Monday, October 26, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

बातमी कशी घडते अन् कशी पोहोचते? भावी पत्रकारांनी गिरवले पत्रकारितेचे धडे!

Solapur Mirror by Solapur Mirror
October 11, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
बातमी कशी घडते अन् कशी पोहोचते? भावी पत्रकारांनी गिरवले पत्रकारितेचे धडे!
0
SHARES
9
VIEWS

सोलापूर : वर्गातील पुस्तकी ज्ञानाला प्रत्यक्ष अनुभवाची जोड देत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या जनसंज्ञापन विभागातील विद्यार्थ्यांनी सोलापूर शहरातील विविध नामांकित वृत्तसंस्था, जिल्हा माहिती कार्यालय आणि श्रमिक पत्रकार संघाला अभ्यासपूर्ण क्षेत्रभेट दिली. बातमीच्या शोधापासून ते तिच्या प्रसिद्धीपर्यंतचा प्रवास, संपादकीय निर्णयप्रक्रिया, डिजिटल माध्यमांतील बदल, पत्रकारितेतील आव्हाने आणि पत्रकारांची सामाजिक जबाबदारी यांचा प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थ्यांनी घेतला. या क्षेत्रभेटीत ७५ हून अधिक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

सामाजिक शास्त्रे संकुलाचे संचालक डॉ. गौतम कांबळे आणि जनसंज्ञापन विभागाचे प्रभारी विभागप्रमुख डॉ. प्रभाकर कोळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली या क्षेत्रभेटीचे आयोजन करण्यात आले होते. एम.ए. जनसंज्ञापन आणि बी.ए. मीडिया अँड मास कम्युनिकेशन या दोन्ही अभ्यासक्रमांतील विद्यार्थ्यांचा यामध्ये सहभाग होता. पत्रकारितेचे शिक्षण घेत असताना केवळ सैद्धांतिक अभ्यासावर अवलंबून न राहता माध्यम संस्थांचे प्रत्यक्ष कामकाज समजून घेणे, बदलत्या माध्यमविश्वातील संधी आणि आव्हानांची जाणीव निर्माण करणे, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश होता.

विद्यार्थ्यांच्या क्षेत्रभेटीची सुरुवात सोलापूर श्रमिक पत्रकार संघापासून झाली. यावेळी संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे आणि खजिनदार किरण बनसोडे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. पत्रकारांना वृत्तसंकलन करताना येणाऱ्या अडचणी, व्यावसायिक सुरक्षितता, पत्रकारांचे हक्क, संघटनात्मक कार्य आणि पत्रकारितेतील जबाबदाऱ्या याविषयी त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. प्रत्यक्ष क्षेत्रात काम करताना पत्रकारांना कोणत्या परिस्थितीला सामोरे जावे लागते, याची माहिती विद्यार्थ्यांना मिळाली.

शासनाच्या प्रसिद्धी यंत्रणेचे समजून घेतले कामकाज
यानंतर विद्यार्थ्यांनी जिल्हा माहिती कार्यालयाला भेट देत शासनाच्या माहिती व जनसंपर्क यंत्रणेचे कामकाज जाणून घेतले. जिल्हा माहिती अधिकारी सुनील सोनटक्के यांनी राज्य शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाची रचना, कार्यपद्धती, धोरणे आणि जबाबदाऱ्यांची माहिती दिली.

शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात माहिती कार्यालयाची महत्त्वाची भूमिका असते. शासकीय निर्णयांची प्रसिद्धी, प्रसिद्धिपत्रकांची निर्मिती, वृत्तपत्रे आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांशी समन्वय तसेच आपत्कालीन परिस्थितीत अधिकृत माहितीचे प्रसारण कसे केले जाते, याचे व्यावहारिक धडे सोनटक्के यांनी दिले. यावेळी विद्यार्थ्यांनी शासकीय जनसंपर्क आणि पत्रकारिता यांच्यातील समन्वयाबाबत विविध प्रश्न विचारले.

