Sunday, October 25, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

विश्वासू नोकरानेच केला विनयभंग; न्यायालयाकडून तीन वर्षांचा कारावास

Solapur Mirror by Solapur Mirror
September 21, 2026
in क्राईम, सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
विश्वासू नोकरानेच केला विनयभंग; न्यायालयाकडून तीन वर्षांचा कारावास
0
SHARES
39
VIEWS

प्रतिष्ठित कुटुंबातील सुनेचा दोनदा विनयभंग; शारीरिक सुखाची मागणी केल्याचे प्रकरण

सोलापूर : घरातील विश्वासू नोकरानेच प्रतिष्ठित कुटुंबातील सुनेचा दोन वेळा विनयभंग करून तिच्याकडे शारीरिक सुखाची मागणी केल्याप्रकरणी सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपीला तीन वर्षे सश्रम कारावास आणि एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास आणखी एक महिना कारावास भोगावा लागणार आहे. राजू हणमंतु भंडारे असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. जिल्हा व सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश श्रीमती रेड्डी यांनी हा निकाल दिला. ही घटना २६ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी साडेएकच्या सुमारास घडली होती. याप्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, ती घरातील कामे आटोपून स्वयंपाकघरात जेवण करत असताना आरोपी गेट बंद करण्याच्या बहाण्याने स्वयंपाकघरात आला. त्यावेळी त्याने महिलेचा विनयभंग केला.

या प्रकाराबाबत महिलेने जाब विचारल्यानंतर आरोपीने चुकून हात लागल्याचे सांगून सारवासारव केली. मात्र, काही वेळाने आरोपी पुन्हा स्वयंपाकघराच्या मागील गेटला कुलूप लावण्याच्या बहाण्याने तेथे आला. त्याने पीडित महिलेशी अश्लील व लज्जास्पद भाषेत बोलत तिच्याजवळ येऊन शारीरिक सुखाची मागणी केली आणि पुन्हा तिचा विनयभंग केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले होते.या प्रकारानंतर पीडित महिलेने वैद्यकीय उपचार घेत सदरबझार पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ७४, ७५(२) व ७९ अन्वये गुन्हा दाखल केला. तपास पूर्ण झाल्यानंतर पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

न्यायालयीन सुनावणीदरम्यान सरकार पक्षातर्फे सहा साक्षीदार तपासण्यात आले. पीडित महिला, तिची सासू तसेच शेजारी व्यक्तींनी घटनेला सुसंगत अशी साक्ष न्यायालयात दिली. आरोपी हा पीडित महिलेच्या घरातील विश्वासू नोकर असतानाही त्याने कुटुंबीयांच्या विश्वासाचा गैरफायदा घेतल्याचा युक्तिवाद सरकार पक्षातर्फे करण्यात आला.

सरकार पक्षाचा युक्तिवाद तसेच साक्षीदारांचे जबाब आणि उपलब्ध पुरावे ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपी राजू हणमंतु भंडारे याला दोषी ठरवत तीन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. यासोबत एक हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास एक महिना अतिरिक्त कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील ॲड. डॉ. प्रदीपसिंग राजपूत यांनी काम पाहिले, तर आरोपीतर्फे ॲड. महेश सोलनकर यांनी बाजू मांडली

Tags: ॲड. डॉ. प्रदीपसिंग राजपूतॲड. महेश सोलनकरआरोपी राजू हणमंतु भंडारेजिल्हा सरकारी वकील
Previous Post

पिस्तूल-काडतुसे, तलवारी अन् खंजीर; गुन्हे शाखेचा सर्जिकल स्ट्राईक!

Next Post

पदवीधर-शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचे बिगुल; २३ ऑक्टोबरला मतदान!

Related Posts

१६०० बोगस शिक्षकांच्या नोंदणीचा आरोप; अमोल शिंदे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
सोलापूर जिल्हा

१६०० बोगस शिक्षकांच्या नोंदणीचा आरोप; अमोल शिंदे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

October 22, 2026
भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी ; २६ ऑक्टोबरपासून दक्षता सप्ताहाला सुरुवात ..
सोलापूर जिल्हा

भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी ; २६ ऑक्टोबरपासून दक्षता सप्ताहाला सुरुवात ..

October 22, 2026
राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात झोळ कुटुंबीयांवर संशयाची सुई? ज्ञानदेव शिंदेच्या अटकेने तपासाला वेग!
सोलापूर जिल्हा

राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात झोळ कुटुंबीयांवर संशयाची सुई? ज्ञानदेव शिंदेच्या अटकेने तपासाला वेग!

October 22, 2026
ब्रेकिंग : शिक्षण विभागात मोठे फेरबदल; दोन उपसंचालकांच्या बदल्या!
सोलापूर जिल्हा

ब्रेकिंग : शिक्षण विभागात मोठे फेरबदल; दोन उपसंचालकांच्या बदल्या!

October 22, 2026
अखेर पदवीधर शिक्षक-कर्मचाऱ्यांना मतदानासाठी उद्या विशेष रजा मंजूर!
सोलापूर जिल्हा

अखेर पदवीधर शिक्षक-कर्मचाऱ्यांना मतदानासाठी उद्या विशेष रजा मंजूर!

October 22, 2026
उद्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी ६५ हजार शिक्षक बजावणार मतदानाचा हक्क..!
सोलापूर जिल्हा

उद्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी ६५ हजार शिक्षक बजावणार मतदानाचा हक्क..!

October 22, 2026
Next Post
पदवीधर-शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचे बिगुल; २३ ऑक्टोबरला मतदान!

पदवीधर-शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचे बिगुल; २३ ऑक्टोबरला मतदान!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

१६०० बोगस शिक्षकांच्या नोंदणीचा आरोप; अमोल शिंदे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

१६०० बोगस शिक्षकांच्या नोंदणीचा आरोप; अमोल शिंदे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

October 22, 2026
भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी ; २६ ऑक्टोबरपासून दक्षता सप्ताहाला सुरुवात ..

भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी ; २६ ऑक्टोबरपासून दक्षता सप्ताहाला सुरुवात ..

October 22, 2026
राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात झोळ कुटुंबीयांवर संशयाची सुई? ज्ञानदेव शिंदेच्या अटकेने तपासाला वेग!

राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात झोळ कुटुंबीयांवर संशयाची सुई? ज्ञानदेव शिंदेच्या अटकेने तपासाला वेग!

October 22, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In