Tuesday, October 27, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

दरोडा प्रकरणात १० वर्षांची शिक्षा; तीन आरोपींना उच्च न्यायालयाचा अंतरिम जामीन

Solapur Mirror by Solapur Mirror
September 13, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
दरोडा प्रकरणात १० वर्षांची शिक्षा; तीन आरोपींना उच्च न्यायालयाचा अंतरिम जामीन
0
SHARES
38
VIEWS

सोलापूर : उत्तर अक्कलकोट पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या दरोड्याच्या गंभीर प्रकरणात १० वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाने मोठा दिलासा दिला आहे. फौजदारी अपीलच्या सुनावणीदरम्यान आरोपींना सशर्त अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला असून, संबंधित आरोपींच्या शिक्षेलाही स्थगिती देण्यात आली आहे.उत्तर अक्कलकोट पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ५१६/२०२१ अन्वये भारतीय दंड संहिता (IPC) कलम ३९५ व ३९७ अंतर्गत अनिल श्रीमंत पवार, रा. पानमंगरूळ, ता. उत्तर अक्कलकोट, जि. सोलापूर, सनिदेवल सुरेश काळे, रा. दत्तनगर, मोहोळ, ता. मोहोळ, जि. सोलापूर, शक्ती पवार व इतरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या प्रकरणात एकूण सात आरोपी असल्याचे न्यायालयीन सुनावणीदरम्यान नमूद करण्यात आले.या प्रकरणी सोलापूर येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीशांनी सत्र खटला क्रमांक २८१/२०२२ मध्ये २७ मार्च २०२५ रोजी निर्णय देताना संबंधित आरोपींना भारतीय दंड संहिता कलम ३९५ अंतर्गत दोषी ठरवून १० वर्षांच्या सक्त कारावासाची शिक्षा सुनावली होती.शिक्षेविरोधात संबंधित आरोपींनी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठात फौजदारी अपील दाखल केले. अंतरिम जामिनासाठी दाखल अर्जाच्या सुनावणीदरम्यान आरोपींच्या वतीने विद्वान वकील ॲड. प्रियाल जी. सारडा यांनी न्यायालयासमोर महत्त्वाचे युक्तिवाद मांडले.आरोपी २१ मार्च २०२२ पासून तुरुंगात असून, त्यांनी जवळपास चार वर्षे सहा महिन्यांचा कारावास भोगला असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले. तसेच याच गुन्ह्यात समान भूमिका असलेल्या आरोपी अनिल पवार आणि शक्ती पवार यांना यापूर्वीच मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाने अंतरिम अर्ज क्रमांक ३६२०/२०२५ आणि २०६५/२०२५ मध्ये अनुक्रमे ५ सप्टेंबर २०२५ व ७ ऑक्टोबर २०२५ रोजी आदेश देऊन जामीन मंजूर केला असून, त्यांची शिक्षाही स्थगित केली असल्याचे न्यायालयाला सांगण्यात आले.

या पूर्वीच्या आदेशांच्या छायाप्रतीही न्यायालयाच्या अभिलेखावर सादर करण्यात आल्या. समान परिस्थितीतील आरोपींना यापूर्वी दिलासा मिळालेला असल्याने संबंधित अर्जदारांनाही फौजदारी अपिलाचा अंतिम निकाल लागेपर्यंत जामिनावर मुक्त करण्यात यावे, अशी मागणी ॲड. प्रियाल जी. सारडा यांनी केली.दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाचे न्यायमूर्ती मा. अश्विन डी. भोबे यांनी ९ सप्टेंबर २०२६ रोजी आरोपी सनी देओल सुरेश काळे यांच्या अंतरिम जामीन अर्जास मंजुरी देत त्यांना सशर्त अंतरिम जामीन मंजूर केला. तसेच अपीलचा अंतिम निर्णय होईपर्यंत न्यायालयाने घालून दिलेल्या अटी व शर्तींचे पालन करण्याचे निर्देश देण्यात आले.या प्रकरणात आरोपींच्या वतीने ॲड. प्रियाल जी. सारडा आणि ॲड. बबिता एल. काळे यांनी काम पाहिले.

Previous Post

राजूबाई मॅटर्निटी होमच्या बीओटी प्रस्तावावर नगरसेवक किसान जाधव आक्रमक

Next Post

मध्यवर्ती महामंडळात गणरायाची प्रतिष्ठापना

Related Posts

गणपती घाटावरील अस्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर; नगरसेवक सात्विक बडवे सरसावले!
सोलापूर जिल्हा

गणपती घाटावरील अस्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर; नगरसेवक सात्विक बडवे सरसावले!

October 27, 2026
सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन..!
सोलापूर जिल्हा

सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन..!

October 27, 2026
सोलापूर जिल्ह्यातील पावणेदहा लाख बालकांना जंतमुक्तीचे कवच!
सोलापूर जिल्हा

सोलापूर जिल्ह्यातील पावणेदहा लाख बालकांना जंतमुक्तीचे कवच!

October 27, 2026
स्पर्धा परीक्षांच्या स्वप्नांना ‘बालाजी अमाईन्स’चे बळ!
सोलापूर जिल्हा

स्पर्धा परीक्षांच्या स्वप्नांना ‘बालाजी अमाईन्स’चे बळ!

October 27, 2026
जिल्हा बँकेच्या सत्तेसाठी राजकीय रणसंग्राम; गोरे विरुद्ध मोहिते-पाटील संघर्षाची चाहूल!
सोलापूर जिल्हा

जिल्हा बँकेच्या सत्तेसाठी राजकीय रणसंग्राम; गोरे विरुद्ध मोहिते-पाटील संघर्षाची चाहूल!

October 27, 2026
कचरा संकलनाच्या कंत्राटातील ‘गोलमाल’ ; पाच सदस्यीय चौकशी समिती गठीत!
सोलापूर जिल्हा

कचरा संकलनाच्या कंत्राटातील ‘गोलमाल’ ; पाच सदस्यीय चौकशी समिती गठीत!

October 26, 2026
Next Post
मध्यवर्ती महामंडळात गणरायाची प्रतिष्ठापना

मध्यवर्ती महामंडळात गणरायाची प्रतिष्ठापना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गणपती घाटावरील अस्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर; नगरसेवक सात्विक बडवे सरसावले!

गणपती घाटावरील अस्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर; नगरसेवक सात्विक बडवे सरसावले!

October 27, 2026
सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन..!

सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन..!

October 27, 2026
सोलापूर जिल्ह्यातील पावणेदहा लाख बालकांना जंतमुक्तीचे कवच!

सोलापूर जिल्ह्यातील पावणेदहा लाख बालकांना जंतमुक्तीचे कवच!

October 27, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In