संपादकांशी थेट संवाद; बातमीमागील मेहनतीची ओळख
या क्षेत्रभेटीतील महत्त्वाचा टप्पा म्हणजे शहरातील प्रतिष्ठित वृत्तसंस्थांना दिलेल्या भेटी. दैनिक ‘सकाळ’चे संपादक संभाजी पाटील आणि कार्यकारी संपादक सिद्धाराम पाटील, दैनिक ‘तरुण भारत’चे संपादक प्रशांत माने तसेच ‘इन सोलापूर न्यूज’चे संपादक समाधान वाघमोडे यांनी विद्यार्थ्यांना पत्रकारितेच्या विविध पैलूंवर मार्गदर्शन केले.

बातमीचे मूल्य कसे ठरविले जाते, वृत्तसंकलन करताना कोणती खबरदारी घ्यावी, बातमीची सत्यता कशी पडताळावी, संपादन प्रक्रियेत कोणत्या बाबींना प्राधान्य दिले जाते आणि वाचकांपर्यंत विश्वासार्ह माहिती पोहोचविण्यासाठी पत्रकारांनी कोणती जबाबदारी पार पाडावी, अशा विविध विषयांवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळाले.विशेषतः डिजिटल माध्यमांच्या वाढत्या प्रभावामुळे पत्रकारितेचे बदलत चाललेले स्वरूप, वेगवान वृत्तप्रसारण आणि अचूकतेचे महत्त्व याबाबत विद्यार्थ्यांना माहिती मिळाली. माध्यम क्षेत्रातील अनुभवी संपादकांशी थेट संवाद साधण्याची संधी मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन झाले.

सिद्धेश्वर मंदिरात सांस्कृतिक पत्रकारितेचे धडे
पत्रकारिता म्हणजे केवळ राजकीय घडामोडी किंवा गुन्हेगारी घटनांचे वार्तांकन नव्हे, तर समाजातील सांस्कृतिक, धार्मिक आणि ऐतिहासिक घडामोडींची वस्तुनिष्ठ मांडणी करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. याच उद्देशाने विद्यार्थ्यांनी सोलापूरचे आराध्य दैवत श्री सिद्धेश्वर मंदिराला भेट दिली. धार्मिक स्थळांचे सामाजिक महत्त्व, सांस्कृतिक वारसा आणि अशा विषयांचे वृत्तांकन करताना आवश्यक असलेली संवेदनशीलता याविषयी विद्यार्थ्यांना जाणून घेण्याची संधी मिळाली.

विद्यार्थ्यांच्या प्रश्नांनी रंगला संवाद
संपूर्ण क्षेत्रभेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध सहभाग नोंदवत पत्रकार, संपादक आणि शासकीय अधिकाऱ्यांशी संवाद साधला. वृत्तसंकलनातील अडचणी, पत्रकारितेतील करिअरच्या संधी, माध्यमांमधील तंत्रज्ञानाचा वापर आणि व्यावसायिक जबाबदाऱ्या यासंदर्भात विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारून आपल्या शंकांचे निरसन करून घेतले. या क्षेत्रभेटीमुळे विद्यार्थ्यांना पत्रकारितेच्या प्रत्यक्ष कार्यपद्धतीची ओळख झाली. तसेच भविष्यात माध्यम क्षेत्रात काम करताना आवश्यक असणारी निरीक्षणशक्ती, चिकित्सक दृष्टिकोन, संवादकौशल्य आणि सामाजिक भान यांचे महत्त्वही अधोरेखित झाले.

