No Result
View All Result
सोलापूर : पद्मशाली शिक्षण संस्था, सोलापूर संचालित कुचन प्रशाला, कनिष्ठ महाविद्यालय व व्यवसाय शिक्षण येथे श्री गणेशाची प्रतिष्ठापना भक्तिमय वातावरणात करण्यात आली. राजकुमार कडदास व त्यांच्या सुविद्य पत्नी ज्योती कडदास यांच्या हस्ते श्रींची महाआरती करण्यात आली. त्यानंतर कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थिनींच्या उत्स्फूर्त सहभागाने गणरायाची भव्य मिरवणूक काढण्यात आली.
जोशपूर्ण आणि उत्साहाच्या वातावरणात निघालेल्या या मिरवणुकीने जोड बसवन्ना चौक, आंध्र भद्रावती चौक मार्गे कुचन प्रशाला परिसर गाठला. विद्यार्थिनींच्या लेझीम पथकाने आकर्षक व उत्कृष्ट सादरीकरण करत उपस्थित गणेशभक्तांचे लक्ष वेधून घेतले. ढोल-ताशांचा गजर आणि लेझीमच्या तालामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाला. विशेष म्हणजे संस्थेचे सचिव दशरथजी गोप साहेब यांनी स्वतः लेझीम खेळून विद्यार्थिनींचा उत्साह वाढविला. त्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे मिरवणुकीतील जल्लोषाला आणखी रंगत आली.
या प्रसंगी कुचन प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य युवराज मेटे, उपप्राचार्य अनिल निंबाळकर, उपमुख्याध्यापक मधुकर धर्मसाळे, पर्यवेक्षक दत्तात्रय मेरगू, मल्लिकार्जुन जोकरे, प्रणिता सामल तसेच प्रशाला व महाविद्यालयातील सर्व शिक्षक-शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कुचन प्रशालेतील माजी विद्यार्थी महेश मादास, मधुकर द्यावरकोंडा, आकाश फुके, किरण मुनगापाटील, लोकेश गुलापल्ली व अक्षय नंदाल यांनी प्रशालेस श्री गणेशाची मूर्ती भेट दिली. त्यांच्या या योगदानाबद्दल उपस्थितांनी कौतुक केले.
No Result
View All Result