Monday, October 26, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

सोलापूरच्या नेटबॉलपटूंना विद्यापीठाचे व्यासपीठ द्या; कुलगुरूंना निवेदन

Solapur Mirror by Solapur Mirror
September 17, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
सोलापूरच्या नेटबॉलपटूंना विद्यापीठाचे व्यासपीठ द्या; कुलगुरूंना निवेदन
0
SHARES
6
VIEWS

सोलापूर, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठाच्या आंतर महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धेत ‘नेटबॉल’ या लोकप्रिय खेळाचा समावेश करण्यात यावा, अशी मागणी सोलापूर जिल्हा नेटबॉल संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. कर्नल प्रकाश महानवर यांना बुधवारी सोलापूर जिल्हा नेटबॉल संघटनेचे अध्यक्ष प्राचार्य प्रशांत लोंढे यांनी निवेदन दिले.

​यावेळी विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ. अतुल लकडे, विद्यापीठाच्या व्यवस्थापन समितीचे सदस्य तथा जिल्हा नेटबॉल संघटनेचे वरिष्ठ उपाध्यक्ष प्रा. सचिन गायकवाड, सिनेट मेंबर अजितकुमार सांगवे, सोलापूर जिल्हा नेटबॉल संघटनेचे चेअरमन एम. शफी, सचिव कुद्दूस शेख, उपाध्यक्ष विठ्ठल कुंभार, सहसचिव जुबेर शेख, खजिनदार तलहा शेख तसेच अब्दुल्ला चौधरी, मोईन सय्यद आदी उपस्थित होते.​निवेदनात नमूद केल्यानुसार, महाराष्ट्रातील पुणे, औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर), कोल्हापूर, नाशिक, नांदेड, नागपूर आणि गोंदिया यांसारख्या विद्यापीठांच्या क्रीडा स्पर्धांमध्ये ‘नेटबॉल’ खेळाचा आधीच समावेश आहे. सोलापूर जिल्ह्यात सन २००७ पासून या खेळाची सुरुवात झाली आहे. आजघडीला सोलापूर शहरासह मंगळवेढा, सांगोला, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, माळशिरस, अक्कलकोट आणि मोहोळ या तालुक्यांमध्येही नेटबॉल खेळाची मैदाने व सक्षम संघ उपलब्ध आहेत.

​राष्ट्रीय व राज्यस्तरावर उल्लेखनीय यश
​शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये हा खेळ २०१२ पासून अनुदानित खेळ म्हणून समाविष्ट करण्यात आला आहे. सोलापूर जिल्ह्यातील खेळाडूंनी राष्ट्रीय आणि राज्य पातळीवर विविध वयोगटांत (१४, १७, १९ वर्षे) चमकदार कामगिरी केली असून, अनेकदा राज्यस्तरावर संघ उपविजेता ठरला आहे. खेळाडूंच्या या उज्ज्वल भविष्यासाठी विद्यापीठ स्तरावरही या खेळाला हक्क मिळणे गरजेचे असल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे.


​
गुणवान खेळाडूंना हक्काचे व्यासपीठ मिळणार
​सध्या विद्यापीठात नेटबॉलचा समावेश नसल्यामुळे येथील प्रतिभावान खेळाडूंना इतर विद्यापीठांकडे वळावे लागते. विद्यापीठातच हा खेळ सुरू झाल्यास स्थानिक खेळाडूंना उत्तम संधी मिळेल आणि त्यांचा ओघ बाहेर जाण्याऐवजी विद्यापीठाच्या संघास बळकटी येईल. तसेच थेट ‘ऑल इंडिया विद्यापीठ नेटबॉल स्पर्धेत’ सोलापूरच्या खेळाडूंना आपले कौशल्य दाखवण्याची सुवर्णसंधी प्राप्त होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. त्यानुसार सन २०२७-२८ या शैक्षणिक वर्षापासून विद्यापीठात या खेळाचा समावेश करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. जिल्हा संघटनेतर्फे विद्यापीठाला संपूर्ण तांत्रिक सहकार्य करण्याचे आश्वासनही यावेळी देण्यात आले.

Tags: सोलापूर विद्यापीठ
Previous Post

काळ्या फिती, वाढता संताप; न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा शासनाला इशारा

Next Post

दत्त चौकात सराफाला लुटले; १२ तासांत दोघे जेरबंद!

Related Posts

‘उमेद’मध्ये लाखोंचा झोल? बनावट धनादेशांच्या आरोपांनी खळबळ!
सोलापूर जिल्हा

‘उमेद’मध्ये लाखोंचा झोल? बनावट धनादेशांच्या आरोपांनी खळबळ!

October 26, 2026
सुरेश हसापुरेंसह २१९ जणांनी घेतला उमेदवारीचा अर्ज..
सोलापूर जिल्हा

सुरेश हसापुरेंसह २१९ जणांनी घेतला उमेदवारीचा अर्ज..

October 26, 2026
रामायणातून जीवनमूल्यांची शिकवण; पंचाक्षरी विद्यामंदिरात वाल्मिकी जयंती साजरी..!
सोलापूर जिल्हा

रामायणातून जीवनमूल्यांची शिकवण; पंचाक्षरी विद्यामंदिरात वाल्मिकी जयंती साजरी..!

October 26, 2026
४६ कोटींची ऊसबिले थकली; दोन कारखान्यांच्या गाळपावर टांगती तलवार!
सोलापूर जिल्हा

४६ कोटींची ऊसबिले थकली; दोन कारखान्यांच्या गाळपावर टांगती तलवार!

October 26, 2026
रेल्वे स्थानकावर पर्स लांबवली; पण पोलिसांनी अखेर गाठलेच!
क्राईम

रेल्वे स्थानकावर पर्स लांबवली; पण पोलिसांनी अखेर गाठलेच!

October 26, 2026
नक्षत्रे सरली, पावसाची आस उरली; बळीराजाचे डोळे स्वातीकडे!
सोलापूर जिल्हा

नक्षत्रे सरली, पावसाची आस उरली; बळीराजाचे डोळे स्वातीकडे!

October 26, 2026
Next Post
दत्त चौकात सराफाला लुटले; १२ तासांत दोघे जेरबंद!

दत्त चौकात सराफाला लुटले; १२ तासांत दोघे जेरबंद!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘उमेद’मध्ये लाखोंचा झोल? बनावट धनादेशांच्या आरोपांनी खळबळ!

‘उमेद’मध्ये लाखोंचा झोल? बनावट धनादेशांच्या आरोपांनी खळबळ!

October 26, 2026
सुरेश हसापुरेंसह २१९ जणांनी घेतला उमेदवारीचा अर्ज..

सुरेश हसापुरेंसह २१९ जणांनी घेतला उमेदवारीचा अर्ज..

October 26, 2026
रामायणातून जीवनमूल्यांची शिकवण; पंचाक्षरी विद्यामंदिरात वाल्मिकी जयंती साजरी..!

रामायणातून जीवनमूल्यांची शिकवण; पंचाक्षरी विद्यामंदिरात वाल्मिकी जयंती साजरी..!

October 26, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In