सोलापूर : अखंड हिंदुस्थानातील पहिले सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ म्हणून देशभर ओळख असलेल्या श्रद्धानंद समाज सार्वजनिक मानाचा आजोबा गणपती गणेशोत्सवाला आज मोठ्या भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला. सकाळी ९ वाजून ४५ मिनिटांनी मानाचा आजोबा गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली.
गणेशोत्सवाच्या प्रारंभी सकाळी ८ वाजल्यापासून विविध धार्मिक विधींना सुरुवात झाली. गणपतीच्या मूर्तीवर महारुद्राभिषेक, १०८ दुर्वानामावली, अथर्वशीर्ष पठण तसेच होम करण्यात आला. त्यानंतर प्रतिमात्मक गणपती म्हणून सुपारीची स्थापना ट्रस्टी अध्यक्ष आमदार विजयकुमार देशमुख व उपाध्यक्ष मेंडके यांच्या शुभहस्ते सकाळी ९.४५ वाजता मंगलमय वातावरणात करण्यात आली. प्रतिष्ठापनेनंतर श्रींची महाआरती करण्यात आली. यावेळी उपस्थित गणेशभक्तांना प्रसादाचे वाटप करण्यात आले.\
यावेळी ट्रस्टी अध्यक्ष आमदार विजयकुमार देशमुख यांनी आजोबा गणपतीच्या चरणी बळीराजासाठी मनोभावे प्रार्थना केली. सध्या महाराष्ट्राच्या विविध भागांत पावसाचे प्रमाण कमी असल्याने शेती व्यवसाय आणि शेतकरी बांधव संकटात आहेत. बळीराजा हा आपल्या जगाचा पोशिंदा असून त्याची सुख-समृद्धी व प्रगती हीच समाजाची खरी प्रगती आहे. विघ्नहर्त्या गणरायाने शेतकरी बांधवांना उत्तम आरोग्य, अफाट शक्ती द्यावी, भरपूर पाऊस पडावा, शेतात भरघोस पीक यावे आणि त्यांच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर व्हावीत, अशी प्रार्थना त्यांनी केली. तसेच सर्व गणेशभक्तांना गणेशोत्सव व गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा दिल्या. या धार्मिक सोहळ्यास सचिव अनिल सावंत, खजिनदार केदार वनारोटे, सहसचिव गंगाधर गवसने यांच्यासह ट्रस्टचे कार्यकारिणी सदस्य आणि गणेशभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुजा व महाआरतीचे पौरोहित्य वेदमूर्ती रतिकांत स्वामी यांनी केले.
Everything runs so smoothly on this platform. I love the variety of games and how quickly my winnings hit my account. It feels like a trusted spot where you can just relax and have fun. Give it a spin and see the magic for yourself. meexbetonline
Everything runs so smoothly on this platform. I love the variety of games and how quickly my winnings hit my account. It feels like a trusted spot where you can just relax and have fun. Give it a spin and see the magic for yourself. meexbetonline