वर्गखोलीतून थेट न्यूजरूमपर्यंत!
वृत्तपत्रातील एखादी बातमी वाचकांपर्यंत पोहोचण्यापूर्वी तिच्यामागे किती मेहनत, नियोजन आणि जबाबदारी असते, याची प्रत्यक्ष ओळख या क्षेत्रभेटीतून विद्यार्थ्यांना झाली. पत्रकार संघटनेचे कार्य, शासकीय माहिती यंत्रणा, वृत्तपत्रांचे संपादकीय कामकाज आणि डिजिटल पत्रकारितेतील बदल यांचा अभ्यास करण्याची संधी मिळाली. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी ही क्षेत्रभेट केवळ शैक्षणिक उपक्रम न ठरता भावी पत्रकारितेच्या वाटचालीसाठी महत्त्वपूर्ण अनुभव ठरली

Tags: अध्यक्ष विक्रम खेलबुडेजिल्हा माहिती कार्यालयडॉ. गौतम कांबळेडॉ. प्रभाकर कोळेकरभावी पत्रकारमाहिती व जनसंपर्कसामाजिक शास्त्रे संकुलसुनील सोनटक्केसोलापूर श्रमिक पत्रकार
Previous Post

आई तुळजाभवानी सिंहासनावर विराजमान; मंदिरात भक्तिमय घटस्थापना!

Next Post

मुख्याध्यापकांचा बोरडीत महामेळावा; दोनदिवसीय अधिवेशनाची घोषणा!

Related Posts

कचरा संकलनाच्या कंत्राटातील ‘गोलमाल’ ; पाच सदस्यीय चौकशी समिती गठीत!
सोलापूर जिल्हा

कचरा संकलनाच्या कंत्राटातील ‘गोलमाल’ ; पाच सदस्यीय चौकशी समिती गठीत!

October 26, 2026
‘उमेद’मध्ये लाखोंचा झोल? बनावट धनादेशांच्या आरोपांनी खळबळ!
सोलापूर जिल्हा

‘उमेद’मध्ये लाखोंचा झोल? बनावट धनादेशांच्या आरोपांनी खळबळ!

October 26, 2026
सुरेश हसापुरेंसह २१९ जणांनी घेतला उमेदवारीचा अर्ज..
सोलापूर जिल्हा

सुरेश हसापुरेंसह २१९ जणांनी घेतला उमेदवारीचा अर्ज..

October 26, 2026
रामायणातून जीवनमूल्यांची शिकवण; पंचाक्षरी विद्यामंदिरात वाल्मिकी जयंती साजरी..!
सोलापूर जिल्हा

रामायणातून जीवनमूल्यांची शिकवण; पंचाक्षरी विद्यामंदिरात वाल्मिकी जयंती साजरी..!

October 26, 2026
४६ कोटींची ऊसबिले थकली; दोन कारखान्यांच्या गाळपावर टांगती तलवार!
सोलापूर जिल्हा

४६ कोटींची ऊसबिले थकली; दोन कारखान्यांच्या गाळपावर टांगती तलवार!

October 26, 2026
रेल्वे स्थानकावर पर्स लांबवली; पण पोलिसांनी अखेर गाठलेच!
क्राईम

रेल्वे स्थानकावर पर्स लांबवली; पण पोलिसांनी अखेर गाठलेच!

October 26, 2026
Next Post
मुख्याध्यापकांचा बोरडीत महामेळावा; दोनदिवसीय अधिवेशनाची घोषणा!

मुख्याध्यापकांचा बोरडीत महामेळावा; दोनदिवसीय अधिवेशनाची घोषणा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कचरा संकलनाच्या कंत्राटातील ‘गोलमाल’ ; पाच सदस्यीय चौकशी समिती गठीत!

कचरा संकलनाच्या कंत्राटातील ‘गोलमाल’ ; पाच सदस्यीय चौकशी समिती गठीत!

October 26, 2026
‘उमेद’मध्ये लाखोंचा झोल? बनावट धनादेशांच्या आरोपांनी खळबळ!

‘उमेद’मध्ये लाखोंचा झोल? बनावट धनादेशांच्या आरोपांनी खळबळ!

October 26, 2026
सुरेश हसापुरेंसह २१९ जणांनी घेतला उमेदवारीचा अर्ज..

सुरेश हसापुरेंसह २१९ जणांनी घेतला उमेदवारीचा अर्ज..

October 26, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In