तुळजापूर ; महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या तुळजापूर येथील मंदिरात रविवारी दुपारी बारा वाजता घटस्थापना करण्यात आली. राज्य शासनाच्या आदेशानुसार गुरुवारपासून महाराष्ट्रातील मंदिरे भाविकांसाठी उघडण्यात आली असून त्यामुळे भाविकांमध्ये अभूतपूर्व उत्साह आहे. गुरुवारपासून शारदीय नवरात्रौत्सवास मोठ्या उत्साहात सुरुवात झाली असून तुळजाई नगरीत भाविकांची गर्दी वाढली आहे.

आई राजा उदो उदोच्या गजरात कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेच्या मंदिरात जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थानचे अध्यक्ष कीर्ती किरण पुजार यांच्या हस्ते रविवार घटस्थापना झाली. तत्पूर्वी संबळाच्या आणि हलगीच्या निनादात घट कलशाची मिरवणूक काढण्यात आली . ब्रह्मावृंदाना वर्णी देण्यात आली.यावेळी पुजारी, मानकरी, मंदिर संस्थानचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. शासनाने भाविकांसाठी मंदिर उघडण्याची घोषणा केल्यानंतर मंदिर प्रशासनाने गेल्या आठ दिवसांपासून तुळजापुरात तयारी सुरू केली होती.


सायंकाळपासून दर्शन सुरु होणार
मंचकी निद्रा संपवून कुलस्वामानी आई तुळजाभवानी माता गुरुवारी पहाटे सिंहासनावर विराजमान झाली. त्यानंतर अभिषेक,पूजा करण्यात आली. मंदिर प्रशासनाने दररोज दररोज 15 हजार भाविकांना दर्शनासाठी सोडण्याचा निर्णय घेतला आहे .त्यानुसार सोमवार पासूनदररोज 15 हजार भाविकांना कोविड नियमांचे पालन करून मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे .गुरुवारी सायंकाळी सहा वाजल्यापासून भाविकांना प्रवेश देण्यात आला.












