No Result
View All Result
सोलापूर : सार्वजनिक मध्यवर्ती श्रीगणेशोत्सव महामंडळाच्या कार्यालयात ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराज स्थापित अतिथी गणपती तसेच महामंडळाच्या गणेश प्रतिमेची विधिवत प्रतिष्ठापना व पूजा करण्यात आली. ट्रस्टी अध्यक्ष श्रीशैल बनशेट्टी व उत्सव अध्यक्ष प्रभाकर (भाऊ) रोडगे यांच्या हस्ते हा धार्मिक सोहळा पार पडला.
यावेळी ट्रस्टी अध्यक्ष श्रीशैल बनशेट्टी यांनी सोलापूर शहरातील सर्व गणेशोत्सव मंडळांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. गणेशोत्सवाची परंपरा आणि संस्कृती जपत पारंपरिक वाद्यांच्या गजरात, मोठ्या उत्साहात तसेच पर्यावरणपूरक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच ज्या गणेश मंडळांनी अद्याप उत्सवाचे परवाने घेतलेले नाहीत, त्यांनी मध्यवर्ती श्रीगणेशोत्सव महामंडळाच्या कार्यालयातून तातडीने परवाने घेऊन जावेत, असेही त्यांनी सांगितले. उत्सव अध्यक्ष प्रभाकर (भाऊ) रोडगे यांनीही गणेशोत्सव मंडळांना शुभेच्छा देत दुष्काळाच्या संकटाने होरपळणाऱ्या बळीराजासाठी गणरायाच्या चरणी पावसाचे साकडे घातले. शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनात सुख-समृद्धी नांदावी, अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली.
या प्रसंगी ट्रस्टी अध्यक्ष श्रीशैल बनशेट्टी, उत्सव अध्यक्ष प्रभाकर (भाऊ) रोडगे, माजी ट्रस्टी अध्यक्ष बसवराज येरटे, विजय पुकाळे, गणेश चिंचोळी, सुनील शरणार्थी, गौरव जक्कापुरे, दिलीप पाटील, गिरीश शहाणे, लक्ष्मीकांत मिरजकर, धनराज मैंदर्गी, शिवानंद येरटे यांच्यासह महामंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व गणेशभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No Result
View All Result