Monday, October 26, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

किल्ला पाहिला नव्हे, इतिहास अनुभवला ; पर्यटन दिनी सोलापूरकर ‘इतिहासात’ रमले

Solapur Mirror by Solapur Mirror
September 27, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
किल्ला पाहिला नव्हे, इतिहास अनुभवला ; पर्यटन दिनी सोलापूरकर ‘इतिहासात’ रमले
0
SHARES
23
VIEWS

सोलापूर : सोलापुरात अनेक वर्ष राहून सुद्धा आम्ही कधीच भुईकोट किल्ला पाहिला नव्हता! आज आम्ही फक्त किल्ला पाहिला नाही तर तो जाणूनही घेतला.. अशा बोलक्या प्रतिक्रिया पर्यटनप्रेमी सोलापूरकरांनी व्यक्त केल्या. जागतिक पर्यटन दिनाच्या निमित्ताने पर्यटनप्रेमी सोलापूरकरांनी रविवारी सोलापूरच्या भुईकोट किल्ल्यात भटकंती करून इतिहास जाणून घेतला.

निसर्ग पर्यटनासाठी प्रयत्नशील असलेल्या इको फ्रेंडली क्लबने भारतीय पुरातत्त्व विभागाच्या सहकार्याने भुईकोट किल्ला भटकंतीचा उपक्रम आयोजित केला होता. भुईकोट किल्ला भटकंतीला पर्यटनप्रेमी सोलापूरकरांनी प्रतिसाद दिला. इतिहास अभ्यासक, लेखक नितीन अणवेकर यांनी भुईकोट किल्ल्याच्या संदर्भात अभ्यासपूर्ण माहिती सांगितली. या उपक्रमात अनेकजण आपल्या लहान मुलांसह सहभागी झाले होते.दिंडी दरवाजा, हत्ती दरवाजा, शहर दरवाजा, बुरुज, 32 खांबी वास्तु, मुंजा बाबा मंदिर, कपिलसिद्ध मल्लिकार्जुन मंदिर, नागबावडी विहीर, पद्मावती देवी मंदिर, खंदक, तोफा, विरगळ यासह विविध शिल्पांची माहिती इतिहास अभ्यासक नितीन अणवेकर यांनी दिली.

अनेक दिवसांची इच्छा आज पूर्ण झाली.. सोलापूरचा भुईकोट किल्ला जवळून अनुभवता आला.. पद्मावती देवी यांच्याविषयी माहिती मिळाली, इतिहास अभ्यासक नितीन अणवेकर यांनी भुईकोट किल्ल्याची छान माहिती दिली अशा प्रतिक्रिया उपस्थित पर्यटनप्रेमी सोलापूरकरांनी व्यक्त केल्या.‘आपल्या शहराचा आणि भुईकोट किल्ल्याचा इतिहास खूपच रंजक आहे. सोलापुरात येणाऱ्या मित्र आणि नातेवाईकांना भुईकोट किल्ला प्रत्येकाने दाखवायला हवा, असे आवाहन इतिहास अभ्यासक नितीन अणवेकर यांनी केले.

प्रारंभी इको फ्रेंडली क्लबचे संस्थापक, वसुंधरा मित्र परशुराम कोकणे यांनी सर्वांचे स्वागत केले. महिन्यातून, आठवड्यातून थोडासा वेळ काढून प्रत्येकाने आपल्या शहरातील, जिल्ह्यातील वारसास्थळे, निसर्ग पर्यटन स्थळ पाहायला हवीत. सर्वांनी सोलापूरच्या पर्यटन विकासासाठी पुढे यावे असे आवाहन श्री. कोकणे यांनी केले.ही भटकंती यशस्वी करण्यासाठी भारतीय पुरातत्व विभागाचे अधिकारी आदेश मेहर, महादेव कांबळे यांचे सहकार्य लाभले. माजी नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर यांनी भटकंतीमध्ये सहभागी होऊन सर्वांना पर्यटन दिनाच्या शुभेच्छा दिल्या आणि उपक्रमाचे स्वागत केले.

