ्या नागरिकाची माहिती गोपनीय ठेवली जाते. त्यामुळे नागरिकांनी कोणतीही भीती न बाळगता मदतीसाठी संपर्क साधावा.

मोबाईलमध्ये बॅलन्स नसला तरी मदत
आपत्कालीन ११२ क्रमांकावर कॉल करण्यासाठी मोबाईलमध्ये बॅलन्स असणे आवश्यक नाही. शहरात भांडण, अपघात, आग, संशयास्पद हालचाल किंवा इतर आपत्कालीन प्रसंग उद्भवल्यासही या क्रमांकावर पोलिसांची मदत मागता येते.

‘फोटो काढायचा आहे, पोलिस ठाण्यात यावे लागेल?’
कुंभार वेस परिसरातील एका मिरवणुकीदरम्यान डीजेच्या आवाजाबाबत तक्रार केल्यानंतर पोलिस काही मिनिटांत घटनास्थळी पोहोचले. तक्रारदाराला ओपीसाठी पोलिस ठाण्यात येण्यास सांगितल्यावर त्याने नाराजी व्यक्त केल्याचा प्रकारही समोर आला. तातडीची मदत मिळाल्यानंतर तक्रारीच्या पुढील प्रक्रियेत नागरिकांनी पोलिसांना आवश्यक सहकार्य करणेही महत्त्वाचे आहे.

Previous Post

गणेशोत्सवामुळे मध्यवर्ती भागातील वाहतुकीत बदल

Next Post

चेनस्नॅचिंग घरफोडी ते गांजा तस्करी; गुन्हे शाखेने लावला पाच गुन्ह्यांचा छडा

Related Posts

सुरेश हसापुरेंसह २१९ जणांनी घेतला उमेदवारीचा अर्ज..
सोलापूर जिल्हा

सुरेश हसापुरेंसह २१९ जणांनी घेतला उमेदवारीचा अर्ज..

October 26, 2026
रामायणातून जीवनमूल्यांची शिकवण; पंचाक्षरी विद्यामंदिरात वाल्मिकी जयंती साजरी..!
सोलापूर जिल्हा

रामायणातून जीवनमूल्यांची शिकवण; पंचाक्षरी विद्यामंदिरात वाल्मिकी जयंती साजरी..!

October 26, 2026
४६ कोटींची ऊसबिले थकली; दोन कारखान्यांच्या गाळपावर टांगती तलवार!
सोलापूर जिल्हा

४६ कोटींची ऊसबिले थकली; दोन कारखान्यांच्या गाळपावर टांगती तलवार!

October 26, 2026
रेल्वे स्थानकावर पर्स लांबवली; पण पोलिसांनी अखेर गाठलेच!
क्राईम

रेल्वे स्थानकावर पर्स लांबवली; पण पोलिसांनी अखेर गाठलेच!

October 26, 2026
नक्षत्रे सरली, पावसाची आस उरली; बळीराजाचे डोळे स्वातीकडे!
सोलापूर जिल्हा

नक्षत्रे सरली, पावसाची आस उरली; बळीराजाचे डोळे स्वातीकडे!

October 26, 2026
दुष्काळाचे भान, शिक्षणाला मान; वाल्मिकी जयंतीतून कोळी समाजाचा नवा आदर्श!
सोलापूर जिल्हा

दुष्काळाचे भान, शिक्षणाला मान; वाल्मिकी जयंतीतून कोळी समाजाचा नवा आदर्श!

October 26, 2026
Next Post
चेनस्नॅचिंग घरफोडी ते गांजा तस्करी; गुन्हे शाखेने लावला पाच गुन्ह्यांचा छडा

चेनस्नॅचिंग घरफोडी ते गांजा तस्करी; गुन्हे शाखेने लावला पाच गुन्ह्यांचा छडा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सुरेश हसापुरेंसह २१९ जणांनी घेतला उमेदवारीचा अर्ज..

सुरेश हसापुरेंसह २१९ जणांनी घेतला उमेदवारीचा अर्ज..

October 26, 2026
रामायणातून जीवनमूल्यांची शिकवण; पंचाक्षरी विद्यामंदिरात वाल्मिकी जयंती साजरी..!

रामायणातून जीवनमूल्यांची शिकवण; पंचाक्षरी विद्यामंदिरात वाल्मिकी जयंती साजरी..!

October 26, 2026
४६ कोटींची ऊसबिले थकली; दोन कारखान्यांच्या गाळपावर टांगती तलवार!

४६ कोटींची ऊसबिले थकली; दोन कारखान्यांच्या गाळपावर टांगती तलवार!

October 26, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In