याप्रसंगी इको फ्रेंडली क्लबचे समन्वयक अजित कोकणे, अर्चना जमादार, पद्मकांत घंटे, पुष्पा घंटे, गंगुबाई कोकणे, सुरेश नारायणकर, अश्विनी नारायणकर, प्रतिज्ञा भोसले, वेंकटेश कुलकर्णी, गणेश बेनगिरी, सरस्वती कोकणे, सुष्मिता कटकधोंड, समर्थ होळकर, प्रज्वल होळकर, अथर्व स्वामी, संतोष कटारे, अजय परांडेकर, त्यागराज होनमोडे, दुर्गकांत वायचळ निवेदिता नाविंदगीकर, कविता बेदरकर, सिद्धार्थ तळभंडारे, महेश , अश्विनी बेळे, शिवकुमार राऊतराव, योगेश चितापुरे, महेश कौडकी, आनंद शिवगुडे, केतकी जोशी, सोमनाथ गुंजोटे, संतोष गवंडी, बसवराज परांडकर, अस्लम तांबोळी, दिगंबर कोनापुरे, हरिदास पेंटा यांच्यासह शेकडो सोलापूरकर तसेच राज मेमोरियल स्कूलचे विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते.

Tags: इतिहासपर्यटन दिनभुईकोट किल्ला
Previous Post

मार्कंडेयच्या सभेत मानधनावरून ‘ऑपरेशन’ ;बोल्लींकडे पुन्हा पाच वर्षांची धुरा

Next Post

दसरा-दिवाळीसाठी सोलापूरमार्गे धावणार सणासुदीच्या विशेष गाड्या

Related Posts

रामायणातून जीवनमूल्यांची शिकवण; पंचाक्षरी विद्यामंदिरात वाल्मिकी जयंती साजरी..!
सोलापूर जिल्हा

रामायणातून जीवनमूल्यांची शिकवण; पंचाक्षरी विद्यामंदिरात वाल्मिकी जयंती साजरी..!

October 26, 2026
४६ कोटींची ऊसबिले थकली; दोन कारखान्यांच्या गाळपावर टांगती तलवार!
सोलापूर जिल्हा

४६ कोटींची ऊसबिले थकली; दोन कारखान्यांच्या गाळपावर टांगती तलवार!

October 26, 2026
रेल्वे स्थानकावर पर्स लांबवली; पण पोलिसांनी अखेर गाठलेच!
क्राईम

रेल्वे स्थानकावर पर्स लांबवली; पण पोलिसांनी अखेर गाठलेच!

October 26, 2026
नक्षत्रे सरली, पावसाची आस उरली; बळीराजाचे डोळे स्वातीकडे!
सोलापूर जिल्हा

नक्षत्रे सरली, पावसाची आस उरली; बळीराजाचे डोळे स्वातीकडे!

October 26, 2026
दुष्काळाचे भान, शिक्षणाला मान; वाल्मिकी जयंतीतून कोळी समाजाचा नवा आदर्श!
सोलापूर जिल्हा

दुष्काळाचे भान, शिक्षणाला मान; वाल्मिकी जयंतीतून कोळी समाजाचा नवा आदर्श!

October 26, 2026
१६०० बोगस शिक्षकांच्या नोंदणीचा आरोप; अमोल शिंदे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
सोलापूर जिल्हा

१६०० बोगस शिक्षकांच्या नोंदणीचा आरोप; अमोल शिंदे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

October 22, 2026
Next Post
दसरा-दिवाळीसाठी सोलापूरमार्गे धावणार सणासुदीच्या विशेष गाड्या

दसरा-दिवाळीसाठी सोलापूरमार्गे धावणार सणासुदीच्या विशेष गाड्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रामायणातून जीवनमूल्यांची शिकवण; पंचाक्षरी विद्यामंदिरात वाल्मिकी जयंती साजरी..!

रामायणातून जीवनमूल्यांची शिकवण; पंचाक्षरी विद्यामंदिरात वाल्मिकी जयंती साजरी..!

October 26, 2026
४६ कोटींची ऊसबिले थकली; दोन कारखान्यांच्या गाळपावर टांगती तलवार!

४६ कोटींची ऊसबिले थकली; दोन कारखान्यांच्या गाळपावर टांगती तलवार!

October 26, 2026
रेल्वे स्थानकावर पर्स लांबवली; पण पोलिसांनी अखेर गाठलेच!

रेल्वे स्थानकावर पर्स लांबवली; पण पोलिसांनी अखेर गाठलेच!

October 26